पाच अशा तोफा, ज्यांच्यापुढे बोफोर्सचा आवाज देखील फिका पडेल…

आपण भारतीय लोक बान्या हानण्यात वाकबार आहोत. तोंडाच्या तोफा चालवण्यात जगात कोणी आपला हात धरु शकणार नाही. जगभरात तोफेची क्षमता त्या तोफेच्या फेकण्याच्या क्षमतेवर मोजली जाते. भारतात जो माणूस जेवढं मोठ फेकतो तेवढा त्याला मोठे पद अशी वेळ आली आहे. 

तर चला आम्ही घेऊन आलोय भारतातल्या सगळ्यात सुप्रसिद्ध तोफा आणि त्याच्या बद्दलच्या काही सुप्रसिद्ध अख्यायिका.

१. मलिक ए मैदान तोफ –

to1

मलिक ए मैदान तोफ म्हणजेच युद्धभूमीचं सुलतान ! या तोफेचं दुसरं नांव मुलुख मैदान तोफ असं ही आहे. आज काल सभेत जोरदार भाषण करणाऱ्याला मुलुख मैदान तोफ असे संबोधतात ते याचं तोफे वरून. 

१५४९ साली अहमदनगरच्या परांडा किल्ल्यावर निजामशाहीतील सरदार रुमीखान दख्खनी याने तांबे, लोखंड व जस्ताच्या मिश्रणातून ही तोफ बनवली. आजही या तोफेला गंज चढला नाही. पुढे इब्राहीम आदिलशहा च्या काळात ही तोफ विजापूर येथे आणण्यात आली. हिची क्षमता ७००mm कॅलिबर  इतकी आहे. 

भारतातली सर्वात मोठी तर जगातली पाच नंबर ची ही तोफ आहे. जेवढी मोठी तोफ तेवढीच मोठी तोफेची आख्यायिका. तर या मलिक ए मैदान तोफे बद्दल ची सर्वात प्रसिद्ध आख्यायिका ही की ही या तोफेचा आवाज एवढं मोठा होता की तोफ डागल्याच्या आवाजाने गर्भवती बायका बाळंत व्हायच्या. 

अगदी विश्वास ठेवाव अशीच ही अफवा आहे कारण या तोफेचा आव्वाज खरच खूप मोठा होता. तोफ डागणाऱ्याचं सरंक्षण व्हावं म्हणून त्या काळात तोफे जवळ एक पाण्याने भरलेला हौद बांधण्यात आला होता. तोफेची बत्ती पेटवल्यावर सैनिक या हौदात उडी घ्यायचे. नाही तर त्यांच्या कानाचे पडदे फाटण्याची शक्यता असायची.

मलिक ए मैदान तोफे बद्दलची आणखी एक आख्यायिका म्हणजे ही तोफ ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी भारत विजयाचे प्रतिक म्हणून राणीला भेट देण्यासाठी इंग्लंडला नेणार होते. पण ५५ टन इतकी जड असलेली तोफ नेणे त्यांना शक्य झाले नाही.

२.राजगोपाला बेरंगी –

to2

१६२० साली तंजावरचं राजा रघुनाथ नायक याच्या काळात ही तोफ मेदू किल्ल्याच्या पूर्व दरवाजावर बसवण्यात आली होती. मुलुख मैदानच्या खालोखाल या तोफेची ताकद आहे. 

६३५ mm कॅलिबरची ही तोफ जगात सात नंबरला आहे. राजगोपाला बेरंगीच वजन २६ टन आहे तर लांबी २५ फुट आहे. ही तोफ लांबीला सर्वात जास्त आहे.

या तोफेच्या निर्मिती बद्दल अनेक वदंता आहेत. काही जण म्हणतात, “ही तोफ मराठ्यांनी बांधली. विकास नाईकवडी हे या तोफेचे निर्माते मानले जातात. काही तज्ञ म्हणतात की ही तोफ डच फोर्जिंग तंत्रज्ञानानुसार बनवण्यात आली आहे. त्यामुळे या तोफेला कधीच गंज चढू शकत नाही. 

नायक राजाने ही तोफ १६५० साली युद्धात वापरली अस सांगितल जात. अनेक वर्षांपर्यंत ही तोफ दुर्लक्षित होती. तंजावूरच्या लोकांनाही या तोफेबद्दल जास्त माहिती नव्हती. ही तोफ चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही दारुड्या चोरांची गंमतीशीर कथा सांगितली जाते.

३. जयबाण तोफ –

to3

काही जण या तोफेला भारतातील सर्वात मोठी तोफ समजतात. पण ही तोफ भारतातील सर्वात मोठी चाकावरची तोफ आहे. या तोफेची लांबी २० फुट तर वजन ५० टन आहे. ही तोफ ओढून न्यायला चार हत्ती लागायचे.

 १७२० साली जयपूरच्या जयगढ किल्ल्यावर ही तोफ बसवण्यात आली., तिथला राजा जयदेव दुसरा याने ही तोफ बनवून घेतली. या तोफेची क्षमता २८० mm कॅलिबर  इतकी आहे.

या तोफेबद्द्ल ची सर्वात इंटरेस्टिंग आख्यायिका म्हणजे या तोफेचा पल्ला. काही जण या तोफेचा पल्ला ४० किमी सांगतात. तर काही तज्ञ या तोफेचा पल्ला ११ किमी इतका असू शकतो असे गणिताच्या आधारे मांडतात. ही तोफ कधीही युद्धात वापरली गेली नाही. हिचा वापर एकदाच केला गेला तोही एका समारंभात. 

दिल्लीच्या मुघल बादशाहाला बोलवून त्याच्या समोर या तोफेची चाचणी करण्यात आली. तर असे सांगितले जाते की या तोफेच्या चाचणी वेळी तोफेला चालवणारा सैनिक आणि आणखी ८ सैनिक आवाजाने मेले. याचा आवाज इतका मोठा होता की एक हत्ती सुद्धा हा धक्का पचवू शकलं नाही. तोफेच्या गोळ्यामुळे ३५ किमी दूर वरच्या गावात एक मोठा खड्डा पडला. आज तिथे तळे आहे. असही सांगितलं जातं. 

४. दाल मदल कमान –

to4

ही भारतातली चौथी मोठी तोफ. २८६ mm कॅलिबर  क्षमता. तीला बनवलं जगन्नाथ कर्माकर यांनी. कर्माकर हे लोहार होते. त्यांनी व त्यांचा भाऊ जनार्दन यांनी अनेक मोठ्या तोफा बनवल्या. दाल मदल कमान चा अर्थ शत्रूचा विनाश करणारी तोफ. ही तोफ बीर हंबीर या मल्ला घराण्याच्या राजाच्या काळात  बंगाल च्या बिश्नुपुर मध्ये बसवण्यात आली. बीर हंबीर हा पराक्रमी योद्धा होता. सम्राट अकबरच्या बाजूने त्याने अफगाण सैन्याच्या विरोधातल्या युद्धात सहभाग घेतला होता.

आत्ता इतकं सगळ वाचलच आहे तर समजून तर घ्या त्या बॉफोर्स तोफेचा आवाज किती घुमला होता !

बॉफोर्स तोफ –

to5

जगातली सगळ्यात जोरात वाजलेली तोफ. गेली २५ वर्षे झाले या तोफेची चर्चा थांबत नाही.

१९८६ साली बॉफोर्स कंपनीच्या ४०० होवित्झर तोफा भारतीय सैन्य दलासाठी विकत घेण्याचं करार करण्यात आला. जवळपास १५०० कोटीचा हा करार झाली झाल्या सर्वत्र गोंधळ सुरु झाला. 

राजीव गांधीनी आपल्या बायकोच्या माहेरहून खराब तोफा जास्त पैसे देऊन आणल्याची खुसखुशीत चर्चा देशभर झाली. राजीव गांधीचे सरकार गेले. आजही कॉंग्रेसवरुन बॉफोर्सचे भूत पिच्छा सोडत नाही. बॉफोर्स ही कंपनी इटलीची नसून स्वीडनची आहे. १५५mm कॅलिबरची ही तोफ कारगिल युद्धात आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

सोनिया गांधीचे मित्र क्वात्रोची यांचा नेमकं सहभाग काय होता ? या खरेदी मध्ये दलालांचा काय रोल होता हे आजही उघड होऊ शकले नाही. या करारात नक्कीच काही तरी काळेबेरे झाले असणार आहे पण ते नेमके काय हे ना स्वीडन मध्ये ना भारतात पुराव्यानिशी सिद्ध होऊ शकले. बॉफोर्स आज जशी प्रचारसभेत धडधडते तशी कोर्टात का धडधडत नाही हा प्रश्नच उरतो.

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.