रॅपचा देव समजल्या जाणाऱ्या टूपाकची भर चौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती…

रॅप हा प्रकार अलीकडच्या काळात चांगलाच वाढत चालला आहे. पिच्चरमधले रॅप सोडून द्या. जे पोरं सोलो रॅप बनवतात आणि त्यातून वॉर सुरू होतो. यात भयंकर लिरिक्स असतात, डिस करणं वैगरे असे प्रकार यात असतात.

महाराष्ट्रातसुद्धा असे जबरी रॅपर आहेत त्यात संबाटा, एमसी स्टॅन वैगरे ही मंडळी आहेत. डिव्हाईन, एमिवे बंटायही तर भारतभर ओळखीची गँग आहे. तर एकेकाळी रॅपचा माहोल करणाऱ्या टुपाकला भर चौकात रॅपच्या कारणावरून गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं. तर एक नजर टुपाकच्या आयुष्यावर टाकूया.

16 जून 1971 साली टुपाक अमृ शाकुरचा न्यूयॉर्क मध्ये जन्म झाला.

टुपाकचे आईवडील हे ब्लॅक पँथरचे सदस्य होते. त्यामुळे त्यांच्यावर बरेच क्रिमिनल चार्जेस लागलेले होते. टुपाक जेव्हा 1 महिन्याचा पोटात होता तेव्हा त्याच्या आईला 150 केसेसमध्ये सोडवण्यात आलेलं होतं. यामुळे टुपाकचं लहानपण अशा लोकांमध्ये गेलं ज्यांच्यावर बरेच क्रिमिनल चार्जेस होते आणि त्यांनी गरिबीमध्ये आपलं जीवन जगलं होतं.

1983 साली एका नाटकात काम केल्यावर टुपाकच्या मनात अभिनय करण्याचं भूत घुसलं. घरच्यांच्या सारख्या बदल्यांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी टुपाकचं शिक्षण होत राहिलं. या काळातच टुपाक एक जब्रि रॅपर बनत चालला होता. शाळेतल्या अनेक स्पर्धांवर त्याने आपली छाप पाडली. पुढे आपलं रॅप कल्चर वाढवून त्याने मोठी कमाल केली. लीना स्टँडबर्गसोबत त्याने रॅपचे शो केले आणि रॅपला डिजिटल अंडरग्राउंडचा दर्जा मिळवून दिला.

नोव्हेंबर 1991 साली टुपाकने आपला पहिला सोलो रॅप अल्बम रिलीज केला ज्याचं नाव होतं 2 pacalypse now. हा अलबम तेव्हा गरिबी, वर्णभेद, भूकबळी यावर आधारित होता. आपल्या पहिल्याच रॅपने टुपाकला लाखो चाहते मिळवून दिले खरे पण तितक्याच त्याला कॉन्ट्रोव्हर्सिसुद्धा भोवल्या. 1993 साली त्याचा दुसरा अल्बम आला आणि त्याने पहिल्या अल्बमपेक्षा जास्त यश मिळवलं.

ठग लाईफ नावाचा त्याने एक ग्रुप बनवला आणि 1994 साली त्याचा पहिला अलबम ठग लाईफ वॉल्युम वन नावाने आला. याने सगळे रेकॉर्ड तोडले आणि बेस्ट सेलर अल्बम तो बनला.

टुपाकच्या अलबमला गोल्डचा दर्जा तेव्हा युनायटेड स्टेटमध्ये मिळाला होता.

एकीकडे टुपाक भरपूर प्रमाणात प्रसिद्ध होत होता पण तितक्याच कॉन्ट्रोव्हर्सिही होत्या. लैंगिक शोषणाच्या आरोपावरून त्याला जेलची वारी सुद्धा करावी लागली होती. एका दरोड्याच्या घटनेत टुपाककवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या पण त्यात तो थोडक्यात बचावला. पण टुपाकने भरपूर वाचन करत नवनवीन रॅप मार्केटमध्ये आणले.

1995 साली टुपाकने ‘मी अंगेंस्ट द वर्ल्ड’ नावाचा अल्बम आणला आणि हातोहात तो विकला गेला पुन्हा एकदा टुपाक लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागला होता. पण तो काळा दिवस उजाडला आणि घात झाला. रॅप कल्चर हे मुळातच घातकी मानलं जायचं.विरुद्ध ग्रुपला उद्देशून यात रॅप असायचे, शिवीगाळ,मारहाण,धमक्या असे अनेक प्रकार यात होतात.

7 सप्टेंबर 1996 रोजीच्या रात्री टुपाक आपल्या मित्रांसोबत माईक टायसनची बॉक्सिंग मॅच बघून घरी परतत असताना अचानक त्याच्या बीएमडब्ल्यू गाडीवर गोळ्यांची बरसात सुरू झाली. एकामागोमाग एक अशा चार गोळ्या टुपाकच्या शरीरात घुसल्या. हल्ला करणारे लागलीच पळून गेले. टुपाक कोमात गेला होता त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

6 दिवस मरणाला टुपाकने झुंजवत ठेवलं होतं पण 6 दिवसानंतर त्याचं निधन झालं.

भर चौकात सिग्नलवर टुपाक सारख्या जगविख्यात रॅपरची अशी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं. टुपाक रॅप कल्चरमधला देव मानला जातो, त्याच्यामुळेच आज जगभरात रॅप कल्चर सुरू झालं. आजही रॅप करणारे पोरं टुपाकला देव मानतात.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.