महाशय आता विधानसभेत भाषण करतांना तोंडाला लगाम द्या, कारण विधानसभेची डिक्शनरी आलीये

महाशय आता विधानसभेत ओरडू ओरडू भाषण करतांना जिभेला लगाम द्या …असं सांगायची वेळ येणार नाही कारण आता तुम्ही भाषणात कोणते शब्द वापरायचे अन कोणते शब्द वापरायचे नाहीत याबद्दल ची एक डिक्शनरीच जाहीर करण्यात आली आहे.

आपण पाहत आलोय, चोर, फेकू, पप्पू आणि मूर्ख असे अनेक शब्दसुमने बरेच नेते एकमेकांवर उधळत असतात.

परंतु आता अशा नेत्यांच्या जिभेवर ताबा ठेवण्यासाठी मध्य प्रदेश विधानसभेचा स्वतंत्र शब्दकोश तयार केलाय. त्यात अशा शब्दांचा समावेश केलाय जे ‘असंवैधानिक’ आहेत. म्हणजेच संविधानाच्या अनुरूप नसलेले किंवा त्याच्या विरोधात असलेले शब्द म्हणजे unconstitutional असंवीधानिक शब्द होय. 

कोणती शब्द येतात डिक्शनरी मध्ये? 

फेकू, बेवकूफ, मूर्ख, पप्पू, चोर और नालायक, दरोडेखोर इत्यादी सारखे शब्द जे राजकीय नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना ह्या शब्दाचा वापर सऱ्हास करतात. आता ह्या सारखे शब्द  विधानसभेच्या सभागृहात वापरता येणार नाहीत. खरं तर आपण शब्दकोषातून असेच शब्द शिकत आलोत जे आपल्याला दैनदिन आयुष्यात वापरायला अधिक प्रभावशील वाटतात.

मात्र या डिक्शनरीमधून आमदारांना आता असे शब्द शिकावे लागतील जे चुकुनही त्यांच्या भाषणात आले नाही पाहिजेत. 

मध्य प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या ९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. चार दिवसांच्या अधिवेशनासाठीच्या अधिसूचना आत्ताच जारी करण्यात आल्या आहेत. विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेते यांच्यात केवळ जोरदार वादविवाद होत नाही तर काहीवेळा हा विषय हमरीतुमरीच्या भाषेपर्यंतही पोहचतो हे आपण बर्‍याच वेळा पाहत आलोय.

मागे झालेल्या महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशातील गोंधळ तर ताजी घटना आहे.

अशा परिस्थितीत मध्य प्रदेश विधानसभेने आमदारांना आत्ताच इशारा देऊन टाकला आहे. यासाठी  असंवैधानिक शब्दांचा शब्दकोष बनविला आहे.

असंसदीय भाषा टाळण्यासाठी मध्य प्रदेशातील आमदारांना दोन दिवस सक्तीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या ट्रेनिंगमध्ये विधानसभेत कोणते शब्द वापरायचे नाहीत हे सांगितले जाईल. तसेच लवकरच आमदारांना ३०० शब्दांचा शब्दकोष देण्यात येईल. यामध्ये ते शब्द नमूद गेले आहेत जे असंसदीय शब्दांच्या श्रेणीत येतात.

हा शब्दकोश तयार करण्यासाठी तीन महिने लागले आहेत.

या शब्दकोशाची रचना करण्यामागे थोडक्यात उद्देश हाच आहे कि, विधानसभेची प्रतिष्ठा टिकेल. आता पाहणं महत्वाचं आहे कि, या शब्दकोशानंतर येणारं मध्य प्रदेशच अधिवेशन सभ्य पद्धतीने पार पडेल, आयोजित करण्यात येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात हा शब्दकोश महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार हे मात्र नक्की !.

मध्य प्रदेशातील आमदारांसाठी तयार केलेल्या या शब्दकोषात फेकू, मूर्ख, मूर्ख, पप्पू, चोर आणि नायका या शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नाही तर अगदी ‘खोटारडे’ हा शब्द देखील  देखील समाविष्ट केला गेला आहे. विधानसभेत आमदार रागाच्या भरात हे शब्द वापरतात आणि आरोप करतात असे बर्‍याच वेळा पाहिले गेले आहे.

परंतु या लोकांच्या तोंडातून बाहेर पडणारे हे शब्द सर्वसामान्यांना चुकीचा संदेश देतातच, तर विधानसभेच्या प्रतिष्ठेलाही तडा देतात. मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे सरकार पडल्यानंतर, विशेषत: कॉंग्रेस सरकारच्या पतनानंतर अशा काही परिस्थिती उद्भवल्या होत्या, जेव्हा विधानसभेला खालच्या स्तराच्या वादविवादाला आणि तसेच अपशब्दाला सामोरे जावे लागले होते.

लोकसभेतही अशाच प्रकारची एक डिक्शनरी आहे

मध्य प्रदेशच्या विधानसभेत असलेला हा शब्दकोश आधीच लोकसभेत आहे, ज्याचा हेतू खासदारांना अराजकीय/असंविधानिक शब्द बोलण्यापासून रोखणे आहे.

या धर्तीवर हा शब्दकोश मध्य प्रदेश विधानसभेत तयार करण्यात आला आहे. तथापि, त्याचे अनुसरण केलं जाणार कि नाही हे पाहणे अजून बाकी आहे. राजकीय भाषेपासून ते संसदीय भाषेपर्यंत देशाच्या सन्मानात सातत्याने घसरण होत आहे, यासाठी कोणत्याही पक्षाला जबाबदार धरता येणार नाही कारण या प्रकरणात प्रत्येक जण तितकेच दोषी आहेत.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.