टॉम अल्टर यांची जिंदगी म्हणजे, अभिनेता, खेळाडू, पत्रकार आणि दर्दी शायर व लेखक..

निळ्या डोळ्यांचा रसिक मनाचा गोरटेला माणूस टिव्हीत दिसला की समजून जाणे हा अस्सल भारतीय दिलाचा माणूस म्हणजे टॉम अल्टर!

२०१७ च्या सप्टेंबरमध्ये टॉम अल्टरसाहेब निवर्तले. शक्तीमानचे गुरू म्हणून त्यांची पहिली ओळख झालेली. त्यांचे निळे डोळे म्हणजे मोहिनी होती – आणि त्यातल्या त्यात त्या काळात इंग्रज वठवायचा म्हणजे गरजेची बाब.

त्याच्यामुळे त्यांना त्याच पठडीतले “डुगना लगान फिरंगी”चेच रोल मिळत गेले खरे मात्र हा माणूस कोणत्याच एका साच्यात बसणार नव्हता. 1976 साली रामानंद सागर यांच्या ‘चरस’मध्ये त्यांनी आपला स्क्रीनवर पहिला परफॉर्मन्स दिला.

भारतात आजपर्यंत लई गोऱ्या लोकांनी आपला तळ ठोकला आहे आणि आपल्या मूळ देशाहून जास्त जीव ह्या देशाला लावलाय. आलेले गोरे मुघल असोत, कोकणात उतरलेले अरब असोत, पुण्यात राहणारे इराणी असोत, बेल्जियममधली आरामातली जिंदगी सोडून झारखंडच्या शेतकऱ्यांसाठी जीव ओतणारा जेन ड्रेझ असो किंवा भारतातल्या लेकरांना जवळचा मित्र वाटणारा रस्टी “रस्किन बॉण्ड” असो की कुंभ मेळ्यात कॅमेरा घेऊन हिंडणारा पत्रकार मार्क टूली असो – बॉलिवूडमध्ये सुद्धा फियरलेस नादिया म्हणून ओळखली जाणारी मेरी इव्हान किंवा इतरही काही युरोपियन लोकांनी बाहेरून येऊन इथल्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींना ओटीत घेऊन जिंदगी काढली आहे.

अल्टर साहेब काय ह्यातलं पहिलं नाव नव्हतं आणि नसतील. मात्र ह्या सगळ्यात अल्टर साहेब एक वेगळं रसायन होतं. दोन खंड आणि तीन देशांचा इतिहास गाठीशी असणारे त्यांचे कुटुंब इथं आपलेपणाने रुजलं.

त्यांची आई बार्बरा आणि वडील जेम्स 1945 साली युरोपातून कराचीला उतरले. जेम्स यांचे अमेरिकन आईवडील1916 पासूनच भारतात येत असत. जेम्स यांचा जन्मच सियालकोट मध्ये झाला होता. जन्मानंतर काही वर्षांतच त्यांना परत अमेरिकेत जावं लागलं मात्र त्यांचं मन तिकडं कधीच रमले नव्हते.

लग्न झाल्यानंतर ते भारतात परत आले, नेमकं तेव्हा जेव्हा भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता.

फाळणीचा झटका इतर कोणत्याही भारतीय कुटुंबाइतकाच अल्टर कुटुंबातील लोकांना बसला. जेम्स आणि बार्बरा भारतात निघून आले मात्र जेम्स यांचे आईवडील मात्र पाकिस्तानच राहू इच्छित होते. त्यांचं पाकिस्तानवर एवढं प्रेम होतं की 1952 ला जेव्हा त्यांचे वडील वारले तेव्हाही त्यांची आई भारतात अली नाही आणि त्यांनी पाकिस्तानच राहणं पसंत केलं.

भारतात 1950 साली मसुरी इथं टॉम अल्टर यांचा जन्म झाला.

त्याच्याहून 6 वर्षे मोठी बहीण मार्था हिचा जन्म अमेरिकेतच झाला होता. त्यांना जॉन नावाचा एक मोठा भाऊही होता. भारत पाकिस्तान युद्धे होत राहिली त्या काळात ह्या भावंडांचे आयुष्य सुखात गेलं. वूडस्टोक स्कुल या प्रसिद्ध शाळेत त्यांना प्रवेश मिळाला अन टॉम यांनी आपली ॲकेडमीक कारकीर्द जोरात सुरू केली.

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांना येल विद्यापीठात प्रवेश मिळाला. मात्र वर्षभरात ते तिथूनही परत आले. पुढची काही वर्षे त्यांनी या त्या अशा खूप सार्‍या गोष्टी करण्याच्या प्रयत्नात घालवली हरियाणामध्ये शाळेत या मुलांना शिकवायला जाणे किंवा आपल्या स्वतःच्या शाळेमध्ये काम करणे, अमेरिकेत हॉस्पिटल मध्ये कामाला लागणे आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी पुण्यातल्या “फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट” इथं प्रवेश घेऊन पिक्चरच्या भव्य दुनियेत प्रवेश करणे!

1972-1974 या दरम्यान त्यांनी पुण्यात अभिनयाचा हा प्रतिष्ठित कोर्स पूर्ण केला.

या घोषणेनंतर ते मुंबईला परतले आणि त्यांनी इतर कोणत्याही नवख्या कलाकारांप्रमाणे मुंबईमध्ये दिग्दर्शक आणि स्टुडिओ यांचे दरवाजे घासायला सुरुवात केली थोड्याच वेळामध्ये त्यांच्या अभिनयाचा व त्यांच्या उर्दू वरील प्रभुत्वाचा गवगवा इंडस्ट्रीमध्ये झाला व त्यांना अनेक चित्रपट आणि मालिकांमधून कामाची संधी मिळाली. त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले व प्रत्येक कार्यक्रमात आपली भूमिका योग्य रीतीने पार पाडली.

मुंबई साठी हा उर्दू बोलणारा मात्र चेहऱ्याने विदेशी वाटणारा कलाकार अगदीच नवखा होता आणि त्याचे नक्की काय करायचे याविषयी कुणालाच जास्त कल्पना नव्हती. त्यामुळेच त्यांना सुरुवातीच्या काळात भारतीय असणारा एकही रोल मिळाला नाही व ते नेहमीच एखाद्या विदेशी माणसाच्या इंग्रजाच्या किंवा तत्सम भूमिकेसाठी वापरले जात.

खानदान या मालिकेचे दिग्दर्शक श्रीधर शिरसागर यांच्या जुगलबंदी या मालिकेमध्ये त्यांना पहिल्यांदा पोलिसाचा रोल करण्याची संधी मिळाली. राधा सेठ या त्या काळच्या प्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री यांना टॉम अल्टर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि गिरीश कार्नाड हेही याच मालिकेत टॉम अल्टर यांच्या बॉसचा रोल करत होते.

या रोलमध्ये त्यांना पहिल्यांदाच पूर्णपणे भारतीयाची भूमिका पार पाडायला मिळण्यास होती आणि या भूमिकेत पुरेशी ताकद होती. मालिकेची कथा अशी होती की पोलिस अधिकार्‍याच्या जागी टॉम अल्टर यांची नियुक्ती होते आणि त्यानंतर त्यांना कोणत्याही गुप्त कामांमध्ये हेर म्हणून जाता येत नाही कारण त्यांचा चेहरा भारतीयांना साजेसा नसतो.

थोड्याफार फरकाने हीच कथा टॉम अल्टर यांच्या ही आयुष्याची होती व म्हणून ते या भूमिकेला आपल्या आयुष्याशी जोडू शकले व त्यांनी ही भूमिका अगदी खुबीने वठवली. दुर्दैवाने त्यांची ही अभिनय कला पाहण्यासाठी आता कोणताही मार्ग उपलब्ध नाही कारण या मालिकेच्या मूळ चित्रफिती काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत.

त्यांनी फक्त मालिका आणि चित्रपटाच नाही तर नाटक आणि इतरही कला अविष्कार सादर केले नसरुद्दीन शहा श्याम बेनेगल यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेत्यांबरोबर त्यांनी नाटकांमध्ये तसेच इतरही काही उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.

त्यांच्या अभिनयाची ख्याती जसजशी बॉलिवूडमध्ये पसरत गेली तसे त्यांना चांगले चांगले राहुल आणि भूमिका मिळू लागल्या व त्यांच्या चेहऱ्याकडे फक्त एक इंग्रज माणूस म्हणून पाहणे थांबले हळूहळू त्यांनी ताकदीच्या भूमिका पाठवायला सुरुवात केली काही काळानंतर दूरदर्शन मधील मालिकांमध्ये त्यांनी मिर्झा गालिब यांची भूमिका केली तसेच मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची ही भूमिका त्यांनी काही चित्रपट व मालिकांमध्ये केली, यामुळे त्यांना लोकांमध्ये चांगली ओळख मिळाली व पठडीतल्या भूमिका सोडून इतरही आव्हानात्मक भूमिका त्यांच्या वाट्याला येऊ लागल्या.

नंतरच्या काळात त्यांनी दिग्दर्शनाचेही चांगले प्रयत्न केले व उर्दूमधील काही श्रेष्ठ कथा व गोष्टी यांच्यावर छोट्या छोट्या फिल्म आणि मालिका बनवण्याचा व त्याला स्वतःच्याच बळावर वितरित करण्याचा प्रयत्नही केला. या भाषेमधील त्यांचे प्रभुत्व त्यांनी स्वतः अभ्यास करून मिळवले होते, आता त्यांचा मुलगा जे मी अल्टर हा सुद्धा आपल्या यूट्यूब शोच्या माध्यमातून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

मध्यंतरीच्या काळात त्यांनी आपल्या अभिनयाबरोबरच एका पत्रकाराच्या भूमिकेचाही स्वीकार केला आणि खेळांमधील पत्रकारिता व विशेषतः क्रिकेट विषयी त्यांना खूप जास्त रुची होती. काही वर्षे शाळामास्तर चे काम करताना मुलांना क्रिकेट शिकवणे हा त्यांचा आवडता उद्योग होता.

त्यांची क्रिकेट वरील समज आणि पत्रकारिता बहरत जात होती आणि 1989मध्ये त्यांनी सचिन तेंडुलकर चा कदाचित पहिलाच टीव्ही इंटरव्यू घेतला व त्याला लोकांमध्ये तुफान प्रतिसाद मिळाला.

त्यांनी कथांमधून क्रिकेट विषयी लेखनही केले व त्या सोबतच काही काळ त्यांनी क्रिकेट सामान्यांचे समालोचन म्हणजेच कॉमेंट्री करण्याचाही प्रयत्न केला. त्याकाळी हिंदी समालोचना मध्ये त्यांचे नाव चांगलेच गाजले होते.

त्यांनी आजवर तीन पुस्तके लिहिली आहेत त्यातील द बेस्ट इन द वर्ल्ड आणि द लोंगेस्ट रेस ही पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत 2008 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला व सरतेशेवटी भारत सरकारने त्यांना या देशाच्या उच्चार नागरी सन्मानाने सन्मानित केले मात्र खरे पाहता हा माणूस त्याहून कितीतरी मोठा भारतप्रेमी, क्रिकेटप्रेमी व सिनेप्रेमी होता.

त्यांनी आपल्याला दिलेल्या अभिनयाच्या आणि जगण्याच्या अनुदान साठी आपण त्यांचे नेहमीच स्मरण करू.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.