साडे पाच फुटी बॉलरच्या बाउन्सरने पाकिस्तानची झोप उडवली होती.

भारताच्या सुरवातीच्या क्रिकेट काळात वेगवान गोलंदाजांचा दुष्काळ होता. भारतातल्या त्याकाळच्या प्रत्येक युवकाला बॅट्समन आणि स्पिन बॉलर बनायचं होत. येणाऱ्या नवीन पिढीला वेगवान गोलंदाजीबद्दल मार्गदर्शन करेल असा कोणता खेळाडू नव्हता.

त्यावेळी १९५९ साठच्या सुमारास एक खऱ्या अर्थाने जलदगती गोलंदाज भारताला मिळाला. ते होते

रमाकांत भिकाजी देसाई.

या अस्सल मराठमोळ्या खेळाडूच्या हातून चेंडू अक्षरशः आग ओकायचा. त्यांच्या बॉलिंगची चर्चा अगदी परदेशातील क्रिकेट शौकीन लोकं आवर्जून करायचे.

रमाकांत देसाई यांचं टाईनी टायटन हे नाव कस पडलं तर,

रमाकांत हे त्याकाळच्या वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत उंचीने अगदीच लहान होते.

वेस्ट इंडिज, इंग्लंड सारख्या संघाच्या जलदगती खेळाडूंची उंची हि ६ फुटांइतकी असे आणि ते अंगाने धष्टपुष्ट असे.

पण रमाकांत देसाई हे शरीरयष्टीने साधारण होते आणि त्यांची उंची ५ फूट ४ इंच असल्याने त्यांना टायनी टायटन म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

रमाकांत देसाई ज्यावेळी बॉलिंग करायचे त्यावेळी त्यांच्या रनअपकडे सगळ्यांच्या नजरा रोखलेल्या असायच्या. मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर टेनिस बॉलवर ज्यावेळी ते खेळत होते त्यावेळी जे के मेनन हे प्रसिद्ध पत्रकार होते. त्यांना बॉल वेगाने फेकण्याचा आवाज आला म्हणून ते बाजूला उभे राहून रमाकांत देसाईंची बॉलिंग बघू लागले. टेनिस बॉल ते इतक्या वेगाने फेकायचे कि बॅट्समनला बॉलच दिसत नसे.

१९५८-५९ साली वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर आला होता, त्यावेळी १९ वर्षांच्या रमाकांत देसाईंचाही भारतीय संघात समावेश होता. भारताकडे फास्ट बॉलर नव्हते म्हणून रमाकांत देसाईंना खेळवण्यात आलं होतं. आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर देसाईंनी वेस्ट इंडिजच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं.

भारतात त्याकाळी वेगवान गोलंदाज नसल्याने बाउन्सर बद्दल भारतीय बॅट्समन लोकांना माहिती नव्हतं. आणि ते सरावाही फक्त स्पिन  मिडीयम पेसवर करायचे. त्यावेळी रमाकांत देसाईंनी हा सगळा प्रकार बंद करून वेगवान गोलंदाजी आणि बाउंसर यांना प्राधान्य दिलं.

हनीफ मोहम्मद हा त्याकाळचा पाकिस्तानचा जबरदस्त बॅट्समन होता. खोऱ्याने धावा जमा करणाऱ्या हनीफला कुठलाही गोलंदाज बॉलिंग टाकायला धजावत नसे. त्याला आउट करणं म्हणजे एक प्रकारचं दिव्य होत. म्हणजे त्याकाळी पाकिस्तान म्हणायचा कि हनीफ जैसा खेल के बताव.. म्हणजे त्याकाळी हनीफ मोहम्मद जैसा कोई हार्डीच नव्हता.

ज्यावेळी १९६०च्या दौऱ्यावर तो आला तेव्हा तो सलग तीन शतकं ठोकून आला होता. प्रचंड चर्चेत असणारा हनीफ मोहम्मद पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा आत्मा होता. भारत विरुद्ध पाक लढतीमध्ये तो काहीतरी धमाकेदार करणार असल्याचं वर्तवलं जात होत.

ज्यावेळी पाकिस्तानसोबत सामना सुरु असताना हनीफ समोर रमाकांत देसाई होते. आता देसाईंची धुलाई होणार असं दिसत होतं कारण ते नवखेच खेळाडू होते. पण देसाईंच्या बॉलिंगचा सामना हनीफ मोहम्मदला करता आला नाही. पहिल्या तीच चार चेंडूंवर इतके खतरनाक बाउन्सर पडले कि हनीफ मोहम्मदला दिवसा तारे दिसू लागले.

एका चेंडूवर देसाईंनी असा बाउन्सर टाकला कि हनीफ अक्षरशः गडबडला आणि त्या बाउन्सरपासून वाचताना हनिफची टोपी देसाईंनी उडवली. मैदानात अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट झाला. पाकिस्तानचा हार्डीच्च असलेला बॅट्समन पुढच्याच चेंडूवर स्लिपमध्ये कॅच देऊन बाद झाला.

रमाकांत देसाईंमुळे भारतीय संघात एक वेगळी ऊर्जा आली होती. वेगवान गोलंदाजी आणि बाउन्सरचा तिखट मारा यामध्ये देसाईंचा नाद कोणी करत नसे. त्यावेळी ते एकटे २५-३० ओव्हर एका सेशनमध्ये टाकायचे कारण दुसऱ्या एंडला सपोर्टिव्ह बॉलर नसायचा.

यशाच्या शिखरावर असताना केवळ २९ व्या वर्षी त्यांनी भारतीय क्रिकेटला रामराम ठोकला. १९६८ साली त्यांनी शेवटचा कसोटी सामना खेळला. रमाकांत देसाईंनी जी वेगवान आणि बाउन्सर बॉलरची जी पायाभरणी केली ती आज आपल्याला भारतीय संघात पाहायला मिळते.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.