LGBTQ कम्युनिटीचा आहे कि नाही म्हणून पोलिसांनी ठाण्यातच त्यांचे कपडे उतरवले

त्रिपुराची राजधानी आगरतळ्यामध्ये एक गंभीर घटना घडलीये, ज्यामुळे LGBTQ कम्युनिटीला चिंतेत टाकणारी आहे. 

आगरतळा मध्ये एका पार्टीतून परतणाऱ्या LGBTQ समुदायातील चार लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.  ते LGBTQ समुदायातून आहेत कि नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांना पोलिसांनी ठाण्यातच कपडे सांगितले.  तसेच LGBTQ समुदायातील या चौघांकडून पोलिसांनी जबरदस्तीने “कधीही क्रॉस ड्रेसिंग करणार नाही”, असं हमीपात्र देखील घेतलं असा आरोप पोलिसांवर केला जातोय. चौघांनी १० जानेवारी रोजी आगरतळा येथे पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल ….हि घटना घडून काही दिवस लोटल्यानंतर माध्यमांनी याची दाखल घेतली आणि हा मुद्दा चर्चेत आला.

२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ हटवून समलैंगिकतेला मान्यता दिली होती…पण त्यानंतरही अशा घटना घडाव्यात म्हणजे कायद्याची हार असल्यात जमा आहे.

थोडक्यात या घटनेबद्दल जाणून घेऊयात…

ज्या ४ व्यक्तींसोबत हि घटना घडली ते चौघे व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट आहेत. त्यांच्या सांगण्यावरून, त्या रात्री म्हणजेच ८ जानेवारीला ते चौघे, एका हॉटेल डीजे पार्टीला गेले होते. तिथे त्यांना शिवीगाळ होऊ लागली. लोकं त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी करत होते. रात्री १०.४० च्या सुमारास घरी परतत असतांना त्यांना पोलिसांनी थांबवले. त्यांनी त्यांच्या कपड्यांवर अश्लील शेरेबाजी केली आणि त्यांचा मानसिक छळ केला. त्यांनी असाही सांगितलं कि, त्यांना त्यानंतर पश्चिम आगरतळा येथील महिला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. त्यावेळी १२ ते १४ जण पोलीस ठाण्यात हजर होते, त्यात जवळपास ७-८ पुरुष पोलीस होते. त्या सर्वांसमोर त्या ४ ही व्यक्तींचे कपडे काढून त्यांचं ‘जेंडर’ म्हणजेच लैंगिक ओळख सिद्ध करण्यास भाग पाडले गेले आणि इथून पुढे क्रॉस ड्रेसिंग करणार नाही असं लिहून घेतलं…आता हे सर्व पीडित व्यक्तीने सांगितले. 

तसेच पोलिस ठाण्यात देखील त्यांना शिवीगाळ करण्यात आली, बाचाबाची झाल्याचे, तसेच वेश्याव्यवसाय केल्याचा आरोपही पीडित ट्रान्सपर्सनने केले आहे. त्याने सांगितले की त्याला जमिनीवर बसवले गेले आणि कडाक्याच्या थंडीत अर्ध्या कपड्यांमध्ये महिला पोलिस स्टेशनमधून पश्चिम आगरतळा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. आणि त्यांचे केसांचा विग आणि त्यांचे अंडरगारमेंट्स देखील ठाण्यातच जप्त केला गेला आहे. या संपूर्ण घटनेनंतर या ४ हि ट्रान्स व्यक्तींनी पोलिस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पण पीडितांची काय चूक ? त्यांनी क्रॉस ड्रेसिंग केलं तर काय बिघडलं ?

पण क्रॉस ड्रेसिंग म्हणजे काय ?

म्हणजेच उदाहरणार्थ, जर एखाद्या पुरुषाने साडी किंवा लेहेंगा घातला तर त्याला क्रॉस ड्रेसर म्हटले जाते. कोणत्याही खटल्यात क्रॉस ड्रेसिंग हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही. अस्तित्व आणि अस्मिता यांच्या संघर्षाचा मुद्दा आहे.  मुलगा असणं आणि मुलीसारखं वेषभूषा करणं हा गुन्हा आहे का, असा प्रश्न उपस्थित या घटनेमुळे उपस्थित केला जात आहे.

पण घडलेली घटना केवळ LGBTQ समुदायाचे किंव्हा त्या पीडित ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या अधिकारांचेच उल्लंघन नाही तर सरळ सरळ मानवी हक्कांचे घोर उल्लंघन आहे. कोणताही व्यक्ती त्यांची लैंगिक ओळख काय? तो मुलगा किंवा मुलगी आहे कि नाही, या पूर्वी तो व्यक्ती एक माणूस आहे.  

बरं या पोलिसांसोबत एक पत्रकार देखील सहभागी होता ज्याने या घटनेची बातमी दिली होती. पण नंतर त्याने दिलेल्या एकतर्फी बातमीसाठी माफी मागितलीये. 

ज्या पत्रकारावर पीडित महिलांचा पोलिसांसोबत छळ केल्याचा आरोप आहे, त्या पत्रकाराने सांगितले कि, मला LGBTQ अधिकारांची माहिती नव्हती आणि असा दावा देखील केला की कोणीतरी त्यांना टीप दिली कि, काही व्यक्ती स्वतःला खोटं, खोटं ट्रान्सवुमन म्हणतायेत, म्हणून हा पत्रकार हि बातमी कव्हर करायला गेलेला. पण जेंव्हा त्याच्या लक्षात आलं कि, घटना काहीतरी वेगळ्या दिशेला गेलीं तेंव्हा त्यांनी बातमी छापलीच नाही. पण घटनास्थळी तो पत्रकार उपस्थित असल्याने आणि रेकॉर्ड केलेल्या  व्हिडीओमध्ये त्या पत्रकाराचा आवाज ऐकू आला आणि त्याला दोष दिला जात आहे. जे काही झाले त्याबद्दल मला खेद वाटतो. असा पश्चाताप या पत्रकाराने व्यक्त केला आहे. 

हि घटना एक गोष्ट मात्र जाणवून देतेय कि, एलजीबीटी समुदायातील लोकांना त्यांची ओळख आणि हक्कांसाठी संघर्ष करावा लागतोय…कायद्याने जरी एलजीबीटी समुदायाला अधिकार देऊन कायद्याची लढाई जिंकली मात्र सामाजिक अंतराचं आणि दुय्यमत्वाचं काय ?????

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.