आव्वाज कुणाचा, सचिन खेडेकरांचा !!! 

गाव गोळा हे आपलं हक्काच सदर. फक्त हे सदर लेखकाच्या मुडवर येत हे या सदराचं दुर्देव. तसही गाव उगीच कधीपण गोळा होत नसतय म्हणा. लोकांचा मुड बघुनच गाव गोळा होत असतय. आत्ताचा दोन दिवसातला मुड बघितला आणि म्हणलं चला प्रत्येक न्यूज चॅनेलच्या कमेंट बॉक्समध्ये डोकवावं आणि जे चांगल असेल ते तुमच्या पुढ आणुन मांडावं.

तुम्ही तर बिचारे किती दिवस प्रत्येक ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये जावून चर्चा वाचत बसणाराय त्यापेक्षा आमच्यासारख्या रिकाम्या लोकांनी हे काम केल की आमच्या पण हाताला काम मिळलं आणि तुमची पण सोय होईल. 

असो लांबड सोडू आणि मुद्यावर येवू. “बहुप्रतिक्षित ठाकरे सिनेमाचा ट्रेलर लॉन्च” ही सर्वाधिक क्लिक मिळालेली बातमी असावी अशी आमची शक्यता आहे. लोकांनी फुटूफुटून ट्रेलर पाहीला. आम्ही तर ABP माझावर ट्रेलर लॉन्चचा सोहळा देखील पाहीला. “मराठी माणूश जाग उठो” नावाची पाटी पाहिली आणि मराठी पाट्यांच्या आंदोलनासाठी बाहेर पडलो ते थेट रात्रीच आलो. 

तेवढ्यात आवाज गंडलाय म्हणून चॅनेलवाले पाट्या लावायला लागले. मग शिरलो कमेंटबॉक्समध्ये आणि एकसे एक इर्साल कमेंट खास तुमच्यासाठी निवडुन आणल्या, 

वाचा आणि शांत बसा नायतर फुकटचा मार खाल. 

पहिली कमेंट दिसली,

आवाज कोणाचापण असो दहशत वाघाचीच असणार..

पुढे वाचायचं का नाही हा विचार क्षणभर हि कमेंट वाचून चमकून गेलाच. पण धाडस केलं तर पुढच्या पानभर कमेंट चेतन शशीतल आणि बाळकडू यावर होत्या. साधारण प्रत्येकाचं एकच म्हणणं होतं.

पहिला म्हणत होता, बाळकडू मध्ये सेम आवाज होता तोच आवाज द्यायला हवा. दूसरा म्हणत होता चेतन शशीतल यांनी चांगला आवाज दिला असता त्यांच्याच आवाजात पुन्हा डबिंग करा. आणि तिसरा म्हणत होता बाळकडूमध्ये चेतन शशीतल यांचा आवाज प्रभावी होता तो द्या.(चेतन नाव बरोबर वापरण्यात आल होतं पण प्रत्येक ठिकाणी शशीतल, सत्शील, शिशितल वगैरे वगैरे वापरण्यात आलं होतं)  

पण यातही एक कमेंट भारी होती कारण त्यात आकडेवारी होती. ती कमेंट अशी होती की, 

चेतन सतशील यांचा आवाज बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजासोबत 99.99 टक्के जुळतो हे सिद्ध झालं आहे. तरी तुम्ही तो आवाज का नाकारलात. (आम्हाला 00.01 टक्के कुठे गेले यांची चिंता लागून राहिली) 

त्यातही एकजण म्हणत होता अजून वेळ गेली नाही.. तो नक्की शिवसेनेच्या पाठिंब्याच्या भूमिकेवर बोलत होता की आवाजावर बोलत होता ते समजलं नाही. 

अजून एक मुद्दा असा होता की, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो या अजरामर वाक्याने ट्रेलरची सुरवात व्हायला हवी होती. तोच आवाज वापरून. पण इथे कोणाची शैली आडवी आली कोणास ठावूक.

अजून एक, 

कास्टिंग बघायची असेल तर 26/11 पहायला हवा होता. तुकाराम ओंबळे जसेच्या तसे होते. इथे कास्टिंगच फसलय बाकीचं काय बोलणार. (सदरचे ग्रहस्थ डबिंगवरुन कास्टिंगवर गेले याच कौतुक वाटलं) 

असो यात आम्हाला सचिन खेडेकर यांच्यावर केलेली एक टिप्पनी देखील विशेष आवडली, त्या व्यक्तीचं म्हणणं होतं, 

बाळासाहेबांच्या आवाजाला सचिन खेडेकरचा आवाज मिळाल्यामुळे कोकणस्थ सिनेमा पाहत असल्यासारखे वाटेल. सेनेच्या शाखांच संघाची शाखा करण्याचा हा कुटिल डाव देखील असू शकतो. (क्रिएटिव्हिटीचा कळस म्हणायला हवा) 

बाकी चेतन सतशील यांच्यानंतर नंबर लागला तो राज ठाकरे यांचा. १०-२० टक्के लोकांची हि देखील मागणी आहे की आवाज राज ठाकरेंचा द्यायला हवा होता. बाकी लोकसत्तावाल्यांनी यावर देखील वोट घेतलं हजार एक लोकांनी मतदान केलय त्यात ८६ टक्के लोक म्हणतायत आवाज चेतन शशीतल यांचा पाहिजे.

आत्ता जाता जाता शेवटची कमेंट, 

एक व्यक्ती म्हणाली, नवाझुद्दीन भूमिकेत इतका शिरला की स्वत:ला काठ्या मारून म्हणत होता भाग युपी.. भाग युपी.. भो..  

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.