केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणतायत, ‘टाटा सन्स देशहितासाठी काम करत नाहीत.’
गुरुवारी संध्याकाळी भारतीय उद्योग महासंघाची वार्षिक सभा भरली होती. ‘भारत@75: आत्मनिर्भर भारत के लिए सरकार और व्यवसाय एक साथ’ हा सभेचा विषय होता. ही सभा ऑनलाईन होती. या सभेला उद्योग क्षेत्रातले दिग्गज, मंत्री वैगरे उपस्थित होते. या सभेत केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी टाटा सन्सला टार्गेट केलं. ते म्हंटले,
क्या आपके जैसी कंपनी, एक-दो आपने शायद कोई विदेशी कंपनी खरीद ली… उसका इंपोर्टेंस ज्यादा हो गया, देश हित कम हो गया? जब मैं टाटा संस को देखता हूं कि वे कुछ उपभोक्ता कानूनों या विनियमों के लिए आपत्ति कर रहे हैं जो मैं ला रहा हूं, तो स्पष्ट रूप से मुझे दुख होता है.
त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली असून, नव्या वादंगाला तोंड फुटले आहे.
गोयल असं का म्हंटले ते आधी समजून घ्यायला हवं, कारण टाटा सन्सचं भारताच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान आहे.
याची सुरुवात होते जुलै महिन्यांत. या महिन्यात ई-व्यापारविषयक नियमांसंदर्भात उद्योगजगताच्या प्रतिनिधींसोबत एक बैठक झाली होती. त्या बैठकीत केंद्र सरकारने ई-व्यापारविषयक नियमांचे धोरण जाहीर केले होते.
व्यापार उद्योगात आलेल्या डिझीटलायझेशनमुळे अनेक बदल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स कंपन्यांकडून मनमानी कारभार सुरु असल्याचे म्हणत, ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे राष्ट्रीय महामंत्री प्रविण खंडेलवाल यांनी थेट केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती.
त्यांनी आपल्या तक्रारीत ई- कॉमर्स कंपन्यांनी व्यापार जगताला खराब करुन टाकल्याचा आरोप केला. तसेच ई-कॉमर्स कंपन्यासाठी कठोर नियम लागू करावेत असे ही म्हंटले.
त्यावर सरकारने जे धोरण लागू केले यावर ई क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवसायावर वाईट परिणाम होईल, असे नमूद करीत टाटा समूहाने घेतलेल्या आक्षेप नोंदवला होता. त्याबाबतही वृत्त प्रसिद्ध झाले होते. व्यवसायात भागीदार असणाऱ्या ‘स्टारबक्स’ला टाटांच्या ई-विक्री संकेतस्थळावरून त्यांची उत्पादने विकण्यापासून प्रतिबंधित केले जावे, हे विपरीतच आहे, असे टाटा समूहाने म्हंटले होते.
त्यावर टाटाने दिलेल्या टीकेचे प्रत्युत्तर गोयल यांनी अशा प्रकारे दिल्याची चर्चा आहे.
त्याचबरोबर आपल्या भाषणात गोयल यांनी उदय (कोटक), पवन (गोएंका), टाटा, अंबानी, बजाज आणि बिर्ला यांच्यावरही टीका केली. मंत्र्यांनी त्यांच्यावर राष्ट्रहिताचे काम न केल्याचा आरोप केला आहे.
या सभेतच गोयल यांनी टाटा स्टीलला त्यांचा माल जपान आणि कोरियाला विकण्याचे आव्हान दिले, ते म्हंटले हे देश राष्ट्रवादी आहेत आणि आयात केलेले स्टील विकत घेत नाहीत. पुढं ते म्हणतात,
“हम नेशनलिस्टिक स्पिरिट की बात करते हैं तो कई लोग हमें मीडिया में दकियानूसी बोलते हैं, बैकवर्ड बुलाते हैं. जापान, कोरिया में कोई बैकवर्ड नहीं बुलाता.”
‘सीआयआय’द्वारे आयोजित या सभेला टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन उपस्थित होते. प्रस्तावित ई-व्यापारविषयक नियमांवरील टाटांकडून आलेल्या आक्षेपामुळे आपण दुखावलो आहोत आणि तसे आपण चंद्रशेखरन यांनाही कळविले आहे, असे गोयल पुढे स्पष्टपणे बोलूनही गेले.
टाटा समूहाने मात्र गोयल यांच्या थेट टिप्पणीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हे ही वाच भिडू
- चीनला फाईट देण्यासाठी टाटा आता या क्षेत्रात तयारीने उतरतंय
- जे.आर.डी. टाटांमुळेच नेहरूंनी पंतप्रधान रिलीफ फंडची सुरवात केली.
- ८१ वर्षांपूर्वी जेआरडी टाटांनी शिक्षणासाठी मदत केली तो विद्यार्थी पुढे राष्ट्रपती झाला