पाकिस्तानी एजंटचा काटा काढण्यासाठी युपी पोलिसांनी दोन डॉनची मदत घेतली होती…

मुंबई अंडरवर्ल्ड आणि त्यात झालेल्या अगणित लोकांच्या हत्या, टोळीयुद्ध आणि गोळीबार. या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस जीवाचं रान करायचे. असाच एक किस्सा ज्यात पाकिस्तानची मदत करणाऱ्या एका एजंटला संपवण्यासाठी पोलिसांनी दोन डॉनची मदत घेतली होती. नेपाळमध्ये बसून भारताविरुद्ध कारवाया करणाऱ्या या एजंटला कस ठार करण्यात आलं ते आपण बघूया.

तर पाकिस्तानचा एजंट होता मिर्जा दिलशाद बेग. या बेगचा दरारा होतां नेपाळच्या त्या भागांमध्ये जिथून भारताची सीमा जवळ होती. भारतातून पळून गेलेल्या लोकांना शरणागती देणे, त्यांना सहारा देणे, भारतातून चोरलेल्या गाड्यांची विक्री करणे, हत्यारांचा सप्लाय करणे , पाकिस्तानमधून पाठवलेल्या एजेंट्स लोकांना पासपोर्ट बनवून देणे आणि नेपाळच्या आयएसआयच्या सेफ हाऊसला सुरक्षा देणे अशी काम बेग करायचा. 

डी कंपनी सोबतच बऱ्याच हिंसक घटनेतल्या लोकांना तो मदत करायचा त्यामुळे पोलिसांसाठी तो डोकेदुखी बनला होता, भारताच्या गुप्त एजेंसीसुद्धा त्याला वैतागल्या होत्या आणि त्याचा अडसर दूर करण्याच्या बेतात होत्या. युपीमध्ये बेगच्या काही साथीदारांना दोषी सापडल्यानंतर पोलिसांनी त्यांची यथेच्छ धुलाई केली होती पण पोलिसांना बेग हवा होता.

युपी पोलिसांना ठाऊक होतं कि मिर्झा बेगचे बबलू श्रीवास्तव या डॉनसोबत चांगले संबंध आहेत. तेव्हा पोलिसांनी बबलूलाच विचारलं कि तुला त्याला ठार करायचं आहे. तेव्हा बबलू श्रीवास्तवने त्याला नकार दिला.

पण एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काही चर्चा झाल्यावर बबलूने हा विडा उचलला. या चर्चेत देशाच्या शपथा आणि देशहित यावर बरच लेक्चर बबलू श्रीवास्तवला देण्यात आलं.

मिर्झा बेग तेव्हा नेपाळमध्ये होता. बबलूने अर्चना शर्मा नावाच्या त्याच्याच टोळीतल्या महिलेची निवड केली. तिला नेपाळला पाठवलं आणि मिर्झा बेगला सांगितलं कि त्या बाईला आसरा दे आणि तिची काळजी घे. बेग आणि श्रीवास्तव हे चांगले मित्र होते. बेगने अर्चना शर्माला एक घर पाहून दिलं.

पण अर्चना शर्मा हि महाचलाक बाई होती तिने बेगला फ्लॅट बघायला सांगितला कारण तिला बेगची हत्या करायची होती. अर्चना शर्माच्या पाठोपाठ बबलू श्रीवास्तवने काही शुटरसुद्धा पाठवले होते जे फक्त पाळत ठेवून होते. यात दुसऱ्या डॉनची मदत होती ती म्हणजे छोटा राजनची. राजनने सुद्धा आपले काही शुटर नेपाळमध्ये पाठवले. 

आता अर्चना श्रमावर जबाबदारी होती कि तिने मिर्झा बेगला संपवायचं. तिने बेगला घरी येण्यास बऱ्याचदा विनंती केली पण बेग हा टाळत होता. असं बराच वेळ चाललं. अर्चना शर्माने हा प्रकार बबलू श्रीवास्तवाला सांगितला. तेव्हा बबलूने फोन करून बेगला सांगितलं कि अर्चना शर्माला जवळच्या माणसाची गरज आहे तेव्हा तिच्या घरी जाऊन तिला भेटून ए.

शेवटी मिर्झा बेग अर्चना शर्माला भेटायला गेला. बेग येण्याअगोदरच राजनच्या शुटर लोकांनी आणि श्रीवास्तवच्या शुटर लोकांनी फिल्डिंग लावली होती. अर्चना शर्माने सांगून ठेवलं होतं कि मी जर बाल्कनीत आले तर समजून जायचं कि बेग घरात आला आहे आणि अटॅक करायचा.

बेग घरात आल्यावर अर्चना शर्माने त्याला जेवणाचा आग्रह केला आणि ती बाल्कनीच्या दिशेने जाऊ लागली. बेगला आधीपासूनच काहीतरी घोळ असल्याचं दिसत होतं. त्याने बघितलं कि किचनमध्ये जाण्याऐवजी अर्चना शर्मा बाल्कनीत गेली आहे. त्याने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकेना तेव्हा दुसऱ्या दरवाज्याने बेगने पळ काढला.

अर्चना शर्माने बाल्कनीत जाऊन इशारा केला कि बेग दुसऱ्या दरवाजाने पळाला आहे. सगळ्या हालचाली पटपट घडू लागल्या. शूटरमधला मनजीत सिंह मंगे मिर्झा बेगला ओळखत होता त्याने बेगला आरोळी दिली. तेव्हा बेग थांबला आणि मंगेसोबत बोलत असतानाच गोळ्यांचा पाऊस बेगवर झाला आणि तिथंच बेगचा गेम वाजला. 

या घटनेमुळे पोलीस आणि एजेन्सी सगळे रिलॅक्स झाले. यात सगळं श्रेय बबलू श्रीवास्तवंच होतं पण सगळं क्रेडिट खाऊन गेला छोटा राजन. अंडरवर्ल्डमधलं अजून एक प्रकरण गाजलं. मिर्झा बेगला संपवण्याच्या बातम्यांमध्ये राजनचं नाव होतं मात्र ओरिजनल मास्टरप्लॅन हा बबलू श्रीवास्तवचा होता.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.