टोकियो ऑलिम्पिकमुळे एक झालं, क्रिकेट सोडून इतर खेळाडूंचा देखील भाव वधारला…

टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये भारतीयं खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत जवळपास 7 मेडल्स आपल्या देशाला मिळवून दिले. ज्यात 1 गोल्ड, 2 सिल्वर आणि 4 ब्रॉंझंचा सामावेश आहे. 

मेडल्स जिंकल्यानंतर खेळाडूंच्या कुटुंबीयांकडून त्यांचा सत्कार तर होतोयचं, पण देशभरातही त्यांचं कौतुक केलं जातयं, त्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतयं, एवढचं नाही तर मोठं – मोठ्या कंपन्या त्यांना आपला ब्रँड अँबेसिडर  बनवण्यासाठी अप्रोच करतायेत.

अनेक कंपन्यानी तर आधीचं खेळाडूंशी डील करून आपला नंबर लावलायं. त्यात आणखी कंपन्या यासाठी रांगेत उभ्या आहेत. आता अर्थातचं हे नावलौकिक मिळाल्याने खेळाडूंच्या फीजमध्येही भरगोस वाढ झालीये.

नीरज चोप्रा :

भारताला यंदाच्या वर्षी एकमेव गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 10 पटीने वाढ झालीये. नीरजला मॅनेज करणारी फर्म जेएसडब्ल्यूचे सीईओ मुस्तफा घौस यांनी सांगितलं की, ही वाढ त्यांच्या नॉन क्रिकेटींग अचिव्हमेंटमूळे झालीये.

आतापर्यंत मार्केटमध्ये एकतर क्रिकेटपटू किंवा पीव्ही सिंधू, मेरी कोम आणि सानिया मिर्झा सारख्या महिला खेळाडूंचे वर्चस्व होते. नीरजने ही धारणा मोडीत काढली. तज्ञांचा अंदाज आहे की, नीरजची वार्षिक ब्रँड एंडोर्समेंट फी सुमारे 2.5 कोटी रुपये आहे. जी ऑलिम्पिकपूर्वी 20-30 लाख रुपये होती

मीराबाई चानू :

टोकियो ऑलिंपिक 2021 च्या स्पर्धेत देशासाठी पहिलं मेडल मिळवून देणारी मीराबाई चानू. लहानपणी जंगलातून लाकूड आणणाऱ्या मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 202 किलो वजन उचलले. तिला वेटलिफ्टिंगमध्ये सिल्वर मेडल मिळाले.

जिंकल्यानंतर एका मुलाखतीत मीराबाई म्हणाली की,

घरी परतल्यावर तिला पिझ्झा खायचा आहे. डोमिनोजने पटकन यावर प्रतिसाद दिला आणि तिला आयुष्यभर मोफत पिझ्झा देण्याचे वचन दिले. परत आल्यावर, डोमिनोजने केवळ पिझ्झाच पाठवला नाही तर चानूबरोबर बिझनेस डीलही केली.

मीराबाईला मॅनेज करणारी कंपनी आयओएस स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल त्रेहान म्हणतात की, मेडल जिंकल्यानंतर चानूला अनेक ब्रँडच्या ऑफर येतायेत. यामध्ये स्टील, इन्शुरन्स, बँकिंग, अॅड्युटेक, एनर्जी ड्रिंक्स आणि ऑटोमोबाईल सारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. सध्या चानूने एमवे इंडिया, मोबिल इंजिन ऑइल, एडिडास ग्लोबल यांच्याशी करार केला आहे. त्रेहानच्या मते, चानूची सध्याची एंडोर्समेंट फी वार्षिक एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या आधी ती सुमारे 10 लाख होती.

पी. व्ही सिंधू :

टोकियो ऑलिम्पिकपूर्वीही पीव्ही सिंधू अनेक ब्रँड्सची आवडती राहिलीये. कारण सिंधूने याआधीच्या ऑलम्पिक स्पर्धेतही भारताला मेडल जिंकून दिलेयं.

सिंधूला मॅनेज करणारी कंपनी बेसलाइन व्हेंचर्सचे यशवंत बियाला यांच्या मते, अनेक नवीन ब्रॅण्ड्सने सिंधूशी संपर्क साधला आहे आणि त्यांना किमान 2-3 वर्षांचा करार करायचायं. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी सिंधू एकमेव भारतीय महिला आहे. त्यांच्या वार्षिक अनुमोदन शुल्कात 60-70% वाढ दिसून येत आहे.

बजरंग पुनिया :

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकण्यापूर्वी बजरंग पुनियाने वल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतही चमत्कार केले आहेत. तेथे तीन मेडल जिंकणारा तो भारताचा एकमेव कुस्तीपटू आहे. ऑलिम्पिकपूर्वीही त्याचे अनेक ब्रॅण्ड्स होते, पण पदक जिंकल्यानंतर डझनभर कंपन्या रांगेत उभ्या आहेत. नीरज चोप्रा प्रमाणेच त्याचे मॅनेजमेंट जेएसडब्ल्यू फर्म करते. बजरंग पुनियाची ब्रँड व्हॅल्यू जवळपास 100% वाढली आहे.

रवी दहिया एक युवा खेळाडू आहे. रौप्य पदक जिंकल्यानंतर त्याच्याकडे अनेक ब्रँडच्या ऑफर आहेत. कुस्तीपटू सुशील कुमारने ऑलिम्पिक पदक पटकावले तेव्हा त्याला अनेक मोठ्या ब्रॅण्डच्या ऑफरही आल्या. उद्योग तज्ञांचा म्हणण्यानुसार त्याची ब्रँड व्हॅल्यू जवळपास 60% वाढली आहे.

या व्यतिरिक्त, Lovlina Borgohain बॉक्सिंग मध्ये ब्राँझ मेडल पदक जिंकले. त्यांची ब्रँड व्हॅल्यू देखील जवळपास 100%वाढली आहे. याशिवाय, ब्राँझ मेडल जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे गोलकीपर पीआर श्रीजेसची ब्रँड व्हॅल्यू सुमारे 150% वाढली आहे.

ऑलिम्पिकच्या इतर खेळाडूंना देखील ब्रँडची साथ मिळालीये. धावपटू हिमा दासने एशियन गेम्स 2018 मध्ये तीन मेडल जिंकून स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अॅडिडासशी डील केलीये. तसेच टोकियो ऑलिम्पिक 100 मीटर क्वालिफायर दुती चंद यांना सेन्को गोल्ड अँड डायमंड्सची ब्रँड अॅम्बेसेडर करण्यात आलेयं.

हे ही वाचं भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.