युपीच्या निवडणुकीसाठी ‘आम आदमी पार्टी’ तिरंगा झेंडा घेऊन उतरलीय

पुढच्या वर्षी २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहेत. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात या निवडणूक होणार असल्याचं समजतंय. दरम्यान आत्तापासूनच राज्यात निवडणुकांचे रणशिंग फुंकलेय.  एकीकडे सत्ताधारी पक्ष भाजपा ब्रँड योगींच्या बॅनरखाली सगळ्या विधानसभा क्षेत्रात प्रबुद्ध सम्मेलन घेणार असल्याचं समजतंय, तर काँग्रेस निडणुकीच्या दृष्टीने नवींनवीन प्लॅन आखतंय.

अश्यातच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं तिरंगा संकल्प यात्रेच्या मदतीनं आगामी निवडणूक प्रचाराचा नारळ फोडलाय.  दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी संजय सिंह यांच्या नेतृत्वात ही यात्रा पार पडणार आहे.

लखनऊ, आग्रा आणि सध्या नोएडात ही  तिरंगा संकल्प यात्रा काढलीये गेलीये. २९ ऑगस्टला नोएडाच्या गेट नंबर ४ पासून सुरु झालेली ही यात्रा सेक्टर ३७ पर्यंत काढली गेली. तर येत्या १४ सप्टेंबरला हि तिरंगा यात्रा अयोध्यात काढली जाणार असल्याचं सिसोदिया यांनी सांगितलं.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी संजय सिंह यांनी यात्रे आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना  म्हंटल कि,

या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला सांगितले जाईल की, राज्यात भ्रष्टाचार संपेल आणि विकासाची गंगा वाहणार आहे. आम आदमी पार्टीने दिल्लीत ज्या प्रकारे विकास केला आणि विकासाचे रोल मॉडेल स्वीकारले, तेच रोल मॉडेल आता आम आदमी पार्टी उत्तर प्रदेशात आणेल, ज्यामुळे राज्याच्या विकासाला आणखी गती मिळेल.

आपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, केजरीवाल यांच्या नेतृत्वखालील दिल्ली सरकारने वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षणावर काम केले आहे, त्याच रोल मॉडेलसह आम्ही २०२२ च्या निवडणुकीत उतरू.

आपचे कर्यकर्त्ये गावा- गावात, शहरात जाऊन दिल्ली सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतील. २४ तास ३०० युनिट मोफत वीज, पाणी आणि राशन लोकांना विनामूल्य उपलब्ध होईल.  शेतकऱ्याला त्याच्या पिकाची योग्य किंमत मिळावी, तरुणांना नोकऱ्या आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, महिलांचे  संरक्षण, मोफत बस प्रवास, वृद्धांसाठी पेन्शन हा आम आदमी पक्षाचा राष्ट्रवाद आहे.  राज्यातील जनतेच्या अपेक्षा आदमी पार्टी सुशासन देईल ज्याची राज्यातील जनतेला अपेक्षा आहे.

आम आदमी पार्टीचा दावा आहे की,

तिरंग्याचे रंग पक्के आहेत. शुद्ध तुपाप्रमाणेच ते शुद्ध राष्ट्रवादाचा व्यवसाय करतायेत. जर भारतातील आणि आता उत्तर प्रदेशच्या मतदारांना राष्ट्रवादाची खरी चव चाखायची असेल तर त्यांनी त्यांच्या दुकानात यावे.

दरम्यान, २९ ऑगस्ट ला आग्र्यात तिरंगा यात्रा रॅली काढणाऱ्या दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आपच्या राज्याचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यासह जवळपास ५०० लोकांविरोधात महामारी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलायं. पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी यात्रेत परवानगीपेक्षा जास्त लोकांना सामील केले होते, जे कोविड -१९ प्रोटोकॉलचे उल्लंघन करते.

याआधी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता यात्रेला परवानगी नाकारली होती. मात्र, नंतर प्रशासनानं यंत्राला हिरवा कंदील दाखवला. मात्र, परवानगीपेक्षा जास्त लोकांच्या सहभागामुळे आम आदमी पार्टीच्या नेत्यांविरोधात आयपीसीच्या कलम १८८, २६९आणि २७० अन्वये पोलीस स्टेशन लोहमांडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात १७ बड्या नेत्यांची नाव आहेत तर  सुमारे साडेचारशे अज्ञात व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान, दिल्लीत सलग दोन वेळा सत्तेत येऊन आपला जम बसवलेला आप पक्ष, पंजाबमध्येही सध्या आघाडीचा पक्ष म्हणून समोर आलाय. आता आप हळू- हळू आपले पाय पसरवताना दिसतेय.ज्याचं पुढचं टार्गेट दिल्ली असणारे. २०१७ च्या नागरी निवडणूकातून मिळालेल्या यशानंतर आपनं उत्तर प्रदेशात सगळ्या ४०३ विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं बोललंय.  

हे ही वाच भिडू  :

 

Leave A Reply

Your email address will not be published.