किरीट सोमय्यांच्या रडारवर कोणाचे जावई आलेत ?

गेल्या कित्येक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या चर्चेत आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आण्यासाठी ते हात धुवून मागे लागले आहेत. आता पर्यंत त्यांनी प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब,  भावना गवळी, किशोरी पेडणेकर, रवींद्र वाईकर, जकितेंद्र आव्हाड, चांगं भुजबळ, यशवंतराव चव्हाण, यामिनी जाधव, मिलिंद नार्वेकर,  हसन मुश्रीफ एवढंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चौकशी बसवली. 

आता यातल्या काही मंत्र्यांवर या चौकशीचा काही परिणाम झाला नाही. पण काहींचे करोडोंचे घोटाळे समोर आले आणि त्यांना आपल्या पदावर पाणी सोडावं लागलं. आणि महत्वाचं म्हणजे सोमय्या यांनी मंत्रीचं नाही तर त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा आपल्या रडारवर ठेवले.

यातचं आता किरीट सोमय्या यांनी रविवारी ट्विट करत सांगितले कि, दिवाळीनंतर फटाके फोडणार आहेत. ठाकरे सरकारचे तीन मंत्री आणि तीन जावई यांचे घोटाळे बाहेर काढणार आहेत”.

त्यांनतर आजही किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक यांच्यावर आरोप करत म्हंटले कि, पवार कुटुंबियांवर होणाऱ्या आरोपकडे दुर्लक्ष करण्यासाठी नवाब मलिक यांनी वानखेडे प्रकरण उकरून काढलंय. हे घाणेरडं राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात, नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही. पवार परिवारानं महाराष्ट्राला खूप लुटलंय, गेल्या १२ ते १५ दिवसांपासून हि नौटंकी सुरु आहे. आता ते होत नाही तर फडणवीस आणि त्यांच्या पत्नीवर त्यानो आरोप करायला सुरुवात केली. पण त्यांनी आधी माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत. 

सोमय्या यांनी यावेळी तीन मंत्री आणि त्यांच्या तीन जावयांचा देखील दिवाळीनंतर भांडाफोड करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटल. ठाकरे सरकारमध्ये जावयाचं राज्य आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ आणि नवाब मलिक यांनी त्यांच्या जावयांना खुश केलं. आता एकदम बॉम्ब फोडण्याचं काम आपण करणार असल्याचं ते बोलले. 

मोहन पाटील 

सोमय्या पुढे म्हणाले, 

या तीन जावयांमधले पहिले जावई आहेत पवार कुटुंबाचे. पवार कुटुंबाचे जावई मोहन पाटील यांच्याकडे किती पैसे आले? कुठून पैसे आले? कसे आले? ते कुठे गेले? सहा फटाक्यापैकी पहिला फटाका आज फोडलाय, हिंमत असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी समोरासमोर उत्तर द्यावं.

मोहन पाटील हे अजित पवार यांच्या भगिनी विजयाताई पाटील यांचे यजमान आहेत. जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड त्याची ओनरशिप हळू- हळू अनेक कंपन्यांकडे गेली. त्यातली एक कंपनी ज्याचे पार्टनर मोहन पाटील आहेत. 

 मतीन मंगोली 

किरीट सोमय्या यांच्या यादीतले दुसरे जावई म्हणजे  मतीन मंगोली. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे ते जावई. सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर शंभर कोटींच्या घोटाळयाचा आरोप केला. या घोटाळ्यात त्यांचे जावई मतीन मंगोली यांचाही समावेश असल्याचे त्यांनी म्हंटले. 

मंगोली हे ब्रिक्स इंडिया या बेनामी कंपनीचे मालक असल्याचा आहेत. या कंपनीने गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना चालविण्यास घेतला होता, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. 

समीर खान 

सोमय्या यांच्या यादीतले तिसरे जावई म्हणजे समीर खान. समीर खान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई आहेत. मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. 

ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी २० हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं. 

आता किरीट सोमय्या यांनी कॉन्फिडन्सने दिवाळीनंतर या ६ जणांचे फटाके फोडणार असल्याचं म्हंटलय. त्यांच्याकडं तसे पुरावे देखील असल्याचं त्यांनी म्हंटलयं. त्यामुळे दिवाळीच्या फटक्यानंतर कोणते राजकीय फटाके फुटणार आणि त्यांचा किती आवाज होणार त्यामुळे किती प्रदूषण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.