जगातला तिसरा मोठा अण्वस्त्रांचा साठा युक्रेनने संरक्षणाच्या हमीवर रशियाला सोपवला होता

आयुष्यात कधीच कोणावर विश्वास ठेवू नये याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या पिढीने याची देही याची डोळा पाहिलंय, ते ही रशिया आणि युक्रेनच्या रुपात!

सध्या युक्रेन मध्ये बॉम्बचा वर्षांव होतो आहे. जे कधीकाळी त्यांच्या मालकीचे होते.

या गोष्टीची सुरुवात होते USSR च्या विघटनाने. सन १९९१ मध्ये सोव्हिएत संघाची शकले झाली. त्यानंतर १९८९ ते १९९० या काळात एकामागून एक राज्ये स्वतःला स्वतंत्र करत होती. जी स्वतंत्र झाली, त्यात भूप्रदेश, लष्करी सामर्थ्य, औद्योगिक साधनस्रोत यांचा विचार करता रशियाच मोठा होता. तर युक्रेनकडे मोठा भूप्रदेश, औद्योगिक कारखाने तसेच तैल व नैसर्गिक वायूचे स्रोत ही बलस्थाने होती. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे युक्रेनकडे ३ हजार टेक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स होते.

जेव्हा USSR मधून बेलारूस, कझाकस्तान, आणि युक्रेन बाहेर पडले तेव्हा युक्रेन, बेलारूस, कझाकस्तान ने त्यांच्या न्यूक्लिअर वेपन्सची कस्टडी रशियाला सोपवली.

FAS म्हणजे फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट यांच्या मते, १९९१ च्या दरम्यान युक्रेनकडे अंदाजे ३ हजार टेक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स होते. यात SS-19, SS-24 अशी १७६ इंटरकॉन्टीनेंटल बॅलेस्टिक मिसाईल, १००० एअर लाँच क्रूझ मिसाईल, मिडीयम रेंज एअरक्राफ्ट अशी युद्ध सामग्री होती.

पण रशिया मधून बाहेर पडलेल्या युक्रेनची अर्थव्यवस्था तेवढीशी काही चांगली नव्हती. आणि अशा अवघड परिस्थितीत ही युद्ध सामग्री सांभाळणं तसं खर्चीकच होत. मग यातून निर्णय झाला तो म्हणजे की, आमचं संरक्षण करण्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला म्हणजे अर्थातच रशियाला आमची आण्विक हत्यार देतो.

त्यात आणि अजून एक करार झाला होता तो म्हणजे “बुडापेस्ट मेमोरँडम विथ रशिया द युनायटेड किंगडम अँड युनायटेड स्टेटस” हा करार झाला होता १९९४ साली. या करारा प्रमाणे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला अर्थसहाय्य करण्यासाठी हे तीन देश मदत करतील ते पण एकाच अटीवर. ती अट म्हणजे निःशस्त्रिकरण. 

युक्रेनकडे जेवढे अणुबॉम्ब होते ते त्यांनी डिसमेंटल करायचे होते.

आणि जर युक्रेनवर हल्ला झालाच तर त्यांच्या सार्वभौमत्वाच रक्षण करण्यासाठी हे तीन देश पुढे येतील.

या तिघांवर ही विश्वास ठेवून युक्रेनने आपली शस्त्र डिसमेंटल केली. काही Tu-160s अणुबॉम्ब रशियाला सुपूर्द करण्यात आले. या बदल्यात रशियाने युक्रेनला तेल आणि गॅस दिला. युक्रेनचं लास्ट बॉम्बर एअरक्राफ्ट मे २००१ मध्ये डिसमेंटल करण्यात आलं. त्यावेळी युक्रेनची राजधानी कीव इथून एक परिपत्रक काढण्यात आलं. त्याप्रमाणे,

युक्रेनने ११ Tu-160 स्ट्रॅटेजीक बॉम्ब, २७ स्ट्रॅटेजीक Tu-95 बॉम्ब, 483 Kh-55 एअर लाँच क्रूझ मिसाईल, 11 हेवी बॉम्बर्स, 582 स्ट्रॅटेजीक क्रूझ मिसाईल १९९९ मध्ये नॅचरल गॅस च्या बदल्यात रशियाला दिले.

आणि आज हीच हत्यार वापरून युक्रेनच्या कीव या राजधानीवर रशियाकडून हल्ले होतायत. हे कदाचित मूर्तिमंत उदाहरण असेल की आपल्याच हत्यारांनी आपलाच देश उध्वस्त होत आहे हे बघणं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.