यूपीत निवडणूक लढवायला भाजपच्या सहयोगी पक्षाला उमेदवार सुद्धा मिळेनात !

सध्या देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचा मोठा गाजावाजा सुरुय. त्यात आणि पंजाब, गोवा आणि उत्तरप्रदेशवर सर्वांच कसं बारीक लक्ष आहे. म्हणजे तिकडं काडी जरी हलली तरी इकडं बातम्या सुरू, असं सगळं गणित झालंय. 

आता उत्तरप्रदेश गाजतय ते नेत्यांच्या पक्षांतरामुळे. भाजपला उत्तरप्रदेश मध्ये गळती लागल्याची दृश्य तुम्हाला दिसत असतील. अगदी त्याच पध्दतीने भाजपच्या सहयोगी पक्षांना सुद्धा गळती लागल्याची दृश्य उत्तरप्रदेशच्या राजकारणात तुम्हाला दिसतील.

रविवारी म्हणजे कालच भाजपचा सहयोगी पक्ष अपना यांनी आपली पहिली यादी जाहिर केली, आणि अहो आश्चर्यम, यादीत फक्त एकच नाव होतं. 

होय तर, रविवारी अपना दलाने फक्त रामपूर विधानसभा मतदारसंघासाठीच एक नाव जाहीर केलंय. उमेदवाराचं नाव आहे, हैदर अली खान ! २०१४ नंतर पहिल्यांदाच भाजपच्या सहयोगी पार्टीने एखाद्या मुस्लिम उमेदवाराचं नाव जाहीर केलंय. आणि तो उमेदवार पण एकटाच.

या हैदर अली खानची मुख्य लढत आहे समाजवादी पार्टीचे नेता आजम खान यांच्या मुलाशी. आजम खान यांचा मुलगा अब्दुल्लाह आजम खान तसा तुल्यबळ उमेदवार आहे. २०१७ च्या निवडणूकीत हा अब्दुल्लाह जिंकून आमदार झालाच होता, पण मग अलाहाबाद हायकोर्टाने त्याची आमदारकी चुकीचं एफ़िडेविट सादर केलं म्हणून रद्द केली.

आता अपना दलाने उमेदवारी दिलेले हे हैदर अली खान महाशय कोण आहेत ?

तर हे प्रस्थ काय साधासुध नाही. रामपूरचे नवाब यांच्या कुटुंबाशी या हैदर अली खान यांचा संबंध आहे. आता या हैदर अलींचं विशेष काय असेल तर काँग्रेसी नेते नवाब काजीम अली यांचे हे सुपुत्र आहेत. आणि काँग्रेसच्या माजी आमदार नूरबानो यांचे ते नातू आहेत. आता अजून विशेष विशेष म्हणजे हैदर यांचे वडील नवाब काजीम अली रामपूरच्या सदर मतदारसंघतून काँग्रेसच्या तिकिटावर ही निवडणूक लढतायत.

हे हैदर अली खान उच्चशिक्षित आहेत. त्यांनी दिल्लीतल्या मॉडर्न स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर परदेशातही शिक्षण घेतलय. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वडील काजीम अली खान यांच निवडणूक व्यवस्थापन पाहिल होत. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी बसपकडून निवडणूक लढवली. 

पण हैदर अली यांची उमेदवार म्हणून ही पहिलीच निवडणूक आहे. आणि ते रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसलं. 

हैदर अली खान प्रसिद्धीच्या झोतात आले कारण काँग्रेस मध्येच असताना त्यांनी दिल्लीत जाऊन अनुप्रिया पटेल यांची भेट घेतली आणि अपना दल (एस) मध्ये सामील झाले. याआधी काँग्रेसने त्यांना स्वार मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, पण आता त्यांनी काँग्रेस सोडली आणि अपना दलाला जवळ केलं. 

काही राजकिय जाणकारांच्या मते, हैदर अली यांना अनुप्रिया पटेल आणि योगी आदित्यनाथ यांचं काम प्रभावित करत. पण त्याही पेक्षा महत्वाचं काय असेल तर राजकारण. आजम खान आणि रामपूरच्या नवाबांच वाकड आहे. आता या वाकड्या राजकारणात मेख मारायला मदत करतील ती योगीजी. म्हणून हा आधार घेतल्याची चर्चा यूपीत आहे. पण हैदर अली यांनी पीटीआयला पक्षांतराच कारण सांगितल. ते म्हणाले,

“मैं अपना दल (एस) में इसलिए शामिल हुआ क्योंकि मैं अपने इलाके का विकास करना चाहता हूँ.”  

आता काँग्रेस मध्ये राहून त्यांना वाटलं असेल की, मी काय माझ्या भागाचा विकास करू शकत नाही. पण मग एक प्रश्न पडतो की जर ते काँग्रेस मध्ये राहून विकास करू शकत नाहीत तर त्यांचे वडील काँग्रेस मध्ये काय करतायत ? असो आपल्याला काय पॉप कॉर्न खाओ bella ciao !!!

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.