आजवर नेहरू मोदींसारखे नेते टाईम मासिकावर झळकले होते, आता या शेतकरी महिला चमकत आहेत.

जगातल्या सगळ्यात फेमस साप्तहिकांपैकी एक म्हणजेच ‘टाइम मॅगझीन’ आहे. टाइम मॅगझीनचं प्रकाशन अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात होतय. टाइम मॅगझीनची स्थापना १९२३ साली झालेली. स्थापना होऊन ९८ वर्ष झालीये. पण टाइम मॅगझीनची ना लोकप्रियता कमी झाली ना प्रभाव कमी झालाय. टाइम मॅगझीनबद्दल आजही जगभर चर्चा असते. सर्व जगभरात टाइम मॅगझीनच्या आव्रुत्त्या प्रसिद्ध होतायत.

या साप्ताहिकात नुसत नाव जरी आल तरी लोकांना आपल्यापुढ आभाळ ठेगण झाल्यासारखं वाटतय. कव्हरवर फोटो छापून येण म्हणजे लई मोठ स्वप्न साकार होण्यासारखं आहे. तस तर या साप्ताहिकाच्या कव्हरवर झाळकणारी बहुतांश लोकं भारताबाहेरचीच असतात. पण असे काही भारतीय आहेत ज्यांनी कधीकाळी टाइम मॅगझीनच्या कव्हरची जागा व्यापली होती. पण हे सगळ आम्ही तुम्हाला का सांगतोय, हे ही समजून घ्या.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध दिलीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज शंभर दिवस पूर्ण होतायत. या पार्श्वभूमीवर टाइम मॅगझीननं आपल्या कव्हरवर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांच्या फोटोला जागा दिलीय.

एवढचं नाय तर टाइम मॅगझीननं यावेळेस आपल्या आंतरराष्ट्रीय मासिकाचं कव्हर पेज देल्लीच्या सीमेवर आंदोलकांच नेतृत्व करणाऱ्या महिलांना समर्पित केलय.

‘मला भीती दाखवली जाऊ शकत नाही. मला खरेदी केल जाऊ शकत नाही’ अशा आशयाची टॅगलाईन देखील कव्हरवर छापण्यात आलीये. कव्हरवर असलेल्या फोटोत कृषी कायद्यांविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनात घोषणाबाजी करणाऱ्या शेतकरी महिला दाखवल्या गेल्यात.

गेल्या ९८ वर्षात आतापर्यंत फक्त १७ भारतीयांनी टाइम मॅगझीनच्या कव्हरची जागा व्यापलीये. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर देशासाठी पंतप्रधान म्हणून योगदान दिलंय, अशी थोडकीच लोकं टाइम मॅगझीनच्या कव्हरवर झळकली आहेत. तर अलीकड काही खेळाडू व सिनेकलाकारांनी देखील टाइम मॅगझीनच्या कव्हरवरची जागा व्यापलीये.

दरम्यान, अशा जगप्रसिद्ध साप्ताहिकाच्या कव्हरवर आंदोलन करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा फोटो झळकल्यान टाइम मॅगझीन आणखीनच चर्चेत आलय. तर भिडूंनो आज आपण जाणून घेणार आहोत देशातल्या अशा लोकांना ज्यांनी टाइम मॅगझीनच्या कव्हरवर स्थान मिळवलं.

१. महात्मा गांधी :

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे एकदा दोनदा नव्हे तर तीनदा टाइम मॅगझीनच्या कव्हरवर झळकले होते. सत्य, अहिंसा आणि देशाप्रती असणार अतूट प्रेम पाहता त्यांना टाइम मॅगझीनच्या कव्हरवर तीनदा स्थान देण्यात आल होत. १९३०, १९३१ आणि १९४७ साली गांधीजी टाइम मॅगझीनच्या कव्हरवर झळकले होते. एवढच काय तर ‘टाइम पर्सन ऑफ द ईयर’ हा मनाचा पुरस्कार देखील गांधीजीनाच मिळाला होता. हा पुरस्कार मिळवणारे गांधीजी पहिले भारतीय आहेत.

२. सुभाष चंद्र बोस :

सुभाष चंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले एक अग्रेसर नेते होते. दुसर महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीन आझाद हिंद फौज स्थापन केली होती. अखंड भारत सुभाषबाबूंच्या योगदानाला कधीही विसरू शकत नाही. ‘तुम मुझे खून दो मैं तुझे आजादी दूंगा’, असं म्हणत त्यांनी स्वातंत्र्यलढा नेटान पुढ नेला होता. नेताजींच्या अशा महान कार्यामुळचं त्यांना टाइम मॅगझीननं १९३८ साली कव्हरवर स्थान दिल होत.

३. सरदार वल्लभभाई पटेल :

सरदार वल्लभभाई पटेलांना ‘लोह पुरुष’ म्हणूनच जग ओळखत. भारत छोडो आंदोलनापासून स्वातंत्र्यानंतर संस्थानं भारतात विलीन करण्यापर्यंत पटेल देशासाठी झटत राहिले. ५०० पेक्षा जास्त संस्थानं भारतात विलीन करण्याची किमया साधण्याच श्रेय त्यांनाच जात. याचीच पावती म्हणून  १९४७ साली टाइम मॅगझीनच्या कव्हरवर पटेलांना स्थान दिल गेल होत.

४. जवाहरलाल नेहरू :

भारताचे पहिले पंतप्रधान ‘चाचा नेहरू’ म्हणून ओळखे जाणारे जवाहरलाल नेहरू यांनी तर टाइम मॅगझीनच्या कव्हरवर येण्यात सगळ्यांचा विक्रम मोडीत काढलाय. टाइम मॅगझीनच्या कव्हरवर सहा वेळा झळकणारे ते पहिलेच भारतीय आहेत. १९४२, १९४९, १९५१ ,१९५६,१९५९ आणि १९६२ साली नेहरू चाचांनी टाइम मॅगझीनच्या कव्हरवर स्थान मिळवल होत.

५. लाल बहादुर शास्त्री :

‘जय जवान जय किसान’चा नारा देणारे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनीही टाइम मॅगझीनच्या कव्हरवर आपली जागा निर्माण केली होती. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनंतर देशाचं काय होईल? अशा अवस्थेत देश असताना शास्त्रींनी देशाचा गाढ उत्तमरीत्या चालवला. ज्याची दाखल टाइम मॅगझीनलाही घ्यावीच लागली. लाल बहादूर शास्त्रींना मृत्योत्तर १९६५ साली टाइम मॅगझीनच्या कव्हरवर फोटो छापला गेला होता.

 ६. इंदिरा गांधी :

देशाच्या पाचव्या तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींनी काम पाहिलं. त्यांना ‘आयर्न लेडी’ म्हणूनही जग ओळखत. त्यांना १९६६ साली पहिल्यांदा टाइम मॅगझीनच्या कव्हरवर स्थान मिळाल होत. १९७१ साली भारत पाकिस्थांमध्ये नाजूक परिस्थिती असताना इंदिराजींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी टाइम मॅगझीननं दुसऱ्यांदा इंदिराजींना कव्हरवर स्थान दिल होत.

७. मदर तेरेसा :

नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांनी संपूर्ण आयुष्य समाज सुधारणेसाठी वेचलं. गरीब, अनाथ आणि रुग्णांची सेवा करण्यात त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं. मदर तेरेसा याचं हाच चांगुलपणा पाहुण १९७५ साली पहिल्यांदा व मृत्योत्तर २००७ साली दुसर्यांदा टाइम मॅगझीननं आपल्या आंतरराष्ट्रीय कव्हरवर स्थान दिल.

८. डॉ. मनमोहन सिंग :

मनमोहन सिंग १९९१ ते १९९६ या काळात भारताचे अर्थमंत्री होते. २००४ ते २०१४ पर्यंत तब्बल दहा वर्ष त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून कारभार पाहिला. भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये मनमोहन सिंग मोठ योगदान मानल जातय. मनमोहन सिंग यांनाही आशिया आवृत्तीच्या टाइम मॅगझीननं २०१२ साली कव्हरवर स्थान दिल होत. पण मॅगझीननं त्यांचा ‘अयशस्वी’ पंतप्रधान म्हणून उल्लेख केला होता.

९. नरेंद्र मोदी :

नरेंद्र मोदींचा समावेश जगातल्या सर्वात बड्या नेत्यांमध्ये केला जातो. मोदी त्यांच्या वक्तृव, नेतृत्व आणि कर्तृत्वामुळ जगभरात फेमस आहेत. त्यामुळच टाइम मॅगझीननं मोदींना ‘टाइम पर्सन ऑफ द ईयर’ यानं सन्मानित केल होत. राष्ट्रपिता महात्मा गांधींनंतर हा सन्मान मिळवणारे मोदी पहिलेच भारतीय आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, डोनाल्ड ट्रंप तसच फेसबुकचे संस्थापक मार्क जुकर्बर्ग अशा बड्या लोकांना माग टाकत हा सन्मान मोदींच्या नावे झालाय. २०१२, २०१५ आणि २०१९ या तीन साली मोदी टाइम मॅगझीनच्या कव्हरवर झळकलेत.

१०. शेतकरी आंदोलक महिला :

केंद्र सरकारन पारित केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी गेल्या १०० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करताहेत. यात महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या आंदोलनात तरुण, वृद्ध महिलांचाही समावेश आहे. कडाक्याच्या थंडीत महिला पुरुषांच्या बरोबरीन तग ठरून आहेत. या आंदोलनाचे पडसाद देशासह जगभरात उमटताहेत. अशातच  टाइम मॅगझीनच्या कव्हरवर दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या महिलांना आपल्या आंतरराष्ट्रीय कव्हरवर स्थान दिलंय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.