उमा भारतींनी दिग्गी राजांकडे माफीचं पत्र पाठवलंय, “मी यापुढे भाषा सुधारेल”

“नोकरशहांची काय लायकी, ते आमच्या चपला उचलतात”,असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेत्या आणि मध्यप्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी केलं होत. ज्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. आणि नुसत्या उमा भारती नाही तर यामुळे मध्यप्रदेशातील शिवराज सरकार सुद्धा गोत्यात सापडलं.

तर राज्यात दारुबंदीविरोधात आंदोलन सुरू करणाऱ्या उमा भारती यांचा गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक विडिओ व्हायरल होतोय. ज्यात त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केलं.  त्यांनी म्हंटल कि,

तुम्हाला काय वाटतं ब्युरोक्रसी नेत्यांना गुंडाळतात. ते तसं नसतं, पहिल्यांदा खासगीत चर्चा होते आणि नंतर नोकरशहा त्याच्या फायली बनवतात.  नोकरशाही म्हणजे काहीच नाही, उलट ते आमची चप्पल उचलतात, आम्ही त्यांना महत्त्व देतो. मी ११ वर्ष केंद्रीय मंत्री राहिलेत आणि मुख्यमंत्री सुद्धा होते. आम्ही आधी चर्चा करतो त्यानंतर ब्युरोक्रसी फाइल सादर करते. खरी गोष्ट म्हणजे आम्ही ब्युरोक्रसीच्या बहाण्याने आमचं राजकारण चालवतो.

आता उमा भारती यांचा हा व्हिडिओ व्हायरल  झाल्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा विरोध देशभरात सुरु आहे. अनेक नेतेमंडळीनी या वक्तव्याचा निषेध करतायेत, खास करून काँग्रेस पक्षाचे हे प्रकरण उचलून ठरलं.  आपल्या महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटलेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी म्हंटल कि, ‘भाजप नेत्या उमा भारती यांचं अधिकाऱ्यांबाबतचं वक्तव्य हे निषेधार्हच आहे. केंद्र सरकारकडून ED, CBI, IT या केंद्रीय संस्थांचा होणारा गैरवापर बघितला तर हेच वक्तव्य त्यांनी अधिकाऱ्यांबाबत न करता या संस्थांबाबत केलं असतं तर योग्य ठरलं असतं,

 

एवढच नाही तर, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विट करून भारती यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यांनी  ट्विटमध्ये लिहिले कि, ‘उमा, माझी लहान बहीण म्हणून तुम्ही मला कमी बोलण्याचा इशारा देत होता. परंतु तुम्ही नोकरशहांच्या विरोधात वापरलेले अपमानास्पद शब्द अत्यंत आक्षेपार्ह आहेत. भारतीय राज्यघटनेतील नोकरशाही नियम आणि नियमांनुसार निष्पक्षपणे काम करण्यास बांधील आहेत. ते तुमचे नोकर नाहीत, ते चप्पल उचलणारे लोक नाहीत. तुम्ही केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आहात. आपण या प्रकारची टिप्पणी करू नये. तुम्ही माफी मागायला हवी.’

आता दिग्विजय सिंग यांच्या या ट्विटनंतर माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी पत्राद्वारे माफी मागितलीये. त्यांनी म्हंटल कि,

तुम्ही नोकरशाहीवरच्या माझ्या विधानाला योग्य प्रतिसाद दिलाय. माझ्या स्वतःच्याचं बोललेल्या भाषेमुळे मी खूप दुखावले आहे. मी तुमच्या मागे लागायचे कि, दादा संयत  भाषा बोलू नका. पण ते अगदी असंच झालं जस रामायणात लिहिलं गेलंय…पर उपदेश कुशल बहुतेरे, जे आचरहिं ते नर न घनेरे त्यांनी पुढं लिहिलं कि, ‘ मी माझी भाषा सुधारेल’ .

आता उमा भरती यांनी माफी मागितली खरी सोबतच ट्विट करून लालूंचा एक किस्सा पण सांगितलाय, ज्यात लालूंनी एका अधिकाऱ्याला दिलेल्या वागणुकीविषयी बोललं गेलंय.

त्यांनी सांगितलं कि, ‘जेव्हा मी केंद्रात अटलजींच्या सरकारमध्ये पर्यटन मंत्री होते, तेव्हा मी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांचे पती लालू यादव यांच्यासह हेलिकॉप्टरने पाटणा ते बोधगया जाण्यासाठी बिहारला गेले होते. बिहार राज्यातील एक वरिष्ठ IAS अधिकारी देखील हेलिकॉप्टरमध्ये पुढच्या सीटवर बसला होता. लालू यादव माझ्या समोरचं पिकदानात थुंकले आणि ते पिकदान वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या हातात दिले आणि त्याला खिडकीजवळ ठेवण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी सुद्धा तेच केले. “

हे ही वाचं  भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.