पुण्याच्या दोघा इंजिनिअर्सनी खास जवानांसाठी स्वस्त फ्लाईट सर्व्हिस सुरु केली आहे..

आपल्याला जसं कि माहितीये कि, सशस्त्र दलात काम करणाऱ्यांसाठीचं एक मोठं चॅलेंज म्हणजे, त्यांच्या सुट्ट्या ! त्यांचं क्षेत्रच असं असतंय कि, त्यांना ठरवून सुट्ट्या मिळत नसतात. 

त्यांची रजा शेवटच्या क्षणी मंजूर केली जाते…आणि यामुळे अडचण अशी येते कि, अशा ऐनवेळी दिलेल्या सुट्टीमुळे ट्रेनचे रिजर्व्हवेशन मिळत नाही. आणि विमानाचा प्रवास परवडत नाही. आणि हीच परिस्थिती लक्षात घेऊन पुण्यातल्या दोन इंजिनिअर्स भिडूंना एक आयडिया सुचली ती म्हणजे, जवानांना स्वस्तात विमानाचे तिकीट मिळवून देणे. 

जवानांना विमानाची तिकिटे स्वस्तात मिळाल्यास त्यांच्या प्रवासाचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटू शकतो. असा विचार करून रवी कुमार आणि वरुण जैन नावाच्या दोघांनी पुण्यात ‘udChalo’ हे स्टार्टअप सुरू केले आहे. रवी कुमार आणि वरुण जैन हे दोघेही पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकणारे इंजिनिअर आहेत.

एक्स सर्विसमॅन, इंडियन आर्म्ड फोर्सेज, पॅरामिलिट्री, वेटरन्स व डिपेंडेंट्ससाठी उड्डाणे किफायतशीर बनवणे हे ‘udChalo’ चे उद्दिष्ट आहे. २०१५ मध्ये ‘udChalo’ ची सुरुवात झाली. पहिल्या वर्षी या स्टार्टअपने १२०० सैनिकांना हवाई प्रवास घडवला…तर आजच्या दिवसात हि संख्या वाढत वाढत  लष्कराचे सुमारे १.६ दशलक्ष सैनिक दरवर्षी ‘udChalo’ च्या माध्यमाने हवाई प्रवास करत असतात.

Udchalo चे रेव्हेन्यू मॉडेल आहे तरी कसे ?

Udchalo ब्रँडची पॅरेण्ट कंपनी UpCurve Business Services Private Limited आहे. ब्रँडचे रेव्हेन्यू मॉडेल सुविधा शुल्क आकारण्यावर तसेच एअरलाइनकडून बोनस मिळविण्यावर आधारित आहे. कंपनी एक सबस्क्रिप्शन मॉडेल तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे जे त्याच्या ग्राहकांना अतिरिक्त ऑफर आणि अनेक वैशिष्ट्यांना अनुमती देईल. 

उडचलो कंपनी भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयांतर्गत नोंदणीकृत आहे. ही एक IATA मान्यताप्राप्त एजन्सी आहे आणि ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया (TAAI) चे सक्रिय सदस्य आहे. स्टार्टअपला आयकर विभागाकडून ERI लायसेंस मिळाले आहे आणि CRISIL ने CCAS2 रेटिंग दिले आहे.

पण या दोघांना हि आयडिया कशी सुचली ?

रवी कुमार आणि वरुण जैन या दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी या सशस्त्र दलाशी संबंधित आहे. हा स्टार्टअप केवळ सशस्त्र दल, माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांच्या गरजा पूर्ण करतो. त्यांनी याबाबत असे सांगितले कि, जवळजवळ प्रत्येक फ्लाइटमध्ये बऱ्याच सीट्स रिकाम्या राहतात. त्यामुळे हेच रिकाम्या सीट्सचे तिकिटे लष्करातील जवानांना डिस्कॉउंट देऊन  दिले तर त्यांच्या बजेट मध्ये बसेल आणि त्यांचा प्रवास करणे सोयीचे होईल….अशी एकंदर कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी हे स्टार्टअप सुरु केले. सध्या वरुण जैन हे प्रॉडक्ट टेकचे अध्यक्ष आहेत आणि रवी कुमार हे सीईओ आहेत.

उडचलो स्टार्टअपने सैन्यातील अशा लोकांवर लक्ष केंद्रित केले जे फार मोठ्या पदावर नसतात आणि जे ट्रेन ने प्रवास करतात.. अगदी शेवटच्या क्षणी फ्लाईट तिकिटांची व्यवस्था करणे खूप महागडे असते, म्हणून उडचलोने सशस्त्र दलांसाठी सवलतीच्या तिकिटांची नवीन संकल्पना आणली आहे. रेल्वेचं तिकीट आणि विमानाच्या तिकिटांच्या किंमतीतला फरक जेंव्हा फारच किरकोळ आहे हे लक्षात आलं कि मग हे जावं फ्लाईट चे तिकिटं बुक करू लागले.

‘सर्व्हीस फॉर सर्व्हीस’

‘सेवेसाठी सेवा’ हे उडचलोचे ब्रीदवाक्य आहे. Udchalo ट्रॅव्हल, आर्थिक सेवा, ग्रुप हाऊसिंग,  कंज्यूमर प्रॉडक्ट्स, सर्विसेज और यूटिलिटी बिल पेमेंट्स सेवा देते.  याशिवाय कंपनीची वेबसाइट, ऍप आणि ७० आउटरीच सेंटर्स आहेत, जे २८ लाख सर्विंग डिफेन्स, पर्सनल्स, त्यांचे कुटुंब समाविष्ट आहेत. 

स्टार्टअपची 50% बुकिंग कार्यालये उरी, इंफाळ सारख्या ठिकाणी आहेत.  कंपनीने गेल्या ५ वर्षांत ४५० टक्क्यांहून अधिक CAGR ची वाढ नोंदवली आहे.

तसेच UdChalo स्टार्टअप आर्मी वेटरन्स, वीर नारी आणि आश्रितांसाठी नोकरीच्या संधी देखील निर्माण करते. स्टार्टअपने इंडिगो, स्पाइसजेट, गो एअर, एअर एशिया, विस्तारा यांसारख्या कंपन्यांशी पार्टनरशीप केली आहे. Udchalo ने आर्मी कर्मचाऱ्यांना आदरातिथ्य सेवा देण्यासाठी Oyo आणि FabHotels सोबत पार्टनरशीप केली आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.