टायगर मेमनची कॉलगर्ल बरोबरची लव स्टोरी अख्ख्या मुंबईत गाजली होती ..

मुंबई म्हणल्यावर अगोदर समोर समुद्र, गर्दी, ताज हॉटेल अश्या सुंदर गोष्टी समोर यायच्या पण नंतर मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडले आणि प्रत्येक जण भारतातला मुंबईत येताना जीव मुठीत घेऊन येऊ लागले. मूळचे मुंबईकर आणि इतर जिल्ह्यातून आलेले मराठी बांधव सावध वागू लागले. साखळी बॉम्बस्फोट इतके खतरनाक होते की मोठी जीवितहानी आणि वित्तहानी या स्फोटात झाली होती आणि संशयाची सुई फिरत होती एकाच माणसाभोवती आणि तो होता दाउद इब्राहीम आणि त्याचा शागीर्द टायगर मेमन. बॉम्बस्फोट घडवून टायगर मेमन मुंबईतून बाहेर दुबईला पळून गेला पण मुंबईत त्याची लव स्टोरी अजूनही चर्चिली जाते.

मुंबई हे टायगर मेमनच्या अवैध धंद्यांचं ठाणं बनलं होतं. मोठमोठ्या दहशती कारवाया इथून पार पाडण्याच्या मेमनच्या योजना होत्या. याच मुंबईत टायगर मेमनने रक्तरंजित गोष्ट घडवून आणली आणि अनेक निष्पाप लोकांचा जीव घेतला. कोटींची मालमत्ता खाक करून टाकली. इतकं सगळं करून तो फरार झाला. एकेकाळी मुंबईत बसून स्वतःला मुंबईचा बादशहा तो समजायचा पण बॉम्बस्फोट घडवून आणल्यावर मुंबईत येण्यास त्याला भीती वाटू लागली कारण त्याला माहिती होतं की आपण जर परत मुंबईत पोहचलो तर आपल्याला फाशी होणार हे नक्की. मुंबईत वर्चस्व म्हणजे जगावर वर्चस्व असा त्याचा समज होता.

काहीही झालं तरी मुंबई आपल्याला हवी या धोरणामागे टायगर मेमनची लव स्टोरी आहे आणि याच मुंबईसाठी त्याचा जीव तिळतीळ तुटायचा. या मुंबईत त्याची प्रेयसी रहायची आणि तिच्या नादापायी तो पार वाया गेला होता. पण या प्रेयसीला भेटण्यागोदर टायगर मेमन हा लग्न झालेला गडी होता. मुंबईत स्फोट करून पळून जाण्याअगोदर मुंबईत त्याच प्रेमप्रकरण धार धरत होतं. भलेही टायगर मेमनने मुंबई बॉम्बस्फोट करून उडवून द्यायची योजना आखली होती मात्र जेव्हा स्फोटाची चित्रं त्याने पाहिली असेल तेव्हा मात्र त्याला आपल्या प्रेमाची आठवण झाली असेल.

टायगर मेमनचे संबंध मुंबईतल्या एका कॉल गर्ल सोबत झाले होते आणि तिच्यासाठी तो काहीही करायला तयार होता. एका कोठ्यावर त्या कॉल गर्लशी टायगर मेमनची ओळख झाली आणि ही ओळख पुढे प्रेमात बदलली. या कॉल गर्लची नशा टायगर मेमनला इतकी डेंजर चढली की स्मगलिंगच्या धंद्यापासून टायगर मेमन वर्षभर लांब राहिला. सोबतच आपल्या बायकोला घटस्फोट देण्याची सुद्धा त्याने तयारी केलेली होती. पण ती कॉल गर्ल दुसरीकडे प्रेम करत होती आणि मग तिने हळूहळू टायगर मेमनला गुलीगत लांब सरकवण सुरू केलं आणि दोघांमध्ये अंतर पडत गेलं.

जोवर टायगर मुंबईत होता तोवर दोघांचे प्रेमसंबंध चांगले फुलले पण जसं टायगर मेमन साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात बिजी झाला तसं त्यांचं नातं दुरावत गेलं. बॉम्बस्फोट करण्याची सगळी तजवीज करून मेमन दुबईला पळून गेला आणि दोघांमधलं अंतर जास्तच झाल्याने ही लव स्टोरी लवकरच संपुष्टात आली. त्या महिलेने दुसऱ्या इसमाशी लग्न केलं आणि ही लव्ह स्टोरी द एन्ड झाली.

दुबईला गेल्यावर तसाच टायगर मेमन पाकिस्तानला गेला आणि 2011 साली त्याने लग्न केल्याचे फोटोज व्हायरल झाले होते. पाकिस्तानच्या कर्नलच्या मुलीसोबत त्याने लग्न केलं. आता प्रेयसीची ओढ कमी आणि फाशीचा दोर टायगर मेमनला मुंबईत येण्यापासून रोखतो पण अजूनही अंडरवर्ल्ड अभ्यासक टायगर मेमनच्या या लव स्टोरी बद्दल आणि त्याच्या मुंबईत परत न फिरण्याबद्दल लिहीत बोलत असतात.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.