अजूनही अमेरिकेत हे 18 करोडचं बक्षिस कोणी जिंकू शकलेलं नाही…
काही काही हत्याकांड असे असतात की त्यांचा शेवटपर्यंत आरोपी सापडत नाही आणि त्या केस वर्षेच्या वर्ष न्यायालयात सडत राहतात. अशा अनेक घटना जगभरात घडत राहतात. पण नुकतीच एक केस पुढे आली ती म्हणजे दोन दशकांपासून आरोपी सापडत नाही म्हणून 18 करोडचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे.
49 वर्षाच्या थॉमस वेल्सला ११ ऑक्टोबर २००१ रोजी त्याच्याच घरात अज्ञात शुटर व्यक्तीने सेमी-ऑटोमैटिक हैंडगनने गोळी मारली होती. २००१ साली झालेल्या या हत्याकांडाचा आरोपी अजूनही सापडला नसल्याने या हत्येवर ठेवण्यात आलेल बक्षीस वाढवण्यात आलेल आहे. मागील २० वर्षांपासून एका वकिलाच्या हत्येचा तपास सुरु आहे पण अजूनही आरोपी सापडलेला नाही. दोन दशकाहून जुन्या या केसवर अगोदर चांगल भक्कम बक्षीस म्हणजे ११ करोड ठेवण्यात आलेल होत, पण आता त्याची किमत वाढवून ते बक्षीस २.५ मिलियन डॉलर म्हणजे १८ करोड पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे जो ही मर्डर केस सोल्व्ह करेल त्याला थेट १८ करोड रुपये मिळणार आहेत. पण हे नेमक काय हत्याकांड होत हे पण आपण अगोदर समजून घ्यायला पाहिजे.
11 ऑक्टोबर 2001 रोजी अज्ञात शूटरने हँडगनने थॉमस वेल्सवर गोळ्या झाडल्या होत्या. 2001 मध्ये झालेल्या या हत्येप्रकरणी अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. कोण आरोपी आहे याचा तपास गेल्या 20 वर्षांपासून सुरूच आहे पण काहीच हाती लागलेलं नाही. वॉशिंग्टनमधील सिएटल फेडरलच्या अधिकाऱ्याच्या हत्येशी संबंधित दोन दशके जुने प्रकरण सोडवू न शकलेल्या फेडरल इन्वेस्टीगेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बक्षिसाची रक्कम 18 कोटी रुपये केली.
वॉशिंग्टनच्या वेस्टर्न डिस्ट्रिक्ट, यू.एस. ऍटर्नी निकोलस ब्राउन यांनी समारंभात बक्षीस वाढवण्याची घोषणा केली, न्याय विभागाकडून $2 दशलक्ष आणि नॅशनल असोसिएशन ऑफ फॉर्मर यू.एस. अॅटर्नीकडून अतिरिक्त $500,000 देऊ केले गेले आहे.
ब्राउन हे या खून खटल्यातील सहावे वकील आहेत आणि त्यांना विश्वास आहे की या प्रकरणाची ‘नवीन नजर’ तपासात मदत करू शकते. या हत्येबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांना पुढे आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू इच्छितो. पुढे ब्राउन समारंभात म्हणाले, “या गुन्ह्यासाठी वीस वर्षे खूप जास्त आहेत. अमेरिकन न्याय व्यवस्थेसाठी हा हल्ला अद्याप अनुत्तरीत आहे.” ते म्हणाले की, दोन दशके उलटली तरी न्याय विभाग अजूनही या तपासासाठी कटिबद्ध आहे.
सिएटल टाईम्सच्या मते, मर्डर केसला अनेक रुल्सचा आज अटींचा सामना करावा लागतो, एफबीआयने या सिद्धांतावर बराच काळ विश्वास ठेवला आहे की, अॅटर्नी थॉमस वेल्सने फसवणूक केल्याबद्दल खटला चालवलेल्या एका पायलटने त्याला मारण्यासाठी पूर्वी शूटर नियुक्त केला होता. वेल्स हे ड्रग्ज स्मगलिंग प्रकरणातही वकील होते, हे देखील त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण असू शकते. पण सत्य काय आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.
अशा या केसला 20 वर्षे उलटली आहेत , 6 वकील बदलून झाले आहेत, आता इनाम वाढवला आहे यामुळे तरी आरोपी हाती लागेल का हेच पाहण्याचं औत्सुक्याचं ठरेल.
हे ही वाच भिडू :
- शाहरुख टिपू सुलतानवर चित्रपट आणतोय म्हणून आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अडकवलं गेलं का?
- सिंघू बॉर्डर प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या निहंग शीखवर एका ब्रिगेडियरचा खून केल्याचे आरोप आहेत
- पुनीत राजकुमारवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्याच चाहत्यांपासून संरक्षण घ्यावं लागतंय
- लहान मुलांची हत्या करून रक्त पिणाऱ्या सिरीयल किलरला आफ्रिकेत ठेचून मारण्यात आलंय..