ठंडा मतलब “कोका कोला” बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का….?

 

ठंडा मतलब कोका कोला,

‘कोका-कोला’ हा ब्रॅण्ड जागतिक आहे. कोका कोलाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे ? हा बॅण्ड अमेरिकेचा आहे. तो शंभर वर्षाहून अधिक जूना आहे… तर या सगळ्या गोष्टी जून्या झाल्या आहेत. या गरमा गरमीच्या मौसमात आम्ही घेऊन आलोय कोका कोलाच्या अशा गोष्टी ज्या वाचल्यानंतर शंभर टक्के तुमचे पैसे फिटतील. तसही इथं कोण पैसे भरुन येतय म्हणा …

 

हं तर चालू करतो इंटरेस्टिंग गोष्टी सांगायला –

 

१) ‘कोका-कोला’ जेव्हा मार्केटमध्ये लॉच करण्यात आला, तेव्हा त्याला ‘ब्रेन टॉनिक’ म्हणून विकण्यात येत असे. त्यावेळी असा दावा करण्यात आला होता की ‘कोका-कोला’ हा थकवा दूर करण्यासाठी उपयोगात येऊ शकतो.

Screen Shot 2018 05 10 at 5.31.54 PM

 

२) ‘कोका-कोला’  कोकेनयुक्त असायचा. अगदी बरोबर वाचलंत. सुरवातीच्या काळामध्ये कोका-कोला मध्ये कोकेनची मात्र ठेवण्यात आली होती. प्रत्येक ग्लासमागे ९ मिलीग्राम इतकं कोकेन कोका कोलामध्ये मिसळलं जात असे. १९०३ साली कोका कोलामधून कोकेन हटवण्यात आलं.

३) आज कोका-कोला जगभरात विकला जातो, पण संपुर्ण जगात असा एक देश आहे, जिथं कोका-कोला विकला जात नाही तो म्हणजे उत्तर कोरिया. उत्तर कोरियाच्या हुकूमशहा नेहमी एवढा तापलेला असतो त्यामागं मुख्य कारण म्हणजे तो कोका-कोला पित नसावा हे देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

४) कोक हा कोणामध्येही मिक्स होतो. खऱ्या अर्थाने कोक पुरोगामी आहे. जगभरातल्या इतक्या ड्रिंक्समध्ये कोका-कोला मिक्स होतो की, रोज एक चव घ्यायची झाल्यास तुम्हाला तब्बल नऊ वर्षे लागतील. याठिकाणी मिक्स होणं म्हणजे नुसतं मिक्स होणं, असं नसतं तर मिक्स झाल्यानंतर त्याची वेगळी चव येणं अपेक्षीत असतं.

Screen Shot 2018 05 10 at 5.32.47 PM

५) सर्वात प्रथम कुपन सिस्टिम आणण्याचा मान कोका कोलाला द्यावा लागतो. १८८६ साली कोका कोलाने सर्वात पहिल्यांदा कोक सोबत कुपन दिले होते.

६) सांता क्लॉजचा जो लाल आणि पांढरा ड्रेस आहे तो तयार करण्याचा मान कोका कोलाकडे जातो. १९२० च्या दरम्यान एका जाहिरात मोहिमेसाठी कोका कोलाने लाल आणि पांढऱ्या कपड्यांमधला सांता क्लॉज दाखवला होता. सांताक्लॉजच्या याच कपड्यांचा रंग पुढे परमनंट झाला.

७) अंतराळात जाणारी पहिली ड्रिंक्स म्हणून कोका कोलाचा उल्लेख केला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.