टोकियो ऑलिम्पिकमध्ये घोड्यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले !

माणसात आणि घोड्यात फरक तो काय ? या प्रश्नाचे उत्तर एरवी वेगळे मिळाले असते. टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर याचे उत्तर वेगळे आहे. कोरोनामुळे जपानने टोकियो शहरातचे दरवाजे तमाम विश्वासाठी बंद केले आहेत. ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू, अधिकारी, पत्रकार आणि घोडे मात्र याला अपवाद आहेत. मानवा व्यतिरिक्त सध्या टोकियो विमानतळ फक्त घोड्यांसाठी खुले आहे. अश्वरोहन करण्यासाठी सुमारे अडीचशे घोड्यांचे आगमन टोकियोत झाले आहे.

माणसात आणि घोड्यात फरक काय असा विचार करण्यापेक्षा दोघांमध्ये साम्य काय आहे या दृष्टिकोनातून विचार करणे योग्य ठरेल. 

माणसाप्रमाणेच घोड्यांना ही आजार होतात. त्यामुळे कोरोना कालखंडात घोड्यांना ऑलिंपिक स्पर्धेसाठी आणणे मोठे जिकरीचे काम बनले आहे. घोड्यांना मानवाप्रमाणेच लसीकरण करून आणावे लागते. टोकियोकडे प्रयाण करण्याआधी आठवडा क्वारंटाईन झाल्यानंतरच कार्गो विमानातून त्यांची रवानगी होते. प्रत्येक अश्वाचे वजन ५०० ते ६०० किलो असते. त्यांना लाकडाचा छोट्या छोट्या केबिनमध्ये भरण्यात येते.

एका कार्गो विमानात अशी पंधरा ते वीस केबिन्स राहू शकतात. प्रत्येक अश्वाला संपूर्ण वैद्यकीय अहवाल ठेवावा लागतो. त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचा पासपोर्टही असतो. प्रत्येक घोड्याचा दोन महिने आधीपासूनचा वैद्यकीय अहवाल ठेवावा लागतो.

हा दोन महिन्याचा कालावधी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, जपान ऑस्ट्रेलिया, बेलारुस, अर्जेंटिना, नॉर्वे, न्युझीलँड, सिंगापूर, कतार, स्वित्झर्लंड आणि सर्व युरोपीय समुदायातील देशांत व्यतीत करणे गरजेचे आहे. त्यानंतरच अश्वाचा प्रवास सुरू होतो. यावेळी अति किमती असे हे अश्व ऑलिम्पिकसाठी टोकियोनाही बायोबबल राहावे लागणार आहे.कडे रवाना झाले आहेत.

खेळाडू व पत्रकार अधिकाऱ्यां प्रमाणे घोड्यांनाही बायोबबल राहावे लागणार आहे.

स्पर्धेच्या ठिकाणी क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे.

घोड्याच्या वाहतुकीचा हा मामला फारच महागडा आहे. शिवाय नाजूकही आहे. कारण या प्रवासाची सवय करावी लागते. त्यांना अस्वस्थ वाटू नये यासाठी त्यांच्यासोबत त्यांची निगा राखणारे ही घ्यावे लागतात. पशुवैद्यक शास्त्राचे डॉक्टरही सोबत ठेवावे लागतात. पासपोर्ट ठेवावा लागतो. त्यामध्ये त्यांच्या लसीकरणाच्या नोंदी ठेवाव्या लागतात.

फरक एवढाच आहे की घोड्यांना फ्लू इंजेक्शन बरोबरच बूस्टर डोस घ्यावे लागतात. लसीकरणाचा रेकॉर्ड अप टू डेट ठेवावा लागतो व प्रवासाला निघताना पडताळणी होते. व जेथे जाणार त्या देशात आगमनानंतर घोड्याचे दररोज तापमान पाहिले जाते. जपानमध्ये दाखल झाल्यानंतरही घोड्यांना बायोबबलमध्ये राहावे लागले. तेथेही माणसांप्रमाणेच त्यांना स्वतंत्र वेगळे ठेवण्यात आले आहे.

  • विनायक दळवी
विनायक दळवी, हे गेली चाळीस वर्षे कार्यरत असणारे जेष्ठ क्रिडापत्रकार आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.