सगळ्यात सुंदर दिसणारी महिला एका आजारामुळे जगातली सगळ्यात कुरूप महिला बनली होती…

काही आजार असे असतात, जे कोणाकडून ऐकलेले नसतात आणि त्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होतं. आजारपण म्हणजे एक डेंजर खेळ मानला जातो. रात्री अस्थमा झाल्याने अंथरुणात तळमळत पडलेलं लहान बाळ असुदे किंवा गुढग्याच्या दुखण्याने त्रस्त झालेल्या म्हाताऱ्या असू दे, टीबीने वैतागलेले खोकुन खोकुन दमलेले सगळ्यांना आजारपण नको असतं. पण सुमारे 147 वर्षांपूर्वी डिसेंबर 1874 मध्ये जन्मलेली मुलगी तरुण झाल्यावर खूप सुंदर होती, पण हार्मोन्सच्या आजाराने तिला जगातील कुरूप स्त्री बनवले. त्याबद्दलचा हा किस्सा.

एका रोगाने सगळा आनंद मेरीचा घालवला.

लंडनमधील प्लास्टो येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या आठ मुलांपैकी मेरी अँन बेव्हन होती. सुरुवातीला मेरीने नर्स बनण्याचे स्वप्न पाहिले. तिने थॉमस बेवन यांच्याशी वयाच्या २९ व्या वर्षी लग्न केले. पण त्याचवेळी मेरी अँनला अलक्रोमेगाली नावाच्या आजाराने घेरले, शरीरात हार्मोन्सची वाढ झाल्यामुळे चेहऱ्याचा आकार बदलू लागला. या स्थितीत तिचे हात-पाय वाढू लागले. आजच्या युगात त्यावर इलाज आहे, पण त्याकाळी त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड होते. आणि हा आजार आणखीनच बळावत गेला.

मेरी अॅन बेवन या महिलेला चार मुले होती आणि लग्नाच्या 11 वर्षांनंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला. DailyStar.com मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, विधवा मेरी खूप उदास झाली होती आणि तिच्या चार मुलांचे संगोपन करण्यासाठी ‘जगातील सर्वात कुरूप महिला’ म्हणून एका विचित्र शोमध्ये सामील झाली, ज्यामध्ये जगभरातून विचित्र दिसणार्‍या व्यक्तीला बोलावण्यात आलं होतं. या शोमध्ये लोकांना एक प्रदर्शन म्हणून दाखवण्यात आले होते. मेरी सहभागी झाली केवळ आपल्या मुलांचं संगोपन करावं म्हणून.

त्यानंतर तीचे नशीब अशा प्रकारे बदलले

मेरी अॅन जिथे राहत होती तिथे लोक अश्लील टिप्पण्या करत असत, परंतु तिच्या कुटुंबाला माहित होते की ती आतून खूप सुंदर आहे. एका वर्तमानपत्रात जाहिरात पाहिली की अमेरिकन सर्कसमध्ये अशा लोकांची गरज आहे, जिथे लोक विचित्र दिसतात. तिथे तिचा विचित्र रागीट दिसणारा चेहरा कमाईचे साधन बनला. पुढे आयुष्याने कसं वळण घेतलं म्हणून ती स्वतःशीच हसायला लागली. एकेकाळी परिसारखी देखणी दिसायची ती, पण हार्मोन्स जास्त वाढल्याने तिचं सुंदर आयुष्य तिला जगातली सगळ्यात कुरूप महिला म्हणून काढावं लागलं.

हे ही वाच भिडू :

1 Comment
  1. Sachin Dashrath Gole says

    Indica is best royal

Leave A Reply

Your email address will not be published.