मुंबईत आलेल्या या दोन फॉरेनर पोरांनी सोशल मीडियावर राडा घातलाय….

आपल्यासाठी आपल्या देशापेक्षा आणि आपल्या मायभूमीपेक्षा मोठं काहीच नसतं. आपल्या देशाची कीर्ती तशी जगभर आहे त्यात काय वादच नाही. म्हणजे भल्याभल्या लोकांना भारताबद्दल वाटणारं आकर्षण सर्वश्रुत आहे. यातच नुकतंच दोन फॉरेनर भिडुंचं नाव घ्यावं लागेल. म्हणजे या दोघांनी सोशल मीडियावर जबरदस्त हवा केलीय. आता हे दोघे आपली मायभूमी सोडून आपल्या देशात का आले असतील असा प्रश्न उपस्थित होतो तर जाणून घेऊया नक्की काय विषय आहे.

तर या दोन गड्यांची नावं आहेत हॅमपस आणि जॉन ब्रटोली. या दोघांची नावं काय बऱ्याच जणांना माहिती नसतील पण सोशल मीडिया पहात असताना तुम्हाला 2 फॉरेनर्स इन बॉलिवूड हे चॅनल आढळले असेल. तर हे दोघे जण आपली मायभूमी स्वीडन सोडून भारतात आले. तर हे दोघे मुंबईत कस काय आले तेही पाहूया.

हॅमपस आणि जॉन ब्रटोल दोघे स्वीडनला एकाच कॉलेजात शिकायला होते. बिझनेस मॅनेजमेंट करण्याचा दोघांचा निर्धार होता. पण दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हन्जे बॉलिवूडचे सिनेमे. दोघांनाही बॉलिवूडचे सिनेमे आवडायचे आणि ते दोघे त्यावर गप्पा मारत बसायचे. बॉलिवूड म्हणजे थोडक्यात काय होतं तर एक हिरो आणि एक व्हीवन आणि मध्ये भरपूर ट्विस्टने रंगलेला सिनेमा आणि शेवटी हॅप्पी एंडिंग.

बॉलीवूडची ही त्यांना पडलेली भुरळ लवकरच मुंबईत बोलावू लागली. दोघांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मग मुंबईत दाखल झाले.  जेव्हा ते मुंबईला निघत होते तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की अरे काय येडे झाले का काय तुम्ही ? पदवी झाल्यावर कोण मुंबईला जातं. पण त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही आणि थेट मुंबईत ते आले.सुरवातीला इंडस्ट्रीत ते काम शोधत फिरले पण यश आलं नाही.

मग त्यांची मैत्री झाली विदान प्रताप सिंग बरोबर. मुंबईची गर्दी ,लोकल आणि भाषा याच त्यांच्या मुख्य अडचणी होत्या. हिंदी येत नसेल तर काम मिळणार नाही म्हणून त्यांनी हिंदीचे क्लास लावले.

काम शोधताना त्यांनी आपले अनुभव लोकांना दाखवण्यासाठी 2 फॉरेनर्स इन बॉलिवूड म्हणून फेसबुक पेज सुरू केलं आणि आज ते जगभर लोकप्रिय झाले आहेत. मायभूमी सोडून आलेले हे दोघे जण आज सेलिब्रिटी बनले आहे, त्यांच्या व्हिडिओजला लाखोंमध्ये लोक पाहतात. भारतातल्या पोरांना अरे जरा हातपाय हलवा, दिवसभर बसून राहत्या असं तर म्हणत नसेल ना ?

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.