पेट्रोल, डिझेलला मागे टाकत टोमॅटोने सोशल मीडिया ‘लाल’ केलाय

सद्या सोशल मिडियावर कोण हवा करतंय ???? इलॉन मस्क ? क्रिप्टोकरन्सी ? विराट कोहली ? कि तैमुर ?? कि नेहेमीच चर्चेत असणारं स्वीगी, झोमॅटो??? यापैकी कुणीच नाही…सद्या सगळीकडे हवा करतंय ते म्हणजे टोमॅटो !!!

होय, सद्या सगळीकडे टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे नुसता बाजार उठलाय..

देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे दर १०० ते १२० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या आंध्र प्रदेशमध्ये तर टोमॅटोची किंमत १०० रुपयांवर पोहोचली आहे.

टोमॅटोच्या किंमती वाढल्यामुळे, ट्विटरवर टोमॅटोच्या मिम्सचा पाऊस पडतोय. साहजिकच आहे त्यावर झोमॅटो, मेकमाय ट्रीप सारख्या ईकॉमर्स कंपन्या देखील मागे नाहीत. तर मेकमाय ट्रीपने टोमॅटोच्या किंमतीपेक्षा मेकमाय ट्रीप परवडेल अशी मिश्कील टिप्पणी केलीये..आता हा भाग वेगळा कि, लोकांनी मेकमाय ट्रीपच्या सर्व्हिसची धिंडवडे काढले असो… 

ऑनलाइन फूड एग्रीगेटर झोमॅटोने युजर्सला वन-स्टार रिव्ह्यू दिल्याबद्दल ट्वीट केले आहे, “मित्रांनो, हा ‘टोमॅटो’च्या किंमती वाढल्यात त्यामुळे झोमॅटो‘ ची काही चूक नाही. झोमॅटोच्या किंमती वाढल्यामुळे झोमॅटोला १-स्टार रेटिंग देऊ नका,” असं Zomato ने ट्विटमध्ये म्हटले आहे…

बरं झोमॅटो सारख्या कंपन्या सोडाच सोशल मिडियावर लोकांनी काय कमी ठेवली नाही. 

काही नेटिझन्सने तर असंही सुचवलं कि, जर तुम्हाला मुलींना प्रपोज करायचा असेल तर अंगठीवर टोमॅटो लावून द्या म्हणजे मुलगी इंप्रेस होईल.  

तर काहींनी सल्ले दिलेत कि टोमॅटो महागला त्यामुळे त्याला तिजोरीत ठेवा, चोरी होण्याची शक्यता आहे. 

कही नेटिझन्सने असेही सांगितले की टोमॅटोच्या किंमती क्रिप्टोकरन्सीच्या किमतींपेक्षा जास्त अस्थिर आहेत. तर काहींनी सर्वसामान्य लोकांसाठी टोमॅटो हि एखादा अमुल्य ठेवा असल्याचं मिम्सच्या स्वरुपात दाखवलं.

टोमॅटोच्या दराने आता पेट्रोलला मागे टाकले आहे. 

तर कोणी म्हणतो की टोमॅटोपेक्षा सोने घेणे चांगले….किंव्हा टोमॅटो विकत घेणे स्टेट्स सिम्बॉल झालेय.

तर काहींना टोमॅटोच्या वाढत्या किमतींबाबत निर्मला सीतारामन यांच्या “मी कांदा खात नाही” या कमेंटवर आठवली अन मिम्स येऊ लागले.. 

टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या आंध्र प्रदेशमध्ये टोमॅटो १०० रुपयांवर पोहचलाय तर चेन्नईतही टोमॅटोचे भाव वधारले आहेत, तिथे १४० रुपये किलोवर पोहोचले आहेत. 

घाऊक विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, हिवाळ्याच्या हंगामात टोमॅटोचा भाव सुमारे २० रुपये किलो असायचा, परंतु आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये असामान्य पावसानंतर आलेल्या पुरामुळे बरीच पिके उद्ध्वस्त झाली आहेत आणि भाव गगनाला भिडले आहेत…हेच कारण टोमॅटोच्या वाढत्या किंमतीमागे सांगण्यात येतंय.

कुठे कसे भाव आहेत ???

टोमॅटो (हायब्रीड) दिल्लीत ग्रोफर्सवर ९० रुपये प्रति किलो आणि बिगबास्केटवर ८० रुपये किलो आहे. बेंगळुरूमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव९०-१२०  रुपये प्रति किलोवर गेले आहेत आणि कर्नाटकात संततधार पावसामुळे वांगी, कोबी, गाजर, मुळा आणि सोयाबीनसारख्या भाज्यांच्या किंमतीत मोठी वाढ झालीये..

टोमॅटोच्या किमतींमुळे देशातील प्रत्येक घराला याचा फटका बसणार आहे. किरकोळ आणि ऑनलाइन बाजारात टोमॅटोच्या किमतीत वाढ दिसून येत आहे, जिथे ग्राहकांकडून हिवाळ्याच्या महिन्यांत प्रति किलो साधारणपणे २० रुपये प्रतिकिलो या कमी दराने विकले जातात, तेच टोमॅटोला किलोमागे ९० रुपये ते १०८  रुपये आकारले जात आहेत.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.