युक्रेन-रशियाच्या लढाईतं भारत दोघांचे संबंध कसे बॅलन्स करणार

तालिबान्यांच्या अफगाणिस्तानवरच्या सत्तेनंतर आता आंतराष्ट्रीय माध्यमांत चर्चा आहे ती रशियाच्या मोर्च्याची. रशिया पुढच्या वर्षी १,७५,००० सैनिकांसोबत युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी करत असल्याचं बोललं जातंय. यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढलीये. वॉशिंग्टन यामुळं जरा जास्तच नाराज आहे.

पण या सगळ्यात भारत तर जरा जास्तच कंफ्यूस झालाय. कारण रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन सध्या भारताच्या भेटीला आलेत. त्यात आधीच भारताच्या रशियाकडून S-४०० विमानाच्या खरेदीवर वॉशिंग्टन नाराज आहे. आणि भारत – रशियाच्या आजच्या या भेटीत हाच मुद्दा महत्वाचा आहे.

भारतासाठी रशिया हा एक महत्वाचा डिफेन्स सोर्स आहे. कारण सरंक्षण उपकरणे आणि भागांसाठी भारत रशियावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत, तसेच जेव्हा शत्रूच आव्हान अगदी समोर असतं, तेव्हा मॉस्को मदतीसाठी उभं असत. उदाहरण द्यायचं झालं तर, ७०,००० एके आणि हवाई संरक्षण इग्ला सिस्टमची आपत्कालीन खरेदी.

एवढंच नाही तर एका अहवालानुसार, भारतीय वायुसेना आपल्या जमिनीवरील हल्ल्यासाठी ७१ टक्के रशियावर अवलंबून आहे. रशिया अजूनही जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यातक देश आहे आणि भारताच्या एकूण निर्यातीत त्याचा वाटा सुमारे २३ टक्के आहे.

पण हे देखील तितकेच खरे आहे कि, हळू- हळू  भारताची आयात ३३ टक्क्यांनी कमी झाली आहे. कारण भारत परवानाकृत उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाकडे वळला आहे, ज्यामुळे आयात काही प्रमाणात कमी झाली आहे.

हे चांगलंही आहे म्हणा, कारण यामुळे भारताला वॉशिंग्टनच्या CAATSA  मुळे तयार झालेल्या निर्बंधांमध्ये सूट जारी करण्यास अनुमती मिळते. म्हणजे जर कोणत्या देशाने सिद्ध केले की त्याने मॉस्कोवरील आपले अवलंबित्व कमी केले आहे, तर सूट जारी केली जाऊ शकते.

आता हे असलं तरी, रशिरवरचं अवलंबवित्व भारतासाठी कमी झालेलं नाहीये. आणि ते पूर्णपणे संपवण्यासाठी अजून बरीच वर्षे लागतील. आणि भारत – रशिया मैत्रीचा कित्येक वर्षांचा जूना इतिहास आहे.

आता चर्चा केली युक्रेनची तर, फार कमी लोकांना माहितेय कि, सोव्हिएत काळात तो भारताचा एक प्राथमिक पुरवठादार आणि चांगला मित्र होता. भारत आपल्या नौदलाच्या जहाजांसाठी गॅस टर्बाइनसाठी युक्रेनवर अवलंबून आहे, परिणामी भारत युक्रेनियन इंजिन ऑर्डर करतो आणि नंतर रशियाला पाठवतो.

Mi-१७आणि Mi-३५ सोबत भारत आपल्या ताफ्यातील बहुतेक मध्यम-हलक्या हेलिकॉप्टरच्या इंजिनसाठी देखील युक्रेनवर अवलंबून आहे.  युक्रेनमधील मोटर सिच ही जगातील आघाडीच्या इंजिन उत्पादकांपैकी एक आहे आणि भारताची ही पार्टनरशिप महत्वाची आहे.

आता चित्र स्पष्ट आहे कि, संरक्षणासाठी म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी भारताला या दोन्हीची गरज आहे, त्यामुळे भारतासाठी हा कठीण निर्णय आहे कि, नेमकी बाजू घ्यावी तरी कोणाची.

आता भारतासारखी परिस्थिती आणखी बऱ्याच देशांची आहे. त्यामुळेचं युक्रेन आणि रशियामधील चांगले संबंध सर्व संबंधितांसाठी महत्वाचे म्हंटले आहेत, जे एकमेकांना मजबूत करतात आणि चिनी घुसखोरीशी लढतात. त्यामुळे भारताला तरी दोघांमधील चांगल्या संबंधासाठी मध्यस्थीवर विचार करणे आवश्यक असल्याचे अंदाज लावले जातायेत.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.