एका अफवेमुळे अमेरिकेतले सर्वात मोठे हत्याकांड घडले

जगातल्या सगळ्यात जास्त विकसित देशांमध्ये कोणाचं नाव टॉप ला असेल तर ते अर्थातचं अमेरिकेचं. शाळेतल्या शेंबड्या पोराला जरी विचारलं की तुला मोठं झाल्यावर कुठल्या देशात जायला आवडत तर त्याच्या तोंडात सुद्धा अमेरिकेच नावं येत. पण इतका पुढारलेला देश असूनही इथला ब्लॅक अमेरिकन म्हणजेच कृष्णवर्णीय लोकांचा मुद्दा सतत डोके, वर काढतचं असतो.

कृष्णवर्णीय लोकांसोबत घटलेल्या घटनांचा पाढा जितकं वाचालं तितकं आपलं अमेरिकोबद्दलचं मत कोड्यात टाकतं.

अमेरिकेत टल्सा प्रकरण तिथल्या कृष्णवर्णीय लोकांविरूद्धच्या सगळ्यात भयंकर हत्याकांडांपैकी एक आहे,ज्यात 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. पण फार कमी लोकांना याबद्दल माहितीये.

ही घटना आहे 1921 सालची, ज्याला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना म्हंटलं जातं. त्याकाळी अमेरिकेच्या टल्सा शहरात ब्लॅक वॉल स्ट्रीट नावाने फेमस असणाऱ्या कृष्णवर्णीय लोकांची लोकसंख्या मृत्यू आणि विनाशाची साक्षीदार बनली होती.

हे सरळ प्रकरण एका अफवेमूळं झालं होतं. ज्यात म्हंटलं होत की, एका कृष्णवर्णीय तरुणाने एका गोऱ्या मुलीवर डाउनटाउन टल्सा हॉटेलमध्ये हल्ला केला. ही घटना 30 मे 1921 ची आहे. त्या दिवशी डिक रोलँड लिफ्टमध्ये सारा पेज नावाच्या एका महिलेला भेटला. यानंतर काय घडले याचा तपशील प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतो.

तर या घटनेच्या बातम्या गोऱ्या समुदायापर्यंत पोहोचायला सुरूवात झाली. ही माहिती वाढून चाढून प्रत्योकापर्यंत होती. टल्सा पोलिसांनी दुसऱ्या दिवशी रोलँडला अटक केली आणि तपास सुरू केला.

31 मे रोजी टल्सा ट्रिब्यून वृत्तपत्रात छापल्या गेलेल्या एका भडकाऊ बातमीमुळं कृष्णवर्णीय आणि गोऱ्यांना न्यायालयाजवळ संघर्ष करायला भाग पाडलं. रोलँडला संभाव्य लिंचिंगपासून वाचवण्यासाठी वरच्या मजला बंद करण्यात आला होता.

या दरम्यान गोळीबार झाला आणि अल्पसंख्याक आफ्रिकन अमेरिकन लोकांनी ग्रीनवुड जिल्ह्याकडे स्थलांतर करण्यास सुरवात केली. हे ठिकाण ब्लॅक वॉल स्ट्रीट म्हणून ओळखले जाते, जे व्यवसाय आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रसिद्ध होते.

एक जूनच्या सकाळी गोऱ्या दंगलखोरांनी ग्रीनवुडला लुटले आणि जाळपोळ केली. यानंतर ओक्लाहोमाचे तत्कालीन गव्हर्नर जेम्स रॉबर्टसन यांनी मार्शल लॉ घोषित केला. दंगली दरम्यान 35 ब्लॉक नष्ट करण्यात आले, म्हणजे 1,200 हून जास्त घरांची राखरांगोळी.

800 हून अधिक जखमींवर उपचार करण्यात आले. सुरुवातीला म्हटले गेले की, 39 लोक मारले गेले. परंतु इतिहासकारांचे म्हणणे आहे की, कमीतकमी 300 लोक मारले गेले. 6,000 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी बहुतेक आफ्रिकन-अमेरिकन होते.

टल्सा नरसंहार एक अनपेक्षित घटना म्हणून घडली नव्हती. हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी दोन वर्षे मागे जावे लागते.

त्यावेळी अमेरिकेचे सैन्य पहिल्या महायुद्धातून परतले होते. अनेक कृष्णवर्णीय सैनिकांना त्यांच्या लष्करी वर्दीतचं लिचींग ला सामोरे जावे लागले होते.

1919 च्या उन्हाळ्यात अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी आफ्रिकन-अमेरिकन समुदायाविरोधात लिंचिंग आणि इतर गुन्हे वाढले होते. ह्याच प्रकरणांमधून हळूहळू हा वाद पेट घेत होता.

1990 च्या दशकात, जिवंत पीडितांना कायदेशीर कारवाईद्वारे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

टल्सा अधिकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी एक प्रकल्प सुरू केला. या अंतर्गत, अंडरग्राउंड पेनीट्रेशन रडारद्वारे कबरे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला जेणेकरून पीडितांची ओळख पटेल. याच साखळीत 19 मृतदेह काढले गेले होते, मात्र वाढत्या प्रर्दशना दरम्यान काही २०२१ च्या दरम्यान त्यांना पुन्हा पुरण्यात आले.

हे ही वाचं भिडू: 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.