आणखी एका कर्जबाजारी सरकारी कंपनीला टाटांनी आपल्या पंखाखाली घेतलं

डळमळती अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीची वाढती समस्या पाहता त्यात मोदी सरकारचा अर्थ संकल्प सादर केला जातोय…पण बजेटच्या पूर्वसंध्येला एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी टाटा ग्रुप कडे, ती म्हणजे नीलाचल इस्पात टाटा लिमिटेड. नीलाचल इस्पात लिमिटेडचे खासगीकरण होणार अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करतांना केली आहे. 

एअर इंडियानंतर टाटा समूहातील टाटा स्टील लाँग प्रॉडक्टने केंद्र सरकारच्या नीलाचल इस्पात कंपनीच्या खरेदीसाठी लावलेली बोली केंद्राने मंजूर केली आहे.

नीलाचल इस्पात निगमचे निर्गुंतवणुकीचे काम पूर्ण झाले आहे. या कंपनीतील ९३ टक्के हिस्सा विकण्यासाठी सरकारने बोली मागवल्या होत्या.नीलाचल इस्पात निगमच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेत ३ कंपन्या शर्यतीत होत्या. यात टाटा स्टील, जेएसपीएल आणि जेएसडब्ल्यू स्टीलचा या कंपन्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, नीलाचल इस्पात निगमच्या निर्गुंतवणुकीसाठी ३ कंपन्यांकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या. टाटा स्टीलने नीलाचल इस्पात निगमसाठी बोली लावली होती. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार समितीने तोटय़ातील नीलाचल इस्पात निगम लिमिटेडसाठी (एनआयएनएल) लावली गेलेली १२,१०० कोटी रुपयांच्या बोलीला मान्यता देत स्टील लाँग प्रॉडक्ट्सला विकण्यास मान्यता दिली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून टाटा ग्रुपमधील बऱ्याच कंपन्या जबरदस्त कामगिरी करतायेत. अलीकडेच एअर इंडियाची टाटा समूहामध्ये वापसी झाल्याने टाटामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यातच आता टाटा ग्रुपमधील एका कंपनीने स्टील क्षेत्रातील मोठी कंपनी खरेदी केलीये त्यामुळे टाटा ग्रुप आता फुल्ल जोशात असणारे कारण लवकरच याबाबतची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे आणि मग अधिकृतरित्या टाटांकडे येणार..

नीलाचल इस्पात निगमच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेत टाटा स्टीलने सर्वात मोठी बोली लावली होती. एनआयएनएल हा सार्वजनिक क्षेत्रातील वेगवेगळय़ा कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असून त्यामध्ये एमएमटीसी, एनएमडीसी, भेल, मीकॉन आणि ओडिशा सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील मालकीच्या दोन कंपन्यांची मालकी आहे. एनआयएनएलचा ११ लाख टन क्षमतेचा एकात्मिक पोलाद निर्मिती प्रकल्प आहे. 

मात्र कंपनीला मोठय़ा तोटय़ाचा सामना करावा लागल्याने ३० मार्च २०२० पासून प्रकल्प बंद करण्यात आला होता. 

एनआयएनएलचे मूल्यांकन ६ ते ७ हजार कोटी रुपये होते. त्यासाठी टाटा स्टीलने १० ते १२ हजार कोटींच्या दरम्यान बोली लावली होती. नीलाचल इस्पात निगममध्ये एमएमटीसीची ४९ टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. सरकारने ९३ टक्के हिस्सा विकण्यासाठी आरएफपी जारी केला होता.  

एनआयएनएलचे खासगी क्षेत्राकडे हस्तांतरण ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील पोलाद उत्पादन उद्योगातील उपक्रमाच्या खासगीकरणाची ही आतापर्यंतची पहिलीच आणि मोठी घटना आहे.

अलीकडेच कर्जाच्या विळख्यात अडकलेली आणि केंद्र सरकारच्या मालकीची विमान वाहतूक कंपनी एअर इंडिया टाटा समूहातील कंपनीकडे १८,००० कोटी रुपयांना सोपवण्यात आली. एअर इंडिया सोडली तर एनआयएनएल देखील मोठी कर्जजर्जर कंपनी होऊन बसली होती. एनआयएनएलवर ३१ मार्च २०२१ अखेपर्यंत ६,६०० कोटींपेक्षा अधिक कर्ज आणि दायित्वे आहेत, ज्यामध्ये प्रमोटर (रु. ४,११६ कोटी), बँका (रु. १,७४१) देणी  थकीत आहेत. 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.