२३ वर्षांपूर्वी देखील भारतीय क्रिकेट टीम एकाच वेळी दोन सिरीज खेळली होती..

भारतीय क्रिकेट टीम एकाचवेळी दोन सिरीज खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. एक टीम इंग्लंड मध्ये टेस्ट सिरीज तर दुसरी टीम श्रीलंकेत वनडे आणि टी-२० खेळणार आहे.

एक टीम विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरोधात ५ टेस्ट मॅचची सिरीज खेळणार आहे. त्याचबरोबर भारताची दुसरी टीम शिखर धवनच्या नेतृत्वाखाली जुलै महिन्यात होणाऱ्या सिरीजसाठी श्रीलंकेत जाणार आहे.

तीन वनडे आणि तीन टी-२० मॅच या दौऱ्यात होणार आहे. एकाच वेळी दोन सिरीज मध्ये सहभागी होण्याची भारतीय क्रिकेट संघाची ही काही पहिले वेळ नाही. यापूर्वी सुद्धा भारतीय संघ एकाच दोन सिरीज खेळला आहे.

१९९८ मध्ये दोन भारतीय संघ तयार करण्यात आले होते. एक संघ कॉमनवेल्थ गेम्स आणि दुसरा सहारा कपसाठी पाठविण्यात आला होता.

क्वालालंपूर येथील कॉमनवेल्थ गेम्स आणि कॅनडा येथे सहारा कपचे आयोजन एकाचवेळी करण्यात आले होते. यावेळी पहिल्यांदाच आशिया खंडात कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्स मध्ये क्रिकेटचा सहभाग करण्यात आला होता. यामुळे भारतीय क्रिकेट संघाने यात सहभागी व्हावे असे सांगण्यात आले होते.

कॉमनवेल्थ गेम्स मध्ये १९९८ मध्ये पहिल्यांदाच क्रिकेटचा सहभाग झाला होता आणि  तीच वेळ शेवटची सुद्धा ठरली. यानंतर कधीही कॉमनवेल्थ गेम्स मध्ये क्रिकेटचा सहभाग नव्हता.

अजय जडेजाची कॅप्टनसी खाली एक टीम कॉमनवेल्थ गेम्ससाठी पाठविण्यात आली होती. त्यात सचिन तेंडूलकर, अनिल कुंबळे आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मणचा सहभाग होता. इतिहासात पहिल्यांदाच ही टीम बीसीसीआय साठी नाही तर देशासाठी खेळणार होती.

बीसीसीआयने दुसरी टीम मोहम्मद अझरूद्दीनच्या नेतृत्वाखाली सहारा कपसाठी पाठविली होती. त्यात सौरभ गांगुली, राहुल द्रविड, जवागल श्रीनाथ आणि व्यंकटेश प्रसाद यांचा सहभाग होता.

त्याकाळात मीडिया मध्ये चर्चा झाली की एक टीम देशासाठी खेळत आहे तर दुसरी टीम पैशांसाठी खेळत आहे.

कॉमनवेल्थ गेम्स मध्ये १६ देशातील संघ सहभागी झाले होते. सर्व मॅच लाल बॉलने खेळविण्यात आल्या होता. तर सर्व संघाना व्हाईट ड्रेस कॅम्प्ल्सरी केला होता.

ऑस्ट्रेलिया विरोधात भारताला सामना हरला होता. कॅनडावर मात केली होती. तर अँटिगा विरोधात मॅच टाय झाली होती. या तीन मॅच मध्ये सचिन तेंडुलकरला केवळ २८ रन काढता आले होते. त्यावेळी सचिन तेंडूलकरला मैदनात अश्रू अनावर झाल्याचे सांगण्यात येते. त्याला देशासाठी मेडल जिंकायचं होतं.

दक्षिण अफ्रीकेने ऑस्ट्रेलिया हरवत कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोल्ड मेडल जिंकले.

भारतीय संघाने कॉमनवेल्थ गेम्स मधून लवकर मायदेशी आल्यानंतर नंतर बीसीसीआयने हे खेळाडू उर्वरित मॅचसाठी सहारा कपसाठी कॅनडा येथे पाठविण्याचा निर्णय घेतला होता. तर दुसरीकडे पाकिस्तान संघाने असा प्रकारे भारतीय खेळाडूंना सहारा कप मध्ये खेळू देण्याच्या विरोधात केला होता. मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता.

सचिन तेंडूलकर, अनिल कुंबळे, अजय जडेजा आणि रॉबिन सिंगला कॅनडा मध्ये पाठविण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. मात्र पाकिस्तानने याला विरोध केल्यानंतर केवळ सचिन तेंडूलकर आणि अजय जडेजाला सहारा कपसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पाकिस्तान संघ वाद घालत असल्याने आपल्याला सहारा कप मध्ये खेळता येणार नाही असे सचिनला वाटले. त्यामुळे कॉमनवेल्थ गेम्सवरून परत आल्या नंतर सचिन हा कुटुंबीयांसोबत सुट्ट्या साजरा करण्यासाठी खंडाळा येथे गेला. पुढच्या दिवशी पाकिस्तान संघाने माघार घेत सचिन तेंडूलकर आणि अजय जडेजाला भारतीय संघाकडून खेळण्यास हरकत नसल्याचे सांगितले.

मात्र इकडे तर सचिन तर सुट्ट्यांसाठी खंडाळ्याला आला होता. बीसीसीआयने सचिनशी अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. मग केवळ अजय जडेजाला सहारा कपसाठी कॅनडाला पाठविण्यात आले. दोन दिवसानंतर सचिनशी संपर्क झाला. मग कुठे सचिनला शेवटच्या मॅचसाठी कॅनडाला पाठविण्यात आले होते.

तेंडूलकर आणि जडेजा सहारा कप मध्ये जाण्यापुर्वीचा भारतीय संघाने सहारा कप सिरीज गमावली होती. सचिनला तेंडुलकरला शेवटच्या मॅच मध्ये टीम मध्ये संधी मिळाली होती. त्यात त्याने ७७ रन काढले होते. सचिन टीम मध्ये सामील झाल्याने बाकींच्या सहकाऱ्यांना हुरूप आला होता. याच मॅच मध्ये मोहमद अझरूद्दीनने शतक झळकविले होते.

भारतीय संघांनी दोन्ही सिरीज गमावल्या होत्या.  दोन्ही संघात निम्मेनिम्मे प्रमुख खेळाडू पाठविण्यात आले होते . आता मात्र ही चूक टाळण्यात आली आहे.  बीसीसीआयने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल साठी प्रमुख खेळडूंची टीम पाठविली आहे. तर श्रीलंका दौऱ्यासाठी दुय्यम खेळाडूंची टीम पाठविण्यात येणार आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.