जगातील सर्वात कडक दारू कोणती माहितय का…?

नाचणारी बाटली अर्थात जगातील सर्वांधिक कडक दारू कोणती …

शराब, शराबियत यानीं अल्कोलिझम..

अनेक दिव्य पुरुषांनी दारूची महती आपणाला सांगितली असली, तरी आपल्या गावातील महिला उभी बाटली आडवी करण्याच्या मागावर असतात. मतदान घ्या आणि बाटली आडवी करा हेच त्यांच्या जीवनाच अंतिम ध्येय असतं. त्यामागची सामाजिक पार्श्वभूमी पाहता या गोष्टीला विरोध करण्याचं देखील कारण नाही पण तो मुद्दा गौण आहे.

आम्ही जगभरातले असे दहा ब्रॅण्ड आपणास दाखवणार आहोत की जे जागतिक पातळीवर भावा काय कडकाय” म्हणून ओळखले जातात.

तर हे शुद्धीत वाचा. आपल्या फॉरेनच्या मित्राला हे असलं आणायला सांगा…

नायतर किती दिवस आपलं टिचरच्या खंब्यात सुख मानुन घेणार आहात…?

१०) शुद्धीतला उच्चार – अॅबसंट / अशुद्धीतला उच्चार एबसंट्या)

88

pic- twitterअल्कोहलचे प्रमाण – ४५ ते ७२ टक्के.

चढायसाठी प्यायची नसते रे” असं ग्यान देणाऱ्या माणसांना चोख प्रत्युत्तर द्यायचं असेल तर त्यांना हा ब्रॅण्ड अवश्य पाजा. “दिसायचं बंद झालं लगा” असं सांगणारा हा ब्रॅण्ड समोरच्याच जग अंधूक करुन टाकतो. याचं वैशिष्ट म्हणजे सहजासहजी मिळणारा ब्रॅण्ड म्हणून हा ओळखला जातो.

९) बकार्डी १५१ – (दोन्ही उच्चार सोप्पे व पानाची ऑर्डर दिल्यासारखे करावे – एकशे एक्कावन)

77

bacardiअल्कोहल – ७५.५ टक्के 

टोपणाला आग ओकणारी दारू अस टोपन नाव असणारी ही दारू. पंच्याहत्तर टक्यांपर्यन्त अल्कोहल असणारी ही दारू साधारण रम बेस असणाऱ्या कॉकटेल साठी वापरली जाते. एक उत्तम कॉकटेल करायचं असेल तर याचा विचार करायला हरकत नाही.

८) डेव्हिल स्प्रिंग व्होडका – (उच्चारास सोप्पा मात्र लिहण्यास अवघड)

1 1

DEvil SPRINGअल्कोहल – ८० टक्के.

व्होडका पोरी पित्यात तू आपणाला तसलं काय सांगू नको”. पोरी पित्यात म्हणून हिणवणाऱ्यांचा खास बदला घेण्यासाठी हे शस्त्र वापरलं जातं. बाकी बाहेरच्या देशांमध्ये याचा सर्वाधिक वापर फ्लेमिंग शॉटसाठी केला जातो त्यातून पण राहिलीच तर मग कॉकटेलमधून घेतली जाते.

७) सनसेट रम – (उच्चारास, लक्षात ठेवायला सगळं कस छान छान)

7

SUNSET RUM twitterअल्कोहल – ८४ टक्के

हे बघा आपण भावनिक असला तर या रम पासून सुरक्षित अंतर ठेवा. एक्स आणि ही रम असा मामला जमला तर तुम्ही चंद्रावर पोहचणारे पहिले मराठी माणूस ठराल. थोडक्यात काय तर यामध्ये काय आहे माहित नाही पण ही दारू लय भावनिक करते. हिचं दूसरं वैशिष्ट म्हणजे गळ्याची वाट लावून घ्यायची असेल तर ही रम अवश्य घ्या.

५) बाल्कन –

6

अल्कोहल – ८८ टक्के

बाल्कनचा वास येत नाही… (आहा भारीए की लगा मग)…  बाल्कनला चव पण नसते, रंग नसतो. थोडक्यात बाल्कनला चढण्याशिवाय काहीच जमत नाही. त्यामुळं पाणी पिल्यासारखं हि दारू घश्याच्या खाली इज्जी उतरते. झालं आत्ता वाईट गोष्ट सांगतो, या दारूत काहीच नसल्यानं लोकं ही दारू कचाकचा पितात. एका पेगला साधारण ८८ टक्के अल्कोहल पोटात जायला लागलं तर काय होईल ? माणसं मरतील. सेम हेच ही दारू पिणाऱ्यांच होतं.

४)पिन्सर व्होडका.

5

अल्कोहल – ८८.८ टक्के

स्कॉटलंड आणि व्होडक्याचं नातं म्हणजे सेना आणि भाजपची युती. कशाचा कशाला संबध नाही पण एकत्र थांबायचं म्हणून थांबल्यात. तर अश्यातला प्रकार म्हणजे हा पिन्सर व्होडका. रशिया आणि युरोप एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं बघायचं असेल तर ही बाटली पहा. ही बाटली पाहून आम्ही दारूचा त्याग करुन बाटली घेऊन जाण्यास तयार आहोत. ब्युटी.

३) ब्रुच्लैडिच एक्स 4 + 1 चतुर्थांश व्हिस्की. ( हं.. हे नाव कॉपी पेस्ट करा )

44

twitterअल्कोहोल – 92 टक्के.

खरं सांगू का प्रामाणिकपणे !!!  तर तुम्ही तुमच्या मित्राला ही व्हिस्की आणायला लावणार त्याअगोदर एकदा फक्त विचार करा तो आत्ता कुठं धंद्याला लागलाय. कशाला त्याला गावचं शेत विकायला लावताय. तर सिंगल माल्ट हा का काय प्रकार असतो माहिती आहे का? व्हिस्कीचे चाहते असाल तर माहीत असेल. नसाल तर गरज नाही. माहीती पाहीजे असेल तर बोल भिडू लाईक करा सगळं एकाछताखाली मिळेल. तर मुळ मुद्दा सिंगल माल्टचा. हि व्हिस्की सिंगल माल्टमधली सगळ्यात कडक म्हणून ओळखली जाते. सर्वाधिक प्यूअर असणारी ही व्हिस्की पिल्यानं तुमच्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

२) एव्हरक्लियर

3

अल्कोहल – ९५ टक्के.

इसमैं अमरिका का हात हैं.. अमेरिकेचा हा कावा नेहमीचा आहे. संपुर्ण जग एकीकडं आणि अमरिका एकीकडं. अमेरिका दावा करतं की ही दारू जगात एक नंबरला आहे पण तस कोणी सांगितल की ऐकायचं नसतं. दावा काय ‘सकाळ’ अन ‘लोकमत’ पण करतात. तर ही जास्त अल्कोहल असणारी जगात दोन नंबरची दारू. ही पिली की जीभ जळते असं म्हणलं जातं. ( प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हे पिऊ नका )

१) Spirytus Rektyfikowany (वाटलं होतं अनेकदा वाटलं होतं याच नाव मराठीत टाईप करावं).

2

96% अल्कोहल

हे पहा प्यायचं आहे तर त्याऐवजी रोगर प्या, नियॉन प्या… एवढी महागातली दारू पिऊन मरण्यात काहीच हासील होणार नाही. त्याचं कसाय न भाउ, हे औषध आहे आणि ते पण पोलंडचं. ते काय करायलेत, डायरेक्ट अल्कोहलच पाजायलेत. ९६ टक्के मध्ये ४ टक्के काय वतलय हे कधीच सागंणार नाहीत. थोडक्यात याच्या नादी लागू नका.

झाले का दहा.. हं झाले ?

मोजा परत शुद्धीत दहा आहेत का नऊ आहेत ते !!!

#आम्ही दारूचं समर्थन करत नाही. जाहिरात तर नाहीच नाही. आम्ही फक्त लोकांच्या भावना जाणतो.

 

2 Comments
  1. Kishor Shirkande says

    स्पायरिटस रेक्टीफिकोवनी
    धन्यवाद नाही बोललात तरी चालेल ????

  2. Satish says

    अरे ६व्या नंबरवर कोण आहे ?

Leave A Reply

Your email address will not be published.