‘होली के रंग’ मधून नगरचा तरुण कोरोनात आधार गमावलेल्या महिलांना रोजगार मिळवून देतोय

कोरोनाच्या २ वर्षात नोकरी-धंद्यापासून सणासुदीला सुद्धा ब्रेक लागलेला. सगळंच कसं पार भकास. पण आता कुठं परिस्थिती रुळावर येतेय. पण बरीच मंडळी नोकरीपेक्षा आपला व्यवसाय बरा या गोष्टीच्या मागे लागलीत. स्वतः कमवायचं आणि स्वतः खायचं अशी नवीन टॅगलाईन झालीये. पण अशातचं काही मंडळी अशी सुद्धा आहेत, जी स्वतः च्या कामातून इतरांना रोजगार उपलब्ध करून देतायेत. 

याचचं एक उदाहरण म्हणजे अहमदनगरमधला ३० वर्षाचा तरुण मयूर कुऱ्हाडे. ज्याचा स्वतः चा इकोक्रेडल नावाचा स्टार्टअप आहे. त्याच्या या हटके स्टोरी म्हणेज त्याअंतर्गत तो इकोफ्रेंडली प्रॉडक्ट बनवतो, पण त्यासोबतच कित्येक महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध करू देतो. 

या संदर्भात बोलताना मयूरने बोल भिडूशी बोलताना म्हंटल कि, इकोक्रेडल या माझ्या स्टार्टअप अंडर हँडवॉश, फेसवॉश, सोप, शॅम्पू असे जवळपास २५ पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत. जे सगळे इकोफ्रेंडली आहेत. त्यासोबतच सिजनल प्रोडक्टवर सुद्धा काम केलं जात. जसं कि, दिवाळीला पणती. अशातचं यंदाच्या होळी आणि रंगपंचमीला सुद्धा मला काम करायचं होत. पण चांगली आयडिया सुचत नव्हती. 

अश्यातच एकदा रेल्वे प्रश्वास करत असताना आम्हाला उत्तराखंडमधल्या काही महिलांची माहिती मिळाली, ज्या कित्येक वर्षांपाससून स्वतः कोणत्याही केमिकलशिवाय फुलांपासून नॅचरल रंग तयार करायच्या.

मयूर सांगतो, आता आमची स्टार्टअपची कन्सेप्टचं अशी आहे कि, आपल्या स्टार्टअपमधून महिलांना रोजगार सक्षम बनवायचं, त्यात या उत्तराखंड मधल्या महिलांचं काम एकदम फिट होत, म्हणून आम्हीच त्यांना सोबत घेऊन काम करायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही स्वतः त्या भागात गेलो आणि त्या महिलांशी चर्चा केली.

पण अडचण होती कि, या महिला फार कमी क्वांटिटीमध्ये रंग करायच्या, म्हणजे जास्तीत जास्त ५० ते ६० किलो आणि आम्हाला जास्तीच्या रंगाची गरज होती. त्यामुळे आम्ही त्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. ते रंग नॅचरल तर होते पण यासोबत सगळ्या भारतात प्रोडक्ट विकले जाणार होते हे लक्षात घेऊन हायजिनची काळजी घेण्यापासून फिल्टरेशनपर्यंत सगळी माहिती त्यांना दिली.

 त्यात या महिला आधी फुलांचा जो रंग बनवायच्या त्याचा टेक्श्चर जरा ओबडधोबड असायचा. म्हणजे एक लोकल लेव्हलवर असायचा, त्यामुळे ब्रँडच्या दृष्टीने जे महत्वाचं होत त्या सगळ्या गोष्टी आम्ही करून घेतल्या. ज्यानंतर रंग बनवण्यासाठी या महिलांनी स्वतःच्या घरी टेरेसवर जाऊन कलर तयार करायला सुरुवात केली.

मयूरने सांगितलं कि, हे नॅचरल रंग बनवण्याच्या प्रक्रियेला जवळपास ४-५ दिवस लागतात. म्हणजे फुलं आणून ती सुकवली जातात, मग त्याच्या पाकळ्या तोडल्या जातात,  या पाकळ्यांची बारीक पेस्ट तयार केली जाते. मग त्यात बाकीच्या काही गोष्टी टाकून तो रंग परत सुकवला जातो. या सगळ्या गोष्टींना ४-५ दिवस लागतात. पण कधी कधी हवामानामुळे आणखी वेळ लागतो. 

आज या महिला ७०० ते १००० किलोपर्यंत नॅचरल कलर तयार करत आहेत. ज्यात ४ कलर आहेत, म्हणजे हळदीपासून पिवळा, पालकांपासून हिरवा, झेंडूच्या फुलांपासून ऑरेंज, बीटपासून लाल हे कलर महिला साध्या  पॅकेटमध्ये तयार करून देतात, जे नंतर आम्ही आमच्या इकोक्रेडलच्या माध्यमातून पॅकेजिंग करून घेतो. 

महत्वाचं म्हणजे इकोक्रेडलची जी पॅकेजिंग प्रोसिजर आहे, तिथेही सगळ्या महिलाचं काम करतात. म्हणजे रंगाचे बॉक्स तयार करण्यापासून ते बॉक्स सील कारण्यापर्यंत सर्व पॅकेजिंग प्रोसिजर महिलाच करतात. 

मयूर सांगतो कि, आमच्या या व्यवसायासोबत उत्तराखंडमधल्या ७० ते ७५ महिला जोडल्या गेल्यात तसेच, बाकीच्या प्रोडक्टसाठी देखील १५ ते २० जण जोडले गेलेत, ज्यात महिलांचा सहभाग जास्त आहे. तसंच आमच्या या कामात होप फाउंडेशनची खूप मोठी मदत होते. त्यांच्या मदतीनेच आम्ही कोरोना काळात आधार गमावलेल्या किंवा ज्या एकट्या महिला आहेत त्यांना रोजगार देऊन त्यांच्याकडून या उत्पादनाची विक्री करायला मदत घेतली. जेणेकरून त्यांनाही थोडा हातभार लागेल.

‘या इकोक्रेडल ब्रँडची स्पेशालिटी म्हणजे बाकीच्या ब्रँडपेक्षा हे प्रोडक्ट केमिकल फ्री तर असतातचं. पण त्याहून महत्वाची गोष्ट हे प्रोडक्ट प्लास्टिक फ्रीसुद्धा आहेत. सगळ्या प्रोडक्टची पॅकेजिंग अल्युमिनियम आणि ग्लासमध्ये केलेली आहे. 

एवढंच  इकोक्रेडलच्या जाहिरातीसाठी वापरण्यात येणारी पोस्टर्स सुद्धा कापड आणि कागदांनी बनवली आहे. प्रोडक्ट पॅक करताना सुद्धा प्लास्टिकच्या बबल व्रपऐवजी नारळाच्या झावळ्या किंवा प्रिंटिंग प्रेस मध्ये वाया गेलेल्या कागदाच्या पट्ट्यांचा वापर होतो. उत्पादनांच्या लेबल्स साठी सुद्धा नॉन टीअरेबल ऐवजी फक्त कागदी स्टिकर्स चा वापर केला जातो’ 

दरम्यान महत्वाचं म्हणजे इकोक्रेडलच्या मदतीने जे रंग बनवले गेले, त्याच हे पाहिलंच वर्ष आहे, आणि या महिन्याभरातच जवळपास २५०० ते ३००० बॉक्स विकले गेले. आज या इकोक्रेडलचे प्रोडक्ट सगळ्यात देशभरात जाऊन पोहोचलेत. पुढे ते आणखी मोठ्या स्केलवर केलं जाणार आहे.

मयूरने म्हंटल कि, सध्या उत्तराखंड काम सुरु असलं तरी आम्ही पुढच्या वर्षी महाराष्ट्रात सुद्धा हा प्रयोग राबवणार असून इथल्या महिलांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.