शिवरायांनी लढलेल्या उंबरखिंडीच्या लढाईतून कळतं, “गुप्तहेरखाते कसे असले पाहिजे.”

शिवरायांचा गनिमी कावा म्हणजे शत्रूंना घाम फोडायचा..त्यात त्यांचे बलाढ्य मावळे जे शेवटपर्यंत प्राणपणाने लढायचे. तरीदेखील शिवरायांचे सैन्य मात्र थोडे असायचे मग शत्रूंचा सामना कसा करायचा ? त्यावर त्यांची एकच रणनीती म्हणजे गनिमी कावा !
उघड्या मैदानावर शत्रूशी सामना कसा करणार हे आव्हान असायचं, तेव्हा शिवरायांनी विचार
केला, की महाराष्ट्र हा डोंगराळ मुलूखाचा, इथे डोंगर ,घाट व खिंडी पुष्कळ आहेत. आणि त्यांचा आपण भरपूर उपयोग करून घेतला पाहिजे .हे सारे लक्षात घेऊन शिवरायांनी शत्रूशी सामना करण्यासाठी  गनिमी कावा !

याच गनिमीकाव्याचा रणनीतीचे उत्तम उदाहरण म्हणजे उंबरखिंडीची लढाई.

आजही या घटनेची साक्ष देणारे उंबरखिंड स्मारक त्या ठिकाणी आहे. खोपोली पाली रोडवर उंबर गावापासून पुढं गेलं तर उंबरखिंडीचा फाटा लागतो या फाट्यापासून अगदी चार किलोमीटर पुढे गेलं  गेल्यावर हे स्मारक लागते.

ही लढाई होती १६६१ या काळातली. शाहिस्तेखानाने कारतलबखानाला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकण काबीज करण्याच्या मोहिमेवर पाठविले..कारतालब खानाला नागोठणे, चौल, पनवेल, कल्याण, भिवंडी हा भाग ताब्यात घ्यायचा होता.

पण त्याला शिवाजी महाराजांच्या गनिमीकाव्याच्या रणनीतीचा अंदाज होता म्हणून खानाने आपल्या स्वारीचा मार्ग अत्यंत गुप्त ठेवला होता. खानाने तो बोरघाट मार्गाने उतरणार अशी अफवा उठवून दिली.

पण राजांचे हेरखाते किती सक्षम आहे याचा अंदाज खानाला नव्हता.

आणि त्याची फौज बोरघाटाऐवजी बोरघाटाच्या अलीकडेच असलेल्या अवघड अशा कुरवंडे घाटातून सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या उंबरे गावात उतरायचे ठरवले. आणि याच घाटात एके ठिकाणी एक अरूंद अशी खोल घळई आहे तिला उंबरखिंड म्हणतात. ह्या उंबरखिंडीचा रस्ता म्हणजे बंदूकीची नळी. नळीसारख्या बारिक वाटेने १०००० हजार मुघल सैन्य सह्याद्री डोंगर उतरत होते.  डोंगराच्या उंचच उंच सुळक्यांमध्ये कारतालब खानाचे सैन्याची चोहिकडून कोंडी झाली.

आणि याच मावळ भागात शिवाजी महाराजांच्या गुप्तहेरांचा सुळसुळाट होता. 

आणि याच उंबरखिंडच्या घनदाट अरण्यात लपून बसलेल्या शिवाजी राजांच्या मावळ्यांनी मुघलांवर बाणांच्या वर्षावाने व तोफांच्या गोळ्यांनी हल्ला सुरू केला. मुघल सरदारांनी जमेल तसा मराठा सैन्याचा बाणांचा हल्ला करुन प्रतिकार करण्यास सुरुवात केला.

 मराठा सैन्याला घाबरुन मुघल सैनिक वाट मिळेल तिकडे पळत होते.

पण शिवाजी राजांच्या मावळ्यांनी सर्व मार्ग अडवून धरले होते. मुघल सैन्याचे प्रचंड हाल होत असलेले पाहून रायबागन या शूर महिला सरदाराने खानाला शरण जाण्याचा सल्ला दिला. त्या सल्लावरुन कारतलब खानाने शेवटी तह करण्याची तयारी दाखवली आणि तसा शिवाजी राजांकडे दूत पाठवला.

कारतलब खान शरण आल्यामुळे राजांनी युद्ध थांबवले आणि त्याला अभय दिले. उंबरखिंडीच्या वेगवेगळ्या भागात लढत असलेल्या मराठा सैन्याला युद्धबंदीचा संदेश देण्यात आला व मुघल सैन्याला आल्या वाटेने परत जाण्यास सांगितले.

आपली सारी साधन संपत्ती आहे तिथेच सोडून कारतलबने निघून जावे. त्याच्या सैन्यातील स्थानिक लोकांना स्वराज्याच्या सैन्यात सामील व्हायचे असेल त्यांनी तशी मनाची तयारी दाखवावी अशा अटी महाराजांनी खानापुढे ठेवल्या होत्या.

महाराज म्हणतील त्या सगळ्याच्या सगळ्या अटी मान्य करण्याशिवाय खानापुढे दुसरा कोणताही पर्याय नव्हता.

कुरवंडय़ाला घाट चढून आल्यावर सैन्याकडे काही चीजवस्तू नाही ना याचा तपास करून साऱ्या सैन्याला जाऊ दिले. उरलेला सारा दिवस राजांचे सैन्य खानाच्या सैन्याची शस्त्रे, उत्तम वस्त्रे, डेरे-तंबू यांचे सामान, दागिने, घोडे, बैल इत्यादी प्राणी अशा गोष्टी महाराजाच्या सैन्यात ठेवून घेतल्या गेल्या आणि खानाला परत पाठवले गेले.

या उंबरखिंडीच्या लढाईत महाराजांचे हेरखाते किती सक्षम आहे हे स्पष्ट होते. 

वेगवान व सुनियोजित हालचालींनी अत्यंत कमी सैन्यबळ असतांना सुद्धा वीस हजार सैन्याचा पराभव राजांनी केवळ हजारभर सैन्याच्या मदतीने केला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.