भारताच्या प्रेमातून सद्दाम हुसेन याने आपल्या पोराचं नाव ‘उदय’ ठेवलं होतं पण तो…

प्रचंड पसरलेलं वाळवंट, तिथे उंट घेऊन राहणारे, अक्रोड बदाम विकून उपजीविका करणारे अरब लोक. जस या वाळवंटात तेल सापडलं तेव्हापासून या लोकांच दुष्ट चक्र सुरु झालं. पैसे मिळवण्याच्या चढाओढीत अनेक अमेरिकी कंपन्यांनी या अडाणी लोकांना धुवून घेतलं. त्यांना धर्माच्या नादी लावल, अतिरेकी निर्माण केले. आपापसात झुंजवल.

अमेरिकेने अनेक भयंकर राजवटी निर्माण केल्या. अशातलाच एक हुकुमशहा म्हणजे सद्दाम हुसेन.

एकेकाळचा हा साधा लष्करी अधिकारी, बंडखोर अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी इराकचा हुकुमशहा बनला. इराण इराकच्या मध्ये युद्ध लावून देऊन अमेरिकेने याला फुगवल. आपली शस्त्रास्त्रे खपवली. अखाती देशातल्या युद्धातून धुवून घेतलं.

पण याच काळात सद्दाम हुसेन अमेरिकेलाही न जुमानण्याइतपत मोठा होऊन बसला.

प्रचंड मोठ्या तेलाच्या खाणीवर बसलेला सद्दाम हुसेन सुरवातीपासून गर्विष्ठ होता. आपल्या विरोधातल्या लोकांना क्रूरपणे संपवणे हे तर अरबी देशात अगदी नॉर्मल गोष्ट समजली जाई. पण सद्दामचा मुलगा त्याच्या अनेक पाउल पुढे होता.

त्याचं नाव उदय हुसेन.

सद्दामला दोन मुले उदय आणि कुसय. यातला उदय थोरला. अस म्हणतात की सद्दाम हुसेन भारताचा मोठा फॅन होता. बाकी कसाही असला तरी सद्दाम हुसेन प्रोग्रेसिव्ह विचाराचा होता. त्याच्या काळात मुलीना शिक्षणासाठी बंदी नव्हती. मुली आधुनिक कपडे घालू शकत होत्या, नोकरी करू शकत होत्या.

इंदिरा गांधीसारखी महिला भारतासारख्या मोठ्या देशावर राज्य करते याच त्याला आश्चर्य वाटायचं. इंदिराजी जेव्हा इराक दौऱ्यावर गेल्या होत्या तेव्हा त्यांची सुटकेस सुद्धा सद्दाम हुसेनने उचलली होती. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानच्या विरुद्ध भारताला पाठींबा देणारा सद्दाम हुसेनच होता.

अस म्हणतात की भारताच्या प्रेमातुन त्याने आपल्या थोरल्या मुलाचं नाव उदय ठेवलं. खर खोट त्या सद्दाम हुसेनलाच ठाऊक. 

तर सद्दामचा मुलगा उदय हा लहानपणापासून शाळेत पहिला नंबर काढायचा. तुम्हाला वाटेल की पोरग हुशार असणार तर तस काही नाही. सद्दामच्या पोराला १०० पेक्षा कमी मार्क द्यायचं धाडस कोणता मास्तर करेल?

उदय बगदाद विद्यापीठातून इंजिनियर झाला, त्याच्या नावावर दोन विषयांच्या डॉक्टरेट होत्या पण तो पास व्हायच्या पण लायकीचा नव्हता.

एकदा कॉलेजमध्ये बास्केटबॉल कोर्टवर त्याने आपली आलिशान कार उभी केली होती.एका सरांनी त्याला कार पार्किंगमध्ये लाव अस सांगितल. त्यानंतर ते शिक्षक कधीच कोणाला दिसले नाहीत.

इथून सुरु झाली उदय हुसेन नावामागची दहशत. 

त्याचे तेव्हाचे मित्र सांगतात,

“उदय मठ्ठ नव्हता. तो सद्दाम हुसेन पेक्षा हुशारच होता पण कमी वयात मिळालेल्या अनिर्बंध सत्तेमुळ त्याला वेड लागल होतं.”

आपल्या लाडक्या मुलाला सद्दामने इराकच्या ऑलिंपिक कमिटीचा प्रमुख बनवलं होत. हे म्हणजे माकडाच्या हाती मद्य दिल्याप्रमाणे झाल. उदय हुसेन स्वतः खेळाडूंच्या सरावाला उपस्थित राहू लागला. चुका करणाऱ्या खेळाडूंना मैदानातच फटके मारणे वगैरे शिक्षा देऊ लागला.

त्याला इराकच्या फुटबॉल असोशिएशनचा देखील अध्यक्ष बनवण्यात आलं होत. उदयला फुटबॉलमध्ये विशेष रस होता. त्याकाळी इराकची टीम फुटबॉलमध्ये नाव गाजवत होती.

१९८६च्या वर्ल्डकप साठी त्यांचं सिलेक्शनदेखील झालेलं पण त्यांचं दुर्दैव उदय हुसेन त्यांच्या नशिबात आला.

उदयने स्वतःची एक अल रशीद नावाची फुटबॉल टीम बनवली होती. देशातील सगळ्या उत्कृष्ट खेळाडूंना या टीममध्ये खेळणे बंधनकारक केले होते. जे खेळाडू नाही म्हणत त्यांचे अपहरण करून काहीब दिवस डांबून ठेवण्यात येई. त्यांना उपाशी पोटी प्रचंड मार दिल्यावर ते उदय कडून खेळण्यास तयार होत.

मॅचमध्ये चुका करणाऱ्या खेळाडूला पट्ट्याने मारहाण होई, त्यांना अंधाऱ्या खोलीत डांबून इलेक्ट्रिक शॉक दिला जात असे, साध्या चुका करणाऱ्या खेळाडूला सिमेंटच्या फुटबॉलला लाथा मारण्याची शिक्षा देण्यात येई तर मोठी चूक करणारा खेळाडू कायमचा देवाघरी पाठवला जाई.

असा एक अंदाज आहे की उदय हुसेनच्या काळात इराकने ५२ खेळाडू गमावले.

त्याच्या या क्रूर शिक्षा पद्धतीमुळे इराकी फुटबॉल अनेक पिढ्यांनी मागे गेले. लोकांनी खेळणे बंद केले. कित्येकांनी जीव वाचवण्यासाठी बॉर्डर पार करून वेगळ्या देशात आसरा घेतला. मूर्ख उदय हुसेनला याच काहीच नव्हत.

त्याला कार विकत घेण्याचा शौक होता. तुफान वेगाने कार चालवणे, दारू व इतर ड्रगची नशा करणे, पार्ट्या करणे हे त्याचे आवडते छंद होते. याच बरोबर आणखी एक व्यसन त्याला लागलं होतं.

“मुली”

उदय तरुण होता, रगेल होता, हुकुमशहा बापामुळे पैसा आणि पॉवर दोन्ही त्याच्याकडे होते. देखण्या मुली त्याच्याभोवती असणे हे काही आश्चर्यकारक नव्हते. पण उदय जवळ एक गर्लफ्रेंड एक रात्र देखील टिकत नसे. त्याचं क्रौर्य त्याच्या खाजगी आयुष्यात देखील उमटत असे.

एकदा उदय हुसेन एका मित्राच्या लग्नाला गेला. स्टेजवर जाऊन नव दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना मुलीचा चेहरा बघितला, ती त्याला आवडली. त्याने तिला लग्नमंडपातून उचलून नेले. त्या मुलीने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्मह त्या केली.

अनेकदा उदय हुसेन आपली कार घेऊन कॉलेजच्या बाहेर उभा राहत असे. त्याला आवडेल त्या मुलीला त्याच्या रात्रीच्या सेवेसाठी उचलून नेले जाई. अशा हजारो मुलींचा त्याने थंड डोक्याने  बला त्कार केला असेल. त्याच्या बला त्काराची पद्धत देखील भयंकर होती. अनेक मुली त्याचा अत्याचार सहन करू शकत नसत व आयुष्यभराच्या जायबंदी बनत.

ज्या मुलीजास्त विरोध करत होत्या त्यांना त्याने ठा र केले.

एकदा एका लष्करी अधिकाऱ्याची त्याने सगळ्यांसमोर ह त्या केली, का तर त्याने याला सॅल्युट केले नाही. असेच एका पार्टीमध्ये दुसऱ्या एका लष्करी अधिकाऱ्याची याने हत्या केली त्याचा गुन्हा एवढाच कि त्याने उदय ला त्याच्या बायको बरोबर नाचू दयायला विरोध केला.

उदय ला त्याला विरोध केलेले अजिबात सहन होत नसे, तसे केले कि तो प्रचंड संतापायचा.

त्याच्या तोंडून निघालेल्या शब्दाला कोणी नाही म्हणण्याची सुतराम शक्यता नव्हती. लष्करातील काही लोक त्याचा खूप तिरस्कार करीत. तो आपल्या बंदी लोकांना अतोनात हाल करून मारायचा व त्याचे व्हिडीओ काढून बघत बसायचा. मरणाऱ्या व्यक्तीच्या कर्कश किंकाळ्या ऐकण्यात त्याला वेगळाच असुरी आनंद मिळायचा.

उदय हुसेनचा दरारा सद्दामपेक्षाही वाढला होत. तो जिथे फिरायचा तिथे मुली जीव वाचवत पळत सुटायच्या. उदय हुसेन आला हे कॉलेजमध्ये कळाल तर लेडीज टॉयलेट लपून बसलेल्या मुलीनी भरून जायचं.

सद्दामने सुरवातीला त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले. पण हळूहळू तो डोईजड होऊ लागला. एकदा सद्दाम हुसेन ने पॅलेस्टाईणचे अध्यक्ष यासर अराफत यांच्या पत्नीसाठी एक पार्टी आयोजित केली होती.

याच अतिमहत्वाच्या पार्टीमध्ये उदयने सद्दामचा लाडका बॉडीगार्ड कामेल हाना गेगाओ याचा काठीने मारून खू न केला.

अस म्हणतात की तो बॉडीगार्ड सद्दाम हुसेनच्या विश्वासातला होता. त्यानेच सद्दामच दुसर लग्न जुळवून आणलं होत, हे कळल्यामुळे रागाच्या भरात उदयच्या हातून हे कृत्य घडलं. तो आपल्या आईच्या घरी येऊन लपून बसला, त्याला पकडायला आलेल्या सैनिकांवर गोळ्या झाडल्या. शेवटी धाकट्या भावाने समजावून सांगितल्यावर त्याने शरणागती पत्करली.

तरीही बापाला “खऱ्या बायको बरोबर रहा” अस सांगायला तो विसरला नाही.

रागावलेल्या सद्दामने त्याला अटक केली. उदय तीन महिने जेलमध्ये होता पण जॉर्डनच्या राजाच्या विनंतीनंतर त्याची सुटका करण्यात आली. पुढे सद्दामने त्याला इराकपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून स्वित्झर्लंडला इराकी राजदुताचा असिस्टंट म्हणून पाठवले.

पण तिथे तो तीन चार महिनेच टिकला.

स्वित्झर्लंडमध्ये रोज रस्त्यावर लोकांशी दारू पिऊन भांडण, मारहाण वगैरे प्रकार सुरु केले. अखेर स्विस गव्हर्नमेंटने सद्दाम हुसेनला विनंती केली की तुमच्या मुलाला या देशातून घेऊन जा.

एकदा अशाच एका पार्टीमध्ये त्याच्या मामाची व वडिलांच्या सावत्र भावाची कशावरून तरी भांडण सुरु होती. दारू पिलेल्या उदयच टाळक सटकल व त्याने थेट आपल्या काकाला गोळ्या घातल्या. आता मात्र सद्दाम हुसेनच्या रागाने परिसीमा गाठली.

उदय हुसेनने माझ्या भावाला जश्या गोळ्या घातल्या तशाच पद्धतीने त्याला सुद्धा गोळ्या झाडा असे आदेश त्याने दिले.

पण या कामासाठी कोणी पुढे आले नाही. उलट सद्दामलाच समजावून सांगण्यात आलं. तरी रागाच्या भरात सद्दाम हुसेनने उदयच्या सगळ्या महागड्या गाड्या जाळून टाकल्या. त्याला आपला उत्तराधिकारी या पदावरून काढून टाकलं.

उदय हुसेनच्या जीवावर टांगती तलवार फिरू लागली.

या आधीच उदयने स्वतःचा  लतीफ याहियानावाचा एक बॉडी डबल शोधून ठेवला होता. जिथे आपल्या जीवाला धोका वाटेल तिथे या लतीफला स्वतःचा वेश घालवून पाठवून द्यायचा. लतीफवर देखील त्याने अतोनात छळ केला आहे. या छळकथा एका डोक्यूमेण्ट्रीमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

अशा या सैतानावर तो रात्री पोरी शोधायला गेला असताना ठरवून त्याचाय्व्र हल्ला करण्यात आला. अगदी एके ४७चा वापर करून गोळ्या झाडल्या पण उदय त्यातून कसाबसा वाचला. पण तिथून त्याचे चालणे सुद्धा बंद झाले. अनेकदा इराकमध्ये असही म्हटल जायचं की त्याला त्या हल्यानंतर नपुंसकत्व आलं होतं.

देवाने आपल्या युवराजाला योग्य शिक्षा दिली म्हणून इराकी जनता खुश होती.

२२ जुलै २००३ रोजी सद्दाम ना हटवण्यासाठी अमेरिकेने इराक वर हल्ला केला. सद्दामला पकडण्यात आलं. उदय व कुसई तेव्हा मोसुलच्या एका महालात लपलेले होते.

अमेरिकन सैन्याच्या टास्क फोर्स २० या तुकडीने तिथे हल्ला केला ४ तास चाललेल्या या चकमकी मध्ये उदय आणि कुसे हे दोघेही ठार झाले.

मृत्यनंतर उदयचा खरा चेहरा जगाच्या समोर आला. त्याने जवळपास १२०० अलिशान गाड्या जमवून ठेवलेल्या होत्या. त्याच्या पर्सनल कलेकक्ष्ण मध्ये उंची सिगार, हेरोईन, दारूच्या बाटल्या सापडल्या. त्याने घरात वाघ व चित्ते पाळले होते व त्याच एक छोट झु बनवल होत.

याशिवाय त्याने केलेले ब लात्कार, खु न यांचे व्हिडीओ, अश्लील फोटो याचाही संग्रह सापडला. गंमत म्हणजे त्याने त्यावेळच्या याहू मेसेंजरवर अकाऊंट उघडलं होत.

अनेकदा अस म्हणतात की उदयबद्दलच्या बऱ्याच गोष्टी अमेरिकन मिडियाने वाढवून चढवून सांगितल्या पण इराकी जनता आजही म्हणते की तो सद्दामच्या उद्याचा काळ आमच्यासाठी नरकप्राय होता. त्याने केलेल्या अमानुष कत्तली, अत्याचार याच्या खुणा आजही इराक मध्ये पहावयास मिळतात.

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. Arbaz says

    आरे जेव्हा अमेरिका भारताच्या वीरोधात ऊतरला होता तेव्हा हाच सद्दाम हुसैन भारताच्या पाठिशी उभा होता

  2. S G Warsi says

    उदय का सूरज इसीलिए इतनी बेदर्दी से sunset हो गया, डूब गया. बुरे लोगों को उनके कर्मों का फल यहीं इसी दुनिया में देकर उसके किए कुकर्मो को याद कराता है उसे

Leave A Reply

Your email address will not be published.