ट्विटरवरची मिताली शहा अचानक झाली योगी देवनाथ… नक्की काय घोळ झाला?

योगी देवनाथ. गुजरातमधील हिंदू युवा वाहिनीचे प्रभारी असल्याचा दावा करतात. सोबतच अखिल भारतीय साधु समाजचे सदस्य असल्याचं देखील ते सांगतात. त्याचबरोबर त्यांची yogidevnath.in या नावाने एका वेबसाईट देखील आहे. या वेबसाईटनुसार ते मागच्या जवळपास २५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षासोबत जोडले गेले आहेत.

मात्र याच योगी देवनाथ यांच्याशी संबंधित एक ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होतं आहे. यात आणखी एका ट्विटचा स्क्रिनशॉट देखील आहे ज्यात २०१७ मध्ये योगी देवनाथ यांच्याच ट्विटर अकाउंटवरून ट्विट केलेलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे,

“8,51,000 फॉलोवर्स होने पर सभी का दिल से धन्यवाद. ये फॉलोवर्स नहीं, मेरे परिवार का हिस्सा हैं. आप लोगों का ऐसे ही एक बहन को प्यार मिलता रहे.”

Image

यातीलच ‘बहन’ या शब्दावर सध्या वाद सुरु झाला आहे. कारण आरोप होतं आहे कि योगी देवनाथ यांनी सुरुवातीला एक महिला म्हणून आपली ओळख दाखवली आणि ट्विटर अकाउंट बनवून फॉलोअर्स गोळा केले. जेव्हा मोठ्या संख्येने फॉलोअर्स झाले तेव्हा महिलेचं नाव हटवून त्यांनी आपली माहिती भरली.

फॅक्ट चेकर मोहम्मद जुबेर याने हे आरोप लावून ट्विट केले आहे कि,

भगिनी तुझं अभिनंदन आणि खूप सारं प्रेम देखील. मुलींच्या नावाने ट्विटरवर अकाउंट काढायचे आणि भक्तांना मूर्ख बनवून फॉलोअर्स वाढवायचे. नंतर नाव बदलून आपलं मूळ नाव टाकायचं, अकाउंट व्हेरिफाय करून घ्यायचं. आधी हे अकाउंट मिताली शहाच्या नावाने चालायचे आणि आता ते बदलून योगी देवनाथ करण्यात आले आहे.

जुबेर यांनी या अकाऊंटच्या संबंधित आणखी ट्विटसचे देखील स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. यातील अनेक ट्वीट २०१४ मधील आहेत, तर काही २०१८ मधील. म्हणजेचं सगळे ट्विट हे वेगवेगळ्या वेळचे आहेत. यात योगी देवनाथ यांच्या अकाउंट्स वरून केलेले अनेक असे ट्विट दिसत आहेत जे वाचून आपल्याला वाटू शकत ते कोण्या महिलेनेच केले आहेत.

जेव्हा हे सगळं बाहेर आलं तेव्हा मोहम्मद जुबेर यांच्या दाव्यानुसार योगी देवनाथ यांनी गडबडीत जवळपास १२ हजार ट्वीट्स डिलीट केलेत.

हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर ट्विटर युजर्सनी देखील तुटून पडत कमेंट्स केल्या आहेत.

मात्र देवनाथ यांच्या दाव्यानुसार त्यांचं अकाऊंट हॅक झालं होतं. ते माध्यमांशी बोलताना म्हणतात,

माझं ट्विटर अकाऊंट अनेक वेळा हॅक झाले आहे. ज्याचे स्क्रीनशॉट्स सध्या व्हायरल होत आहेत त्या ट्विटच्या वेळी माझे अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्याचवेळी हॅकरने असे ट्विट्स केले असावेत. माझे अकाऊंट आतापर्यंत ३-४ वेळा हॅक झाले आहे आणि प्रत्येक वेळी असे ट्विट केले गेलेत. सध्या तरी आम्ही हे ट्विट डिलीट केले आहेत.

मात्रअकाउंट वेरिफाईड केल्यानंतरही काही दिवसापूर्वी माझे अकाऊंट पुन्हा हॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. काही दिवसांपूर्वीच एका परदेशी नंबरवरून मला मेसेज आला होता, ज्यात दावा केला होता की हा मेसेज ट्विटरच्या अधिकृत कार्यालयातून पाठवण्यात आला आहे. त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरा, नाही तर अकाऊंट सस्पेंड होईल. याबद्दल मी सायबर सेलमध्ये तक्रार करणार आहे.

यानंतर योगी देवनाथ यांनी देखील एक ट्वीट केले कि,

“ऐसे एंटी-हिंदू फैक्ट चेकर को इग्नोर करना चाहिए. 

#ArrestMohammedZubair”

IGNORE SUCH ANTI HINDU FAKE CHECKERS #ArrestMohammedZubair https://t.co/p3y5meD3Bn

— Yogi Devnath (@YogiDevnath2) September 16, 2021

इतकंच नाही तर त्यांनी मोहम्मद जुबेरबद्दल अनेक ट्विट केले. यामध्ये त्यांनी अनेक आक्षेपार्ह गोष्टी देखील सांगितल्या. त्याशिवाय, अनेक उजव्या विचारसरणीच्या समर्थकांनी #ArrestMohammedZubair म्हणत ट्विट केले आहेत. या स्क्रीनशॉटला चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हणत आहेत. यानंतर या हॅशटॅगमध्ये ट्विटची संख्या वाढत गेली आणि हा ट्रेंड होऊ लागला.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.