उधमसिंग आणि भगतसिंग यांच्यात कमालीच साम्य होतं.

१३ मार्च १९४० चा दिवस. ईस्ट इंडिया असोसिएशन आणि रॉयल सेंट्रल एशियन सोसायटीच्या बैठकीचा दिवस. यासाठी लंडनमधील कॅक्सटन हॉल गर्दीने खचाखच भरला होता. जमलेल्या गर्दीतून एक भारतीय तरुण गुपचूप हॉलमध्ये शिरला. या तरुणाच्या कोटमध्ये त्याने एक पुस्तक लपवले होते.

या तरुणाला आता फक्त ती बैठक संपायची वाट पहायची होती. तशी काही वेळाने बैठक संपली आणि या तरुणाने ते पुस्तक उघडले. ते भाषणासाठी नाही तर त्यात असलेल पिस्तुल काढण्यासाठी. कारण या पुस्तकात होते एक पिस्तुल.  बैठकीला उपस्थित असलेल्या वक्त्यांपैकी एक असलेल्या मायकल ओडवायर याच्यावर त्याने ते पिस्तुल उगारले आणि एकापाठोपाठ गोळ्या झाडल्या.

मायकल ओडवायर यांना यमसदनी पाठवल्यावर त्या तरुणाला गर्दीतून सहज तिथून फरार होता आले असते. पण, त्याने तस नाही केले. तो पोलिसांच्या स्वाधीन झाला स्वत:हुन. ब्रिटनमध्येच त्याच्यावर खटला दाखल झाला आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

या क्रांतीकाराचे नाव होते उधम सिंग.

ज्यांना मायकल ओडवायरच्या हत्येच्या गुन्ह्यात ३१ जुलै १९४० रोजी फाशी देण्यात आली.

१३ एप्रिल १९१९ चा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी काळा दिवस होता. त्यादिवशी अमृतसरमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाले. इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,००० हून अधिक आहे.

मायकल ओडवायर हा या हल्ल्यामागील सूत्रधार होता. मायकल ओडवायर हे तेव्हाचे गवर्नर होते. आणि त्यांनी हा हत्याकांडाचे समर्थन केले होते. उधम सिंग हेही या हत्याकांडात जखमी झाले होते. तेव्हाच त्यांनी या हत्याकांडाचा बदला घ्यायचा ठरवला होता.

जनरल डायर यांची हत्याही उधम सिंग यांनी केल्याची अफवा त्यावेळी उठली होती. या हत्येमागे जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेणे हा उद्देश नसून ब्रिटीश सरकारला समज देणे आणि भारतात क्रांतीची मशाल पेटवणे हा होता, असे इतिहासकरांचे म्हणणे होते. पण, यात तथ्य नाही. १९२७ मध्ये जनरल डायर यांचा मृत्यू दीर्घकाळाच्या आजाराने झाला होता.

उधम सिंग यांचा जन्म २६ डिसेंबर १८९९ मध्ये पंजाबच्या संगरुर जिल्ह्यातील सुनाम गावात झाला. लहानपणी त्यांचे नाव शेरसिंग असे होते. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवले त्यामुळे उधम सिंग आणि त्यांचा मोठा भाऊ मुक्तासिंग यांना एका अनाथ आश्रमात आसरा घ्यावा लागला. या आश्रमात शेरसिंग यांना उधम सिंग असे तर मुक्तासिंग यांना साधुसिंग असे नाव मिळाले. १९१७ मध्ये त्यांच्या भावाचेही निधन झाले.

१९१९ मध्ये जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड झाले तेव्हा आपल्याच सहकाऱ्यांना आणि भारतीयांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून उधम सिंग याच्या अंगात क्रांतीची ज्योत पेटली. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर ते स्वातंत्र्य संग्रामात उतरले.

अमेरिका आणि कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांनी १९१३ मध्ये भारतात क्रांती घडवण्यासाठी गदर पक्षाची स्थापना केली होती.  १९२४ मध्ये उधम सिंग गदर पक्षात सहभागी झाले. या पक्षासाठी निधी गोळ्या करण्याच्या कामासाठी उधम सिंग दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि अमेरिकेचा दौराही केला.

भगत सिंग यांच्या आदेशावरून उधम सिंग १९२७ मध्ये भरतात परतले.

भारतात येताना ते २५ सहकारी, पिस्तुल आणि युद्ध साठा घेऊन आले होते. पण, चोरी छुप्या सुरु असलेल्या या कारवायांची बातमी ब्रिटीश सरकारला लागली आणि त्यांनी उधम सिंग यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना ५ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही ब्रिटीश सरकार उधम सिंग यांच्यावर नजर ठेऊन होते. यामुळे उधम सिंग काश्मीर खोऱ्यात गायब झाले.

यानंतर उधम सिंग थेट लंडनमध्ये दिसले. तिथे त्यांनी एका भाड्याच्या घरात मायकल ओडवायरच्या हत्येचा कट रचला.  काही दिवसांनी त्यांनी एक पिस्तुल खरेदी केले. आणि १२ मार्च १९४० ची वाट पाहत ते बसले. या दिवशी त्यांनी मोका साधला आणि आपला हेतू साध्य केला. लंडनमधील कॅक्सटन हॉलमध्ये त्यांनी ओडवायरची हत्या केली.

उधम सिंग भगत सिंग यांच्यात बरेच साम्य होते. 

उधम सिंग भगत सिंगाचे चांगले मित्र होते आणि त्याच्यापासून ते पासून प्रभावित होते. भगत सिंग आणि उधम सिंग यांची पहिली भेट लाहोरमध्ये झाली होती. या दोन स्वातंत्र्य सैनिकांमध्ये अनेक गोष्टीचे साम्य आहे. हे दोघेही पंजाबचे होते तर दोघेही नास्तिक होते. या दोघांनीही हिंदू मुस्लीम जाती वादाला कधीही थारा दिला नाही.

या दोघांच्याही आयुष्याला कलाटणी देणारे एकच कारण ठरे ते म्हणजे जालियनवाला ह्त्याकांड.

उधम सिंग आणि भगत सिंग या दोघानाही फाशिलाच सामोरे जावे लागले. भगत सिंग यांच्या प्रमाणेच उधम सिंग यांनीही फाशीच्या आधी धार्मिक ग्रंथाचे वाचन करण्यास नकार दिला होता.

अस म्हणतात की,

“उधम सिंग सर्वधर्मसमभाव मानत होते. त्यामुळे त्यांनी आपले नाव बदलून मोहम्मद आझाद सिंग ठेवले होते. हे नाव तिन्ही जातीचे प्रतिक असणारे हे नाव उधम सिंग यांनी हातावर गोंदून घेतले होते.”

देशाच्या बाहेर फाशीवर जाणारे उधम सिंग हे दुसरे स्वातंत्र्य सैनिक होते. या आधी मदन लाल धिंग्रा यांना कर्जन वायली यांच्या हत्येसाठी १९०९ मध्ये फाशी देण्यात आली. ३१ जुलै रोजीच उधम सिंग यांना फाशी देण्यात आली तर याच दिवशी १९७४ मध्ये याच दिवशी या स्वातंत्र्य सैनिकाच्या अस्थी ब्रिटीश सरकारने भारताकडे सोपवल्या. या अस्थी सन्मानाने उधम सिंग यांच्या गावी आणून त्यांची समाधी बांधण्यात आली.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.