नद्यांमध्ये सापडणाऱ्या मृतदेहांवर लगाम लावण्यासाठी योगी सरकार धर्मगुरूंची मदत घेणार ..

उत्तरप्रदेशच्या यमुना नदीत मृतदेह तरंगताना सापडल्याची घटना ताजी असतानाच गेल्या काही दिवसांपूर्वी आणखी एक अशीच घटना समोर आली. टाइम्स नाऊने दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या बक्सरमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर तब्बल १५० पेक्षा जास्त मृतदेह तरंगताना सापडले.

पण हे सगळे मृतदेह बघून भीतीमुळे सध्या गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.

दिवसेंदिवस अशा घटना वाढताना दिसत आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशात नद्यांमध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या मूद्दयाने जोर धरलाय. या तरंगत्या मृतदेहा मागचं कारण म्हणजे कोरोना संक्रमित मृतांवर अंत्यसंस्कारासाठी जागा आणि जमीन मिळत नसल्याने ते नदीत प्रवाहित करण्यात आले आहेत. ज्यामूळे नद्यांची माती दूषित झाल्याची चर्चा सगळीकडं पसरलीये. संशोधकांनी देखील याबाबत अंदाज व्यक्त केला असून कानपूर आयआयटीची टीम यावर काम करतेय.

दरम्यान, नद्यांमध्ये सापडलेल्या मृतदेहाबाबत विरोधकांच्या आरोपांनी वेढलेले उत्तर प्रदेश सरकार आता धार्मिक नेत्यांची मदत घेऊन लोकांना या संदर्भात जागरूक करणार असल्याचं समजतयं. स्वत: सरकारी प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिलीये.

राज्य सरकारच्या प्रवक्त्याने एका वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले की,

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी टीम नाईनशी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देताना म्हंटले की मृतदेहाच्या अंतिम संस्कारसाठी नदी किंवा नदीच्या काठावर दफन करण्याची प्रक्रिया पर्यावरणपूरक नाही आणि या संदर्भात धर्म गुरूंशी चर्चा केली जावी, जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या आदेशात म्हंटलं की, एसडीआरएफ आणि पीएसीच्या जल पोलिसांनी राज्यातील सर्व नद्यांवर गस्त घालणे चालू ठेवावे आणि कोणत्याही परिस्थितीत पाण्यात मृतदेह प्रवाहित होऊ नये, याची काळजी घ्यावी

मुख्यमंत्री म्हणाले की, मृतांच्या कुटुंबाच्या दू:खात प्रादेशिक सरकार सहभागी आहे आणि अंत्यसंस्काराची प्रक्रिया मृतांच्या धार्मिक श्रद्धेनुसार केली जावी. अंत्यसंस्कार सुरळीत पार पडण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक आर्थिक मदतदेखील पुरविली जात आहे आणि पारंपारिकरित्या देखील जलसमाधी होत असल्यास किंवा कुणी मृतदेह लावारिस सोडत असेल, तरीही त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या धार्मिक मान्यतेनुसार केले जाईल.

राज्यातील बलिया, गाझीपूर आणि उन्नावसह अनेक जिल्ह्यात मोठ्या संख्येने मृतदेह नद्यांमध्ये वाहून गेलेले आढळले. याशिवाय गंगेच्या काठावरील वाळूमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह पुरल्याची बातमीही चर्चेत आहे.

या गंगेच्या पाण्यात तब्बल 2000 मृतदेह वाहून आल्याचे समजते. ज्यामूळे संसर्ग पसरण्याची भिती निर्माण झालीये. याबाबत विरोधी पक्ष या सरकारवर हल्ला करत असून या मृत्यूंसाठी राज्य सरकारला दोष देत आहे. या टीकांमुळे उत्तर प्रदेशमधील योगी सरकार बरोबरच केंद्रात असलेल्या मोदी सरकारवर टीका सुरु झाली आहे.

हि परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून योगी सरकार वेगवेगळ्या धर्माच्या धर्मगुरूंना लोकांच्यात जनजागृती वाढावी यासाठी मदतीला घेणार आहे.  

उत्तर प्रदेश मधील सरकारी प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले की, तज्ञांनी कोविड -19 लाटेच्या तिसर्‍या लाटेबाबत इशारा दिला आहे आणि उत्तर प्रदेशने त्यासाठी संपूर्णपणे तयार असावे आणि सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 100-100 बेडचा बालरोग आयसीयू वॉर्ड तयार करावा. गोरखपूर मेडिकल कॉलेज आणि केजीएमयू लखनऊचे डॉक्टर या संदर्भात चांगले प्रशिक्षण घेत आहेत.

ते म्हणाले की, त्यांच्या अनुभवांचा फायदा घेऊन राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जावे.

योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, ऑक्सिजनची मागणी, पुरवठा आणि खर्चाचे संतुलन साधण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या ऑक्सिजन ऑडिटचा चांगला परिणाम झाला आहे, बहुतेक रिफाईलर्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता 48 ते 72 तासांचा ऑक्सिजन बॅकअप आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.