यावेळी रिपब्लिक डेच्या निमंत्रणपत्रिकेत एक भन्नाट आयडिया वापरण्यात आली होती

निसर्गात काहीतरी गंडलंय हे तुम्हाला दिसतंच आहे. अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर शास्त्रज्ञ इतक्या दिवस ओरडून सांगत होते की पृथ्वी तापतेय काही तरी बघा रे बाबांनो पण कोणी काय मनात घेत नव्हतं. पेपरात पण कार्बन  कॅप्चारिंग, हरीत वायूंचं उत्सर्जन  करणं गरजेचं आहे असं काहीतरी मोठ्या अवजड  शब्दात उपाय सांगण्यात आले.

पण ऑल प्रॉब्लेम वन सोल्युशन या म्हणी प्रमाणं तुम्ही झाडं लावा म्हणजे पर्यावरणाच्या बऱ्याच समस्या दूर होतील हे ग्लोबल वॉर्मिंगच्या उपायांच सार आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बरोबर ओळखला आणि त्यानुसार आपल्या परीने प्रयत्न सुरु केले.

कोणी डायरेक्ट झाड लावली तर कुणी लग्न समारंभात लोकांना झाडं भेट केली. काहींनी तर सिगरेटच्या थोटक्यात बिया पेरल्या.

पण आपल्याला एक आयडिया आवडली म्हणजे लग्नात बियांची पाकीट द्यायची किंवा किंवा पत्रिकांमध्येच बिया  ठेवायच्या. आमच्या गावात अशाच एक लग्नामुळं वगळीला म्हणू नका की उकिरड्यात जिथं जिथं ह्या पत्रिका लोकांनी टाकल्या तिथं तिथं झाडं उगवून येत होती. बाकी त्या लग्नाचं  नाव अजुनपण निघतं ही गोष्ट वेगळी.

आता हीच आयडिया सरकारनंपण स्वीकारल्याचं दिसतंय.

रोज शेकडो सरकारी कार्यक्रम होत असतात आणि त्याला लाखो निमंत्रणपत्र धाडली जातात. 

आता सरकारी काम म्हटल्यावर आपल्यासारखा व्हाट्सअपवर मेसेज केला आणि या म्हटलं असं इथं चालत नाही. त्यामुळं अगदी निजोणबद्धपणे पुढं आजी माजी लिहून मागं आमंत्रितांची गल्लीपासून दिल्लीपर्यंतची पदं लिहून अगदी घरपोच पाठवली जातात.

यावेळीच्या रिपब्लिक डे ची निमंत्रणपत्रकं मात्र थोडी वेगळी होती.

 प्रजासत्ताक दिनाच्या निमंत्रणपत्रिकांमध्ये यावेळी सरकारनं झाडांच्या बिया ठेवल्या होत्या.

७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्राने राबविलेल्या हरित उपक्रमाचा एक भाग म्हणून औषधी वनस्पतींच्या बियांची कार्डे तयार करण्यात आली होती आणि ती सर्व आमंत्रितांना पाठवण्यात आली होती.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकांना पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनातही पर्यावरणपूरक कल्पना निवडणे हा यामागचा उद्देश होता. यामध्ये अश्वगंधा, कोरफड आणि आवळा यांसरख्या अनेक औषधी वनस्पतींच्या बिया आहेत.

या इन्व्हिटेशन कार्डच्या तळाशी एक चिठ्ठी लिहिली आहे, “आवळा वनस्पती वाढवण्यासाठी हे कार्ड पेरा”.

आमंत्रण वाचल्यानंतर, पाहुण्यांना कार्डचे तुकडे करावे लागतील आणि ते तुकडे मातीत पेरावे लागतील, मग माती ओलसर करायाची   आणि नंतर बियांचा अंकुर मातीतुन बाहेर येण्याचा तो सुखद क्षण अनभुवयाचा.

सरकारची ही आयडिया आपल्याला अनेक समारंभात वापरण्याजोगी आहे. आता तुम्ही म्हणाल कि बाबा आता सगळं व्हाट्सऍपवर असताना तुझी ही बियांची अगरबत्ती कुठं लावतो. 

पण भावांनो तुम्ही पण मान्य कराल की प्रत्येकाच्या घरी जाऊन ”राम राम” म्हणन्यात जी आपुलकी आहे ती व्हाटसऍपवर मॅसेज करण्यात नाही. 

त्यामुळं पुढं तुम्ही कधी पत्रिका छापणार असाल तर या आडियावर नक्की विचार करा नाहीतर तुमच्या ओळखीतल्या कोणाचे दोनाचे चार हात होणार असतील तर खाली त्याला टॅग करून ही आयडिया जरूर सांगा.  

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.