पुण्याचे दोन पोलीस अधिकारी स्कॉटलंडयार्ड गेले अन् राज्यात डॉग स्कॉड सुरु झालं..

राज्याच डॉग स्कॉड सुरु करण्यापूर्वी दोन पोलीस अधिकारी स्कॉटलंडला गेले होते

महाड तालुक्यातील आदिस्ते गावच्या सरपंच यांचा २७ डिसेंबर रोजी बलात्कार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा डॉग स्कॉड मधील ऑस्कर श्वानाने केला. सदर प्रकारणाचा छडा ४८ तासात पूर्ण करून आरोपिला अटक करण्यात यश मिळाले. श्वानाने केलेल्या मदतीमुळे आरोपीला लवकर अटक करण्यात पोलिसांना यश आले होते.

अशी बातमी वाचल्यावर भिडूने विचार केला. लहानपणा पासून पाहतोय खून, दरोडा झाला की, तपासाला येणाऱ्या पोलिसांसोबत श्वान असतात. त्यानंतर दोन-चार दिवसांनी बातमी वाचण्यात येते. श्वानामुळे आरोपी पकडल्या गेलेत. मग प्रश्न पडला की, अशा श्वानाला कुठ बर ट्रेनिंग देण्यात येत असेल. त्यांची निवड कशी करण्यात येते, कुठल्या कुठल्या जातीचे श्वान ट्रेनिंगसाठी निवडले जातात.
याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर असे समजले की,

राज्यातील श्वानांना ट्रेनिंग देण्याचे काम पुण्यातील शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात केले जाते. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडी या मार्फत हे ट्रेनिंग दिले जाते.

तर या ट्रेनिंग सेंटरची स्थापना ही १९६५ मध्ये करण्यात आली होती. यासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट स्कॉटलंड पाठविण्यात आले होते. लंडन येथील स्कॉटलंड यार्ड पोलीस कशा प्रकारे आपल्या श्वानाला ट्रेनिंग याची माहिती घेण्यासाठी पाठविले होतो.

केन आणि दयामा या दोन अधिकाऱ्यांना ट्रेनिंगसाठी स्कॉटलंड यार्ड येथे पाठविण्यात आले होते.

त्यांचं येथील ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर राज्यातील हॅण्डलरला ट्रेन केले आणि त्यानंतरची ही ट्रेनिंग सेंटर सुरु झाले. येथून आता पर्यंत जवळपास १ हजार श्वान येथून ट्रेनिंग घेऊन गेले आहेत आणि ते आता राज्यातील विविध पोलीस ठाण्यात अंतर्गत कार्यरत आहेत.
महाराष्ट्राबरोबरच दिव दमन आणि गोवा येथील श्वानाला सुद्धा येथे ट्रेनिंग देण्यात येते. सध्या राज्यात चारशे श्वान असून त्यांच्या मदतीने काम केले जाते.

ट्रेनिंग असं दिल जात

जन्माच्या ४५ दिवसानंतर श्वानांना पथकात दाखल करून घेतले जाते. त्यानंतर सहा महिने त्यांचा सांभाळ केला जातो. यावेळी ज्या हॅण्डलरकडे त्यांची जिम्मेदारी दिली जाते. ते श्वानाला सर्व चांगल्या सवयी लावतात. सहा महिन्यानंतर त्यांना प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्रात पाठवले जाते. तेथे त्यांना तयार केले जाते.
गुन्हे शोध करणाऱ्या श्वानांना ९ महिने तर अमली पदार्थ व बॅम्बशोधन करणाऱ्या श्वनाला प्रत्येकी सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या कालावधीत हॅण्डलर देखील त्यांच्याबरोबर प्रशिक्षण घेतात व श्वानाला तरबेज करतात. लेब्रोडोर तसं सगळ्यांची ओळखीच. 

दिसायला मस्त असल्याने अनेकजण पाळतात. मात्र, त्याचा खरा गुण म्हणजे त्याची हुंगण्याची क्षमता आहे.

लेब्रोडोरची हुंगण्याची क्षमता अधिक असल्याने बॉम्ब शोधण्यासाठी त्याची मदत घेण्यात येते. मोठे राजकीय नेते यांच्या दौरे, सभेपूर्वी लेब्रोडोरची गस्त पाहायला मिळते.
तर खून, दरोडा अशा प्रकारच्या घटना उघडकीस आण्यासाठी जर्मनशेफर्ड आणि डॉबरमॅन या श्वनाचा उपयोग करण्यात येतो. डॉबरमॅन हे श्वान जास्त उत्साही असल्याने त्याला बॉम्ब शोध पथकामध्ये सामील करून घेतले जात नाही.

तपासात महत्वाची भूमिका

पोलिसांच्या तपासात श्वान महत्वपुर्ण भूमिका बजावतात. श्वानांमुळे गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपास लावण्यास पोलिसांना अनेकदा मोलाची मदत झाली आहे.पोलिस दलात गुन्हे उघडकीस आण्यासाठी, अमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी आणि स्फोटके शोधण्यासाठी श्वनांची मदत घेतली जाते. दिवसेंदिवस गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धती बदलते आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.