कमी अधिक नाही तर आजपर्यंत जगाला २१ महामारींचा सामना करावा लागला आहे

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजवला आहे, चीनमध्ये कोरोनाचा बी एफ ७ हा नवीन व्हेरियंट झपाट्याने पसरत आहे. रुग्णांची संख्या इतकी वाढलीय की त्यांच्यासाठी बेड आणि व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. डॉक्टर उपचार करता करता थकून झोपी जात आहेत, असे व्हिडीओ समोर येत आहेत. यामुळे जगभरात चिंता सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या नवीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावलंय तर अनेक राज्य सरकारांनी देखील यावर अलर्ट जाहीर केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल का अशी अटकळ बांधली जात आहे. कोरोनाची नवीन लाट येणार असं जरी म्हटलं तरी अनेकांना मागच्या लाटेतील दृश्य आठव यला लागतात, पण अशी महामारी काही पहिल्यांदा आलेली नाहीय. 

तर यापूर्वी देखील जगभरात २१ महामाऱ्या येऊन गेल्यात ज्यात लाखो लोक मृत्युमुखी पडले होते.

१) इसवी सन ३,००० वर्षांपूर्वीची चीनमधील महामारी

चीनच्या हमीन मंघा या प्राचीन गावाच्या अवशेषांमध्ये महामारीचे पुरावे सापडले आहेत. अंदाजे ,०००० वर्षांपूर्वी या गावात फार मोठी महामारी आली होती. गावातले बहुतांश लोक मारले गेले. मृतदेशांना पुरण्याची देखील वेळ नव्हता त्यामुळे परिवारातील सर्व सदस्यांना त्यांच्याच घरी पुरून अख्खं गावाचं जाळून टाकण्यात आलं होतं.

२) इसवी सन ४३० ची अथेन्समधील महामारी

प्राचीन ग्रीक इतिहासकार त्थ्यूसिडाइसने लिहिलंय की, इसवी सन पूर्व ४३० मध्ये अथेन्स आणि स्पार्टामध्ये युद्ध सुरु असतांना अचानक महामारी आली. धष्टपुष्ट लोकांना टॅप येऊ लागला, डोळ्यात जळजळ व्हायला लागली, घास आणि नाक सुजायला लागले आणि यात लोकांचा मृत्यू व्हायला लागला. जवळपास यात १ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं.

३) अँटोनिन प्लेगची साथ

इसवी सन १६५-१८० दरम्यान रोमन साम्राज्य आणि पार्थियमध्ये युद्ध झालं. या युद्धात रोमन सैनिकांचा विजय झाला आणि ते स्वतःच्या राज्यात परतले, परंतु या युद्धात बरेच सैनिकांना कांजिण्या किंवा अँटोनिन प्लेगची लागण झाली होती. सैनिकासोबत ही महामारी रोममध्ये पसरली आणि जवळपास ५० लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असा अंदाज वर्तवला जातो. 

४) सायप्रियन प्लेगची साथ 

इसवी सन २०५०-२७१ च्या काळात ट्युनिशियामधील कार्थेज शहरात सायप्रियन प्लेगची साथ आली ज्यात लोक अचानक आजारी पडू लागले. लोकांना जुलाब, उलट्या व्हायला लागल्या. शरीरावर जखमा व्हायला लागल्या आणि त्यामुळे लोक मारायला लागले. रोममध्ये दिवसाला ५ हजार लोक मृत्युमुखी पडत होते. 

यापासून वाचण्यासाठी लोकांनी मृतदेहाला चुन्याने झाकून त्यांना जमिनीत पुरलं होतं, तसेच मोठमोठ्या भट्ट्या पेटवून त्यात अनेक लोकांना जाळण्यात आलं होतं. या साथीला जगाचा अंत करणारी साथ असं देखील म्हटलं जात होतं. 

५) जस्टीनिमन प्लेगची साथ 

इसवी सन ५२७-५६५ दरम्यान बायझंटाईन साम्राज्यावर सम्राट जस्टीनिमनचन राज्य होतं. त्याच्या काळात साम्राज्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. मध्य पूर्वी युरोपापासून तुर्कीपर्यंतचा प्रदेश त्याने जिंकला पण त्याच्या काळात प्लेगची मोठी साथ आली ज्यात स्वतः जस्टीनिमन देखील आजारी पडला. तो या लाटेतून बरा झाला मात्र त्याच्या साम्राज्यातील लाखो लोक या साथीत मारले गेले. 

६) द ब्लॅक डेथ 

इसवी सन १३४६-१३५३ या काळात युरोप आणि आशियायच्या मोठ्या भागावर ब्लॅक डेथची साथ आली होती. यात यर्सीनिया पेस्टीन नावाचा विषाणू उंदारांमार्फत सगळीकडे पसरला आणि या महामारीत युरोपातील अर्ध्याहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या महामारीमुळे युरोपात कामगारांची कमतरता निर्माण झाली त्यामुळे कामगारांचे पगार वाढले आणि दासपरंपरा नष्ट झाली. यातूनच आधुनिक यंत्र बनवण्याला वाव मिळालं असं सांगितलं जात. 

७) कोकोलिझ्ट्ली महामारी

इसवी सन १५४५-१५४८ दरम्यान मेक्सिको आणि मध्य अमेरिकेच्या भागात एस पॅराथायपी सी नावाच्या विषाणूमुळे महामारी पसरली होती. ही महामारी कीटकांमुळे पसरली होती त्यामुळे याला कोकोलिझ्ट्ली असं म्हटलं गेलं. या महामारीपूर्वी या भागात दुष्काळ पडला होता त्यामुळे लोकांची प्रतिकारक्षमता कमी झाली होती. त्यानंतर आलेल्या या महामारीत तब्बल दीड कोटीच्या आसपास लोकांचा मृत्यू झाला होता. 

८) अमेरिकेतील महमरीची साथ

अमेरिका खंडाचा शोध लागल्यानंतर युरोपियन लोक जेव्हा तिथे गेले तेव्हा स्वःताचे आजार देखील घेऊन गेले. यात प्लेग, कांजण्या, सर्दी अशा रोगांचा समावेश होता. मुळात अमेरिका खंडात हे आजार नसल्यामुळे तेथील लोकांवर हे आजार जीवघेणे ठरले आणि १६ व्या शतकात अमेरिकेतील ९० टक्के स्थानिक आदिवासी यात मृत्युमुखी पडले. यामुळे प्रतिस्पर्धी संपले आणि युरोपियन लोकांनी अमेरिका खंड स्वतःच्या ताब्यात घेतला.

९) लंडनमधील प्लेगची साथ

१६६५-६६ या वर्षात किंग चार्ल्स द्वितीय यांच्या काळात उंदरांच्या पिस्सुंमुळे लंडन शहरात प्लेगची साथ आली होती. या साथीत लंडन शहरातील जवळपास १५ टक्क्याहून अधिक लोक मारले गेले. ही संख्या अंदाजे १ लाखापेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं. या साठीनंतर लंडन शहराला आग लागली ज्यात लंडन शहराचा मोठा भाग जाळून राख झाला होता.

१०) मर्सेइलची प्लेगची साथ

इसवी सन १७२० मध्ये फ्रांसच्या मर्सेइल शहराच्या बंदरावर ग्रँड सेंट अँटोइन नावाचन जहाज उतरलं होतं. या जहाजातील लोकांना प्लेगची लागण झाली होती त्यामुळे या जहाजाला काही दिवस बाजूला ठेवण्यात आलं. परंतु जहाजावरील उंदीर शहरात पसरले आणि प्लेगची साथ आली. यात मर्सेइल शहरातील जवळपास १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 

याच शहरात जहाजाला वेगळं म्हणजेच क्वारंटाईन करण्यात आलं होतं, यातूनच क्वारंटाईनची सुरुवात झाली असल्याचे सांगितले जाते. 

११) रशियातील प्लेगची साथ 

१७७०-७२ दरम्यान रशियाची सम्राज्ञी कॅथरीन द्वितीय हिचं काळात मास्को शहरात प्लेगची साथ पसरली होती. या साथीचा प्रभा इतका मोठा होता की, राणीने मास्कोमधील सर्व कारखाने दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे आदेश दिले होते. लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं, आर्चबिशप लोकांना प्रार्थनेसाठी एकत्र येऊ नका असं सांगत होते. तेव्हा क्वारंटाईन केलेल्या लोकांनी बिशपचीच हत्या केली होती. या साथीत १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 

१२) रशियातील फ्लूची साथ 

१८८९-८० या वर्षात रशियामध्ये अचानक फ्ल्यूची साथ आली होती. आधुनिक रेल्वे आणि दळणवळणाच्या साधनांमुळे फ्ल्यू झपाट्याने पसरला आणि ५ आठवड्यात रशियातील १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

१३) पोलिओची साथ

१९ व्या शतकात पोलिओच्या साथीने बऱ्याच लोकांचा जीव गेला होता आणि लाखोंच्या संख्येने लोक अपंग झाले होते. १९१६ मध्ये एकट्या न्यूयॉर्क शहरात पोलिओचे २७ हजार केस आले होते त्यात ६ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. जगभरात हाच आकडा लाखोंच्या संख्येत होता. १९५४ मध्ये पोलिओची लस उपलब्ध झाली आणि पोलिओ निर्मूलनाला सुरुवात झाली.

१४) स्पॅनिश फ्ल्यू

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सैनिकांमध्ये फ्ल्यूची लागण झाली होती. युद्धातील अस्वच्छता, मृतदेश आणि खाण्यापिण्याची कमतरता याच्यामुळे हा फ्ल्यू आणखीनच वाढत गेला. हा स्पॅनिश फ्ल्यू लवकरच जगभरात पसरला आणि जगातील तब्बल ५० कोटी लोकांना याची लागण झाली होती. यात जगातील तब्बल १० कोटी लोकांचा मृत्यू झाला होता.

१५) एशियन फ्ल्यू

फेब्रुवारी १९५७ सिंगापूर आणि चीनच्या हॉंगकॉंग शहरात एशियन फ्लूची लागण झाली होती. लवकरच ही साथ अमेरिकेत देखील पसरली होती. चीनमधील एव्हियन फ्लूच्या विषाणुंमुळे पसरलेल्या या साथीत अमेरिकेत १ लाख १६ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तर जगभरात तब्बल ११ लाख लोक यात मृत्युमुखी पडले होते.

१६) एचआयव्ही

१९२० च्या सुरुवातीला आफ्रिका खंडात एचआयव्ही एड्सचे विषाणू चिंपांझीमधून माणसामध्ये पसरले होते. १९८० च्या दरम्यान हे विषाणू संपूर्ण जगात पसरले, या आजारावर कोणत्याही प्रकारचा उपचार नसल्यामुळे जगभरात जवळपास साडेतीन कोटी लोकांचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला जगात तब्बल ४ कोटींपेक्षा अधिक लोक एचआयव्हीने बाधित आहेत. परंतु १९९० नांतर औषधोपचार उपलब्ध झाल्यामुळे हा रोग नियंत्रणात आला आहे. 

१७) एच १ एन १ स्वाईन फ्लू

२००९ अमेरिकेच्या मेक्सिको शहरात एच १ एन १ च्या व्हायरसचा नवीन स्ट्रेन तयार झाला ज्याला स्वाईन फ्ल्यू म्हणून ओळखलं जातं. एका वर्षाच्या आता स्वाईन फ्लूची साथ जगभरात पसरली आणि १ अब्जाहून अधिक लोकांना याची लागण झाली. या साथीत जवळपास ६ लाख लोकांचा मृत्यू झाला असं सांगितलं जातं. ६५ वर्षावरील लोकांनी एच १ एन १ची रोगप्रतिकारक्षमता विकसित केली होती त्यामुळे मृत्यू झालेल्या लोकांमध्ये वृद्धांची संख्या कमी होती. 

१८) इबोलाची साथ 

२०१४ मध्ये पश्चिम आफ्रिकेमध्ये इबोला रोगाची सुरुवात झाली. हे विषाणू वटवाघळांमधून माणसात आले होते, त्यानंतर हा रोग सर्वत्र पसरला. २०१४-१६ मध्ये पश्चिम आफ्रिकेत इबोलाचे २८ हजार केस आढळले ज्यात ११-१२ हजार लोकांचा मृत्यू झाला. ही साथ बाहेर देशात देखील पसरली परंतु इतरत्र तेवढी मारक ठरली नाही, सध्या यावर कोणतीही लस उपलब्ध नाही.

१९) झिंका व्हायरस

२०१५ मध्ये दक्षिण आणि मध्य अमेरिकेच्या भागात एडिस नावाच्या डासांमधून झिंका व्हायरसच्या प्रसारा सुरुवात झाली होती. या भागात एडिस डासांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते त्यामुळे हा व्हायरस या भागात मोठ्या प्रमाणावर पसरला. या व्हायरसचा प्रौढ लोकांना धोका नसतो परंतु या व्हायरसमुळे गर्भावस्थेतीलभ्रूणांचा मृत्यू किंवा त्यांना आयुष्यभरासाठी अपाय होऊ शकतात.

२०) कोरोना महामारी

आधुनिक काळात औषधोपचार विकसित झाल्यानंतर आलेली सगळ्यात घटक महामारी म्हणजे कोरोनाची साथ. सार्स सीओव्ही २ म्हणजेच कोरोना व्हायरस २०१९ मध्ये पसरायला लागला आणि डिसेंबर २०२० पर्यंत जगभरातील ६५-६६ कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आणि जवळपास ६७ लाख लोकांचा यात मृत्यू झाला असल्याचे सांगितले जाते.

अजून एक भर पडती यलो फिवरच. अमेरिकेत याचा नागरिकांना करावा लागला होता. मात्र यलो फिवरचा परिणाम जास्त झाला नाही.

या २१ महामारींमुळे जगातील लाखो-करोडो लोकांचा मृत्यू झाला आहे. नुकतंच कोरोनाच संकट टळलं होतं असं वाटत असतांना चीनमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंत आल्यामुळे जगभरात चिंता वाढली आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.