फक्त योगीजी नाही तर सपा-बसपा देखील ब्राम्हण मतदारांना आकर्षित करण्याच्या मागे लागले आहेत..
बहुजन समाजवादी पक्षाच्या वतीने शनिवारी आयोध्येत ब्राह्मण संमेलन घेतले. त्याला दोन दिवस उलटले नाही तर सोमवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सुद्धा ब्राह्मण समाजाचे संमेलन घेणार असल्याची घोषणा केली. हेच नाही तर उत्तरप्रदेश मधील ७५ जिल्ह्यांमध्ये परशुरामाचे मंदिर बांधण्यात येणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले. तर यातील ५ जिल्ह्यांमध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले आहेत. तर लखनऊ येथे परशुरामाची १०८ फुटांची मूर्ती उभी करण्यात येणार आहे.
हे सगळे कार्यक्रम, घोषणा पुढील वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन करण्यात येत आहे. सपा, बसपा आणि भाजपच्या वतीने येणाऱ्या घोषणा, कार्यक्रमांमधून एक गोष्ट लक्षात येत आहे की, हे सर्व पक्ष ब्राह्मण समुदायातील मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न करत आहे.
यानंतर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की? उत्तरप्रदेश निवडणुकी पूर्वी ब्राह्मण समाजाला एवढे का महत्व देण्यात येत आहे? युपीत ब्राह्मण लोकसंख्या किती आहे, त्यामुळे किती मतदारसंघात त्याचा परिमाण होतो, मागच्या निवडणुकीत किती ब्राह्मण उमेदवार निवडून आले होते. याचा सविस्तर घेतलेला हा आढावा.
उत्तरप्रदेश मध्ये किती टक्के ब्राह्मण आहेत
उत्तरप्रदेश मधील सरकारची कमान अनेक वर्ष ब्राह्मण समाजाकडे राहिली आहे. स्वातंत्र्य पासून ते १९८९ पर्यंत उत्तरप्रदेशमध्ये ६ ब्राह्मण मुख्यमंत्री राहिले आहे. मात्र मंडल आयोगानंतर यात खंड पडल्याचे पाहायला मिळते. नारायण दत्त तिवारी यांच्यानंतर उत्तरप्रदेश मध्ये कुठल्याचं ब्राम्हण व्यक्तीला मुख्यमंत्री पद मिळाले नाही.
उत्तरप्रदेशच्या एकून मतदारांची संख्या पहिली तर जवळपास १३ टक्के ब्राह्मण मतदारांची संख्या आहे. जरी संख्या कमी असली तरी ब्राह्मण समाजाचा जवळपास ५० मतदारसंघात प्रभाव पडत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
मुलायम सिंह यांच्या कार्यकाळातच उत्तरप्रदेश मध्ये परशुराम जयंतीच्या दिवशी सुट्टीचे घोषणा केली होती. त्यामुळे आता पहिल्यांदाच समजवादी पक्ष अशा प्रकारे काही करत आहे हे म्हणणे चुकीचे आहे.
सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसाइटीज केलेल्या अभ्यासानुसार,
विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ८० टक्के ब्राह्मण मतदारांनी भाजपला मते दिली. सध्या उत्तरप्रदेश विधानसभेत ५८ ब्राह्मण आमदार असून त्यातील ४६ आमदार भाजप मधून जिंकून आले आहेत. २०१२ मधील निवडणूक सुद्धा समाजवादी पक्षाकडून २१ ब्राह्मण आमदार निवडून आले होते. तर मतदान ३८ टक्के ब्राह्मण मतदारांनी पक्षाला मते दिली होती.
१९९३ मध्ये बसपाकडून ब्राह्मण समुदायाचा केवळ १ आमदार निवडून आला होता. मात्र प्रत्येक निवडणुकीनंतर यात भर पडत गेली. २००७ मध्ये बसपाने आपली रणनीती मध्ये बदल केला आणि अधिक ब्राह्मण नेत्यांना उमेदवारी दिली. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला.
२००७ च्या निवडणुकीत बहुजन समजवादी पक्षाकडून तब्बल ब्राह्मण समुदायातील ४१ उमेदवार निवडणून आले होते. दलित- ब्राह्मण सोशल इंजिनियरिंग केल्याने मायावती यांच्यासाठी सत्तेचे दरवाजे खुले झाले होते. त्यावेळी १७ टक्के ब्राह्मण मतदारांनी बहुजन समाजवादी पक्षाला मतदान केले होते असे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसाइटीज अभ्यासातून समोर आले होते.
लोकसभा निवडणुकीत ब्राह्मण समुदायाने कोणाला मतदान केले?
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ७२ टक्के ब्राह्मण समुदायाने भाजपला मतदान केल्याचे अभ्यासांती समोर आले आहे. तर सपा आणि बसपाला प्रत्येकी ५-५ टक्के मतदान आणि कॉंग्रेसला ११ टक्के ब्राह्मण मतदारांनी मतदान केल्याचे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसाइटीज अभ्यासातून समोर आले आहे.
तसेच २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवणुकीत ८५ टक्के ब्राह्मण मतदारांनी भाजपला मतदान केल्याचे समोर आले होते.
सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसाइटीज अभ्यासातून एक निष्कर्ष मिळाला आहे की, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका आणि २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशात ब्राह्मण मतदारांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवणुकीत ब्राह्मण समुदायचे मतदान कुठल्या पक्षाला मिळते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांकडून का आटापिटा सुरू आहे.
हे ही वाच भिडू
- पुण्यातील त्या एका वादानं उत्तरप्रदेशातील राजकारण कायमचं बदलून टाकलं
- UP इलेक्शनच्या तोंडावर मोदीजी OBC आरक्षणाचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
- बंगालचा धुरळा बसल्यावर भाजप उत्तरप्रदेश निवडणुकांच्या तयारीला लागला आहे