‘फ्रेंन्डझोन’ झालाय पण कळत नाही, मग हे वाचा.

प्रेमाशप्पथ. आम्ही आपणाला जे काही सांगू दे शप्पथ खरं खरं सांगू. तसही आम्हाला कोणाच्या भावनांशी खेळायला आवडत नाही. त्याचं महत्वाच कारण म्हणजे आमच्याकडे संपादकांपासून ते आम्हाला चहा पुरवणाऱ्यापर्यन्त सर्वांचाच कधीना कधी फ्रेन्ड झोन झाला आहे. प्रेमात पडणं, प्रेमात फसणं याहून प्रेमात फ्रेन्डझोन होणं हे सर्वात अपमानास्पद मानलं गेलं आहे. आत्ता राजकारणात बघायचं झालं तर शिवसेनेचा फ्रेन्डझोन झाला आहे हे जगजाहिर आहे पण फ्रेन्डझोनच अस असतय की, “कळतय वो पण वळत नाय !” 

तर तुम्हाला कळायसाठी आम्ही खास मटरेल आणलय ते म्हणजे प्रेमात तुमचा फ्रेन्डझोन झालाय हे कस ओळखायचं.

१) तुमच्या सोबत बाहेर जाताना नटत नसेल तर ! 

तुम्ही खडकवासला, सिंहगड, पन्हाळा, मरिन ड्रायव्ह गेला बाजार अजिंठाचा वगैरे प्लॅन केला. ती तुमच्यासोबत आली मात्र हाय दैय्या ती रोजच्या सारखीच आहे की !! ना भारी मेकअप ना लिपस्टिक. बर दरवेळी यालाच नटणं म्हणत नाहीत साधं राहण्यात पण सौदर्य असतं आणि साध्या राहणाऱ्या मुली पण खुलून दिसण्याची काळजी घेतात मात्र तुमच्या सोबत ती येताना आहे अशीच येत असेल तर समजून जा भिडू आपला बाजार उठायला सुरवात झालेय. 

२) फिरायला जाताना मित्र मैत्रिणींना घेवून येणे  ! 

सच्चा प्यार हमेंशा एकेला आता हैं ! मग ते कुठपण असो. पण तुम्ही कायतर प्लॅन करताय आणि ती थांब हं तिला विचारते ह्याला विचारते आपण सगळे जावू करत गाव गोळा करत असेल तर समजून जा पुन्हा एकदा तुमचा आठवडी बाजार जवळ आलाय.

३) तीचा क्रश आणि ती ! 

मोकळा संवाद हि कोणत्याही नात्याची सुरवात असते. पण किती मोकळा हे कोण सांगत नसतय. थांबा आम्ही सांगतो किती मोकळा ते. कसय समोरची मुलगी तुम्हाला तिला कोण आवडत सांगू लागली तर टेन्शन नाही. पण सकाळ संध्याकाळ तेच ते सांगाय लागली तर आणि त्याच्यात आणि आपल्यात काहीच साम्य नसेल तर ओळखून जायचं ! आपला बाजार उठणार आहे. 

४) खांदा ! खांदा !! खांदा !!! 

समजा ती अगोदर कोणत्यातरी रिलेशनशिपमध्ये होती. आत्ता तस काहीच नाही पण तिला त्याची आठवण येते. त्यात तिच्यावर किती अन्याय झाला म्हणून ती सारखं सारखं तुमच्याकडं जनहित याचिका सोडत असेल तर वेळीच समजून जायचं गेला बाजार आपण पालखीचे भोई झालोय. हे कधीना कधी उचलून दुसरीकडं ठेवायला लागणार आहे. आपल्याला वाटत राहणं किती हक्काने सांगतेय तर ते तस नसत. त्याला सिंम्पथी गेन प्रकार म्हणतात. त्यातून तुमचा गेम होतो इतकचं. 

Screen Shot 2018 08 21 at 11.33.54 AM
फ्रेन्डझोनचे कट्टर विरोधक – त्याच काळात यांच ऐकलं असत तर तुमचा आज फ्रेन्डझोन झाला नसता. “एक लडकां औंर लडकी कभीं दोस्त नहीं हो सकतें.”

५) कौतुक केलं तर ती मज्जा करत असेल तर ! 

म्हणजे कस तर तुम्ही अतीव प्रेमातून कधीतरी तिला काहीतरी कॉम्पीमेंट द्यायचा प्रयत्न करता. धाडस करुन तिच्या मेहंदीच, तिच्या केसांच, तिच्या नेलपॉलिशचं लयच लय तर तिच्या कुत्र्यामांजरांच तरी धाडस करुन कौतुक करता. कौतुक करुन तुम्ही किंगकॉंग पिक्चरमधल्या माकडासारखं नुसतं तोंडाकडं बघत बसता. अशा वेळी ती फक्क हसून तुमचं कौतुक मजेमजेत घेते, काय सिरीयसनेस दाखवत नाही तर  समजून जा एखाद्या सर्वसामान्य माणसासारखं तुमची कॉम्प्लिमेंट घेण्यात आलेली आहे. 

तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. आत्ता अॅडव्हान्समध्ये फ्रेन्डझोन मधून बाहेर पडण्याचा सल्ला. रुममध्ये उत्तर दिशेला तोंड करुन मोहनीश बहलचा फोटो लावा आणि एक लडकां औंर लडकीं कभीं दोस्त नही हो सकते हा डॉयलॉग दिवसातून १०१ वेळा म्हणा. गुण येईल. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.