आधी समजून घ्या लिंगबदल कसा करतात ते.

२०१८ मध्ये एक गोष्ट घडली होती लिंग बदलाची. बीड पोलिस दलात २०१० मध्ये भरती झालेल्या महिला कॉन्स्टेबल ललिता साळवेने, पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्याकडे लिंगबदल करण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती.

ललिता पोलिस दलात महिला पोलिस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाली खरी पण, त्यांनतर शरीरात महिलेपेक्षा वेगळे बदल तिला जाणवू लागले. त्यामुळे तिने जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना सप्टेंबर २०१७ मध्ये अर्ज करुन, आपल्याला पुरुष होण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज केला.

पण पोलिस महासंचालकांनी लिंग बदल करुन पोलिस दलातील नोकरी कायम ठेवण्याची तिची मागणी फेटाळली होती. तर मुख्यमंत्र्यांनी या दुर्मिळ केससंदर्भात सहानुभूतीने विचार व्हावा, असा आदेश दिला होता.

त्यावेळपासून ते आजपर्यंत बऱ्याच लोकांना माहित नसतं ते म्हणजे, शरीराविरुद्ध भावना असली की सेक्स रिअसाइन्मेंट सर्जरी म्हणजे लिंग बदलाच ऑपरेशन करता येत. आपल्यापैकी प्रत्येक जणच, एखाद्या पुरुषाला स्त्रीच्या भावना असतील तर त्याला हिजड़ा, छक्का, मीठा, नरम, गुड, मामू म्हणून हिणवतो. तर ज्या स्त्रियांना पुरुषी भावना आहेत तिला लेस्बीयनचा करार देऊन टाकतो.

त्यात आणि ज्यांनी लिंग बदल केलाय त्यांना तर आपण ट्रान्सजेंडर म्हणून हिणवतो, आणि आपल्याला त्यातलं काही माहित पण नसतं. म्हणून आज माहित करुन घ्या.

तर माणूस जन्मताना सायंटीफिकली माणसाच्या पेशीत असणाऱ्या गुणसूत्र आणि शरीररचना या दोन माध्यमातून सेक्स म्हणजेच लिंग ठरवलं जातं. मुलाच्या शरीररचनेमध्ये टेस्टीज आणि पेनीस ही बाह्य़जननेंद्रिये तर पुरुष बीजवाहिन्या, वीर्यकोष ही आंतरजननेंद्रिये असतात. मुलाच्या प्रत्येक पेशीमध्ये लिंग गुणसूत्र असतात. मुलीच्या शरीररचनेमध्ये व्हजायना, शिश्निका, योनीमार्ग ही बाह्य़जननेंद्रिये तर गर्भाशय, स्त्री बीजवाहिन्या, स्त्री बीजांड ही आंतरजननेंद्रिये असतात. मुलीच्या प्रत्येक पेशीमध्ये लिंग गुणसूत्र असतात.

आता काही जणांच्या जननेंद्रियामध्ये जन्मतःच फरक असतो. म्हणजे काही स्त्रियांमध्ये योनीमार्गाचा अभाव असतो, तर काही पुरुषांच्या मूत्रमार्गाचे मुख लिंगाच्या शिश्नमुंडावर नसते, मुलांच्या एक किंवा दोन्ही टेस्टीज वृषणकोषात म्हणजे स्क्रोटम मध्ये उतरलेल्या नसतात. अशा परिस्थितीमध्ये त्या बालकाला मुलगा म्हणावे की मुलगी ठरविणे अवघड असते. अशा बालकांना इंटरसेक्स म्हणतात.

आता पुढं जेव्हा हि मुलं मोठी होतात तेव्हा सेक्स फिलिंग समजताना अवघड होत. म्हणजे व्यक्ती स्वत:ला पुरुष समजते की स्त्री हे त्याच त्याला समजताना कठीण होत. शारीरिक लिंगाप्रमाणे मानसिक लिंगही असतं. बहुतांश वेळा पुरुषांच मानसिक लिंग हे पुरुषाचच असत, तर स्त्रीच मानसिक लिंग हे स्त्रीचच असत.

पण काही जणांमध्ये शारीरिक आणि मानसिक लिंग समान नसते. काही मुलांच शारीरिक लिंग पुरुषाच असलं तरी त्यांना मुलगी बनण्याची इच्छा असते. त्याचप्रमाणे काही मुलींनाही शारीरिक लिंग स्त्रीच असलं तरी लिंगभाव मुलाचा असतो. अशांना म्हणतात ट्रान्सजेंडर.

थोडक्यात ट्रान्सजेंडर म्हणजे अशा व्यक्ती ज्यांची लैंगिक अवयवं आणि शरीर वेगवेगळे असतात.

अशा लिंगामुळं त्यांची पंचाईत होते. हा काही मानसिक आजार नसतो किंवा ते असं जाणूनबुजून करत नाहीत. त्यांचं तसं वाटणं एकदम सामान्यपणाचं लक्षण आहे. त्यांची गुणसूत्रं पुरुष (XY) किंवा स्त्री (XX) अशी असतात पण लैंगिक अवयवं मात्र विरुद्ध लिंगाची असतात. साधारण वयाच्या बारा-तेराव्या वर्षी त्यांना त्यांच्या शरीरातील आणि लिंगातील फरक समजून येतो.

मग असे मुलं मुली शस्त्रक्रियेकडे वळतात. तीच ती सर्जरी म्हणजे रिअसाइन्मेंट सर्जरी.

पण लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्याअगोदर त्या व्यक्तीमध्ये जेंडर डिस्फोरिया म्हणजे स्वत:च्या लिंगाविषयी अस्वस्थतेची भावना असावी लागते. यासाठी मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांची मदत घेतली. या व्यक्तीबरोबर दीर्घकाळ चर्चा करून मानसोपचारतज्ज्ञ जेंडर डिस्फोरियाविषयी निर्णय घेतात. असं असेल तर उपचारांची सुरुवात ‘हार्मोनल थेरपी’ने केली जाते. यामध्ये योग्य ते हार्मोन्सची औषधं आणि इंजेक्शन दिली जातात.

‘जेंडर डिस्फोरिया’ म्हणजे शरीराच्या बरोबर विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती सारखं वागणं.

हार्मोन्सचे इंजेक्शन दिल्यावर शस्त्रक्रियेची तयारी केली जाते. त्या व्यक्तीचं वय २० वर्ष किंवा जास्त असावं लागत. २० वर्षांखालील व्यक्तीसाठी त्यांच्या आईवडिलांची परवानगी लागते. शस्त्रक्रियेसाठी किमान एक मानसोपचारतज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांची परवानगी असावी लागते. पूर्ण प्रक्रियेसाठी जवळजवळ ५ ते ६ तास लागतात. यात स्तन, जननेंद्रिये आणि चेहऱ्यामध्ये बदल केले जातात. यामध्ये प्लास्टिक सर्जन, मानसशास्त्रज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, आणि मेंदूविकारतज्ज्ञ यांना एकत्रपणे काम करावे लागते.

पुरुषांमध्ये लिंगबदल शस्त्रक्रिया

ज्या पुरुषांना स्त्री बनण्याची इच्छा असते, अशा पुरुषांच्या शरीरातील लिंग, वृषण, वीर्यकोष शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढले जातात आणि योनी तयार केली जाते. काहीवेळा कृत्रिम स्तनही बसविले जातात. व्यक्तीवर हार्मोन्सची तसेच छातीवर किंवा चेहऱ्यावरील केस येऊ नये यासाठी देखील उपचार केले जातात. शस्त्रक्रियेनंतर योनीचा वापर सेक्ससाठी करता येतो, मात्र गर्भाशय, स्त्रीबीजवाहिन्या व स्त्रीबीजांडे नसल्याने या स्त्रीला गर्भधारणा होऊ शकत नाही.

स्त्रियांमध्ये लिंगबदल शस्त्रक्रिया

ज्या स्त्रियांना पुरुष बनण्याची इच्छा असते, अशा स्त्रीच्या शरीरातील स्त्रीबीजांड, गर्भाशय व स्त्रीबीजवाहिन्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात येते. तसेच स्तनही काढले जातात. स्त्रीच्या शरीरामध्ये दोन टेस्टीज बसवल्या जातात. कृत्रिमरित्या लिंगही तयार केले जाते. टेस्टीज मध्ये वीर्य तयार होत नाहीत. लिंगातून मूत्रविर्सजन केले जाते परंतु लिंगाला सेक्स करताना नैसर्गिकदृष्टय़ा उत्तेजना येत नाहीत. पुरुषांप्रमाणे दाढी, मिशी येण्यासाठी केश रोपणही केले जाते. व्यक्तीला हार्मोन्सची उपचार पद्धती दिली जाते.

आता या शस्त्रक्रियेनंतर एक वर्ष हार्मोनल थेरपी चालू ठेवावी लागते. काही वेळा आयुष्यभर ही थेरपी चालू ठेवावी लागते विशेषत: स्त्रीचा पुरुष झाल्यावर असं घडतं.

Leave A Reply

Your email address will not be published.