टाटा कम्युनिकेशने अमेरिकेची एक कंपनी विकत घेऊन भारताच्या फायद्याची गोष्ट केलीय…

टाटाने नेहमीच भारताच्या हिताचे बरेच निर्णय घेतले आहेत. आता अजून एक महत्वाचा निर्णय टाटाने घेतला आहे, तो म्हणजे टाटा कम्युनिकेशन्सने अमेरिकेची कालरा कंपनी विकत घेतली आहे. डॅरीओ कॅलेग्रो आणि सिमोन फुबिनी यांनी मिळून २४ वर्षांपूर्वी कालरा नावाचा एक छोटासा स्टार्टअप लाँच केला होता.

कालरा हे एक इंटरनॅशनल कम्युनिकेशन्स प्लॅटफॉर्म आहे जे SMS, MMS, इ मेल्स, व्हाट्स ऍप, व्हिडिओ मेसेज आणि व्हॉइस मेसेजने जगभरातील ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी एक एप्लीकेशन प्रोग्राम इंटरफेस पुरवते.

आता तुम्ही म्हणाल या सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपन्या भारतात खूप आहेत. पण कालरा युएस बेस्ड कंपनी असल्या मुळे, कालराचा टाटा कम्युनिकेशनला अजून चांगल्या पद्धतीने व्यवहार करण्यासठी एक भक्कम व्यासपीठ मिळेल.

या संपूर्ण व्यवहाराविषयी आणि कालरा कंपनीचा आपल्याला आणि टाटा कम्युनिकेशनला काय फायदा होऊ शकतोय ?

कालरा विशेषतः बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिस, रिटेल आणि डिजिटल कॉमर्स इंडस्ट्रीज् मध्ये टाटा कम्युनिकेशनला एका वेगळ्या लेवलला नेऊन ठेऊ शकते. एवढंच नाही तर युएस मधल्या tier 1 carrier connections चा सुद्धा फायदा भारताला होणार आहे.

टियर 1 कॅरिअर कनेक्शन म्हणजे काय ?

टियर1 कॅरिअर कनेक्शन म्हणजे इंटरनेट पुरवणारी सगळ्यात पहिली स्टेप.  म्हणजे जर आपल्याला गुगल, युट्यूब, फेसबुक सारख्या इंटरनॅशल कंपनी कडून माहिती येण्यासाठी समुद्रातून टियर 1 इंटरनेट कंपनींनी वायर्सचं एक जाळ टाकलेलं असतं.

जसं भारतात भारती रिलायंस, टाटा आणि VSNL हे टियर1 कॅरिअर कनेक्शन आहेत. तिथून ते कनेक्शन घेऊन वोडाफोन, आयडिया, एअरटेल, जिओ सारख्या टायर 2 कंपनी आपल्या पर्यंत पोहोचवतात आणि टायर 3 कॅरिअर कनेक्शन म्हणजे आपले लोकल वायफाय किंवा इंटरनेट सर्व्हिस पुरवठादार.

आता कालरामधून टाटाला फायदा असा होणार आहे कि युएस मधल्या tier 1 carrier connections मधून ते अजून देशांशी जोडले जाऊ शकतात आणि अतिरिक्त सॉफ्टवेअरची गरज न पडता इतर वेबसाइट्स आणि सेवांशी सहजपणे कनेक्ट होऊ शकतात.

या युएस मधल्या टियर1 कनेक्शन ने जोडले गेल्या मुळे युएस मधल्या ५०० सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी ३०० कंपन्यांशी टाटा कम्युनिकेशन सहज व्यवहार करू शकते. यामध्ये मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्स कनेक्शन्स सुद्धा असतील. हा झाला टाटा कम्युनिकेशनचा फायदा.

यात भारताचा फायदा कसा होईल ?

तर पहिली गोष्ट रोजगाराचे मार्ग चालू होतील. युएस च्या टियर1 कॅरिअर कनेक्शन मुळे ३०० आंतराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी भारतीयांना मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे भारत जगभरातल्या २०० देशांशी व्यावहारिक दृष्ट्या सहज जोडला जाऊ शकतो. म्हणजे भारताला सुद्धा व्यावहारिक दृष्ट्या फायदा होऊ शकतो.

टाटा कम्युनिकेशनने कालरा १०० मिलियन डॉलर्स म्हणजे एकूण आठ अब्ज २० कोटी २८ लाखरुपयांमध्ये विकत घेतलं. त्यांनी कालरा स्टॉकच्या प्रत्येक शेअरसाठी 7.25 डॉलर दिले आहेत. कालरावर असणारं कर्ज देखील टाटा कम्युनिकेशनच फेडणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाने या कराराला सहमती दिली असली तरी कालराच्या इतर स्टॉकहोल्डर्सनी सुद्धा या कराराला हिरवा झेंडा दाखवणं गरजेचं आहे.

जर हे सगळं सुरळीत झालं तर, सुमारे सहा ते नऊ महिन्यांत करार फिक्स होईल. त्यानंतर कालरा टाटा कम्युनिकेशन्सचा भाग बनेल.

कालरा ने गेल्या वर्षी 339.2 मिलियन डॉलर्सची कमाई केली, जी त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत 26.7% वाढली आहे. यातूनच कालरा ची योग्यता कळून येते. आणि हाच फायदा यापुढे भारताला होऊ शकतो. टाटाचे MD आणि CEO ए एस लक्ष्मीनारायणन यांनी सांगितलं की, कालरामध्ये गुंतवणूक करून आम्ही customer interaction platform मार्केट मध्ये आमचा जोर वाढवू. पुढच्या पिढीसाठी जगाशी कम्युनिकेट करण्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान तयार करू आणि यात कालराचं प्राविण्य आहे.

टाटा मुळे नेहमीच भारताला आर्थिक दृष्ट्या बराच फायदा झाल्याचं दिसून आलं. कालरा सारख्या युएस बेस्ड कंपनीला विकत घेतल्यामुळे भारतापुढे रोजगाराचे सुद्धा बरेच पर्याय खुले होतील. आणि पुढच्या पिढीला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. एकीकडे भारतात बेरोजगारांची संख्या वाढत असताना टाटा कम्युनिकेशनचा हा निर्णय खूप फायदाचा ठरेल एवढं मात्र नक्की.

हे ही वाच भिडू :

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.