युपीत चोरट्यांनी धूम स्टाईलमध्ये भर रस्त्यात थेट फायटर प्लेनचा टायर चोरलाय.

 

भुरटे चोर असोत वा धूम स्टाईलचे मोठे चोरटे असोत…चोरून चोरून काय चोरतील ???? सोनं, पैसे किंव्हा गाड्या वेगैरे… पण लखनऊमध्ये चोरट्यांनी अशी चोरी केली आहे, ज्याबद्दल जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल. 

या चोर महाशयांनी मिरज फायटर प्लेनचा टायरच चोरलेय…हो हि घटना आहे उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधली.  या चोरट्यांनी भर रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकमधून मिरज लढाऊ विमानाचे चाक चोरले. त्या  ट्रक ड्रायव्हरच्या तक्रारीनंतर लखनऊ पोलीस या चोरांचा तपास करत आहेत. 

आता बघू हि धूम स्टाईलची चोरी नेमकी कशी झाली?

लखनौमधील बक्षी-का-तालाब एअरबेसवरून जोधपूर एअरबेससाठी लष्करी सामानाची खेप घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून अज्ञात हल्लेखोरांनी मिराज फायटर जेटचा टायर चोरला. लखनऊ पोलिसांनी सांगितल्यानुसार,  ही घटना २७ नोव्हेंबरची आहे. त्यानुसार ट्रॅफिकमध्ये अडकलेला ट्रकमध्ये हा टायर होता.   या चोरीचा एफआयआर १ डिसेंबरला नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही घटना शहीद पथावर घडली असून पोलिसांनी अनेक संशयित लोकांची चौकशी करत आहोत. पोलीस आता शहीद पथाच्या आजूबाजूला बसवण्यात आलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करत आहेत, या चोरीत सहभागी असलेल्या चोरांना अटक करून लवकरात लवकर कारवाई करू असं आश्वासन लखनऊ पोलिसांनी दिलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रकमध्ये मिराज फायटर विमानाचे ५ टायर लखनौच्या बक्षी तालाब एअरबेसवरून राजस्थानमधील जोधपूर एअरबेसला पाठवले जात होते. त्यातलाच एक विमानाचा टायर चोरट्यांनी चोरला.

आणि काही माध्यमांना ट्रक ड्रायव्हर हेम सिंह रावतने अशीही माहिती दिली कि,  स्कॉर्पिओ गाडीत या चोरट्यांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या ट्रकमधून ही चोरी केली आहे.

हि घटना रात्री १२: ३० ते १ च्या दरम्यान घडली. त्यावेळी शहीद पथावर ट्रॅफिक जाम झालं होतं, त्यामुळे ट्रक स्लो स्पीडने जात होता, ट्रकच्या मागून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली त्यात काही लोकं बसले होते, त्यांनी मागून ट्रकवर चढून बेल्ट कापून फायटर प्लेन चोरले. हेमसिंग रावत यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांना या चोरीची घटना लक्षात आली तेंव्हा खूप उशीर झाला होता. मात्र, लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना या चोरीची माहिती दिली.

म्हणजेच भर रस्त्यात, भर ट्रॅफिक मध्ये चोरांनी हे टायर चोरले होते. 

पण हवाई दलाच्या पोलिसांनी मात्र ट्रक ड्रायव्हरलाच अटक केली आहे. जेंव्हा चोरीच्या या घटनेनंतर हेमसिंग रावत उर्वरित ४ टायर घेऊन जोधपूर एअरबेसवर पोहोचले तेव्हा एअरफोर्सने त्याला ताब्यात घेतले. कारण एअरफोर्सला अशी भीती आहे कि, फायटर प्लेनचे टायर चोरीला जाने हे देशाच्या शत्रूच्या कटाचा भाग तर नाही ना?  कारण चोरीला गेलेले टायर हे टायर विमानाव्यतिरिक्त कुठेही वापरता येत नाही असं एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा प्रकारची चोरी होणं संशयाचे कारण ठरत आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.