युपी ATS ने पकडून दिलेल्या त्या संशयित अतिरेक्यांना दिल्लीच्या स्पेशल सेलने सोडून दिलं..

काल दिवसभर दहशतवाद्यांच्या बातम्यांनी एकच खळबळ उडवली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने १४ सप्टेंबरला पाकिस्तान समर्थित मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केला होता. यात पाकिस्तान प्रशिक्षित दोन दहशतवाद्यांसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती. जे येणाऱ्या सणासुदीच्या काळात वेगेवगेळ्या राज्यांमध्ये सिरीयल ब्लास्ट करणार होते.

हे सगळे दहशतवादी दिल्ली, युपी आणि महाराष्ट्रातून अटक करण्यात आले होते. ज्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि हत्यारं जप्त करण्यात आली होती. काल दिवसभर या ६ च्या ६ जणांची तसेच  त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली जात होती. 

दिल्ली पोलिसांच्या मते, त्याना केंद्रीय गुप्तचर संस्थेकडून या टोळीबद्दल विश्वसनीय इनपुट मिळाले होते. ज्यानुसार, पाकिस्तान एका टोळीच्या माध्यमातून भारतात आयआयडी स्फोट घडवण्याची योजना आखतयं. दिल्ली पोलिसांनी प्रेस नोट देखील जारी केली. आयईडी स्फोटाची तयारी बरीच अड्वान्स झाल्याचे सांगण्यात आले.

इनपुटमध्ये असेही म्हंटले गेले की, दिल्लीच्या ओखला भागातील कोणीतरी ही योजना चालवतंय. यांनतर ह्या सगळ्या कटाचा शोध घेण्यासाठी स्पेशल सेलने एक टीम तयार केली. ज्यांतर्गत मुंबई, लखनऊ,  प्रयागराज, रायबरेली आणि प्रतापगढमध्ये एकाच वेळी अनेक पथके तैनात करण्यात आली.

यानंतर १४ सप्टेंबरला वेगवेगळ्या राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले आणि संशयितांना अटक करण्यात आली. या कामात यूपी पोलिसांनी देखील दिल्ली पोलिसांनाची मदत केली. ज्यात यूपी एटीएस टीमने ३ जणांना ताब्यात घेतलं. 

यात प्रयागराजमधील करेलीचा रहिवासी महंमद ताहिर उर्फ ​​मदनी, प्रतापगढचा रहिवासी मुहम्मद इम्तियाज उर्फ ​​कल्लू आणि रायबरेली मधला उंचाहार इथला रहिवासी मोहम्मद जमील उर्फ ​​जमील खत्रीचा समावेश आहे. सर्व सहा आरोपींना दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडे सोपवण्यात आले. या संबंधित माहिती यूपी एटीएसचे प्रमुख जी.के. गोस्वामी आणि यूपी एडीजी प्रशांत कुमार यांनी दिली.  यासंदर्भात प्रेस नोटही जारी करण्यात आली.

मात्र, आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चौकशी नंतर यातल्या दोघांना सोडून दिल्याचं समजतंय.  स्पेशल सेलच्या म्हणण्यानुसार या दोघांकडे अटक करावी अशी कोणतीचं माहिती नव्हती म्ह्णून त्यांना त्यांच्या घरी पाठवून देण्यात आले.  तर तिसऱ्या व्यक्तीची माहिती नाकारली. स्पेशल सेलने सांगितले की, यूपी एटीएसने फक्त दोन लोकांना त्यांच्याकडं सोपवलं होत, ज्यांना त्यांच्या कुटुंबाकडे परत पाठवलं गेलय.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मोहम्मद इम्तियाज आणि मोहम्मद जमील या दोन संशयितांना चौकशी केल्यानंतर सोडून देण्यात आलं. तर स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी ताहीरबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं.

दिल्ली पोलिसांना इम्तियाज आणि जमील यांच्याकडून प्राथमिक चौकशीत कोणतीच माहिती मिळाली नाही. तसेच त्यांच्याविरुद्ध  कोणतेही मिळाले नाहीत. यामुळे, या दोघांच्या कुटुंबियांना बोलावून त्यांना परत पाठवलं गेलं.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.