टीव्हीवर बसपाचा हा नेता मायावतींपेक्षाही जास्त झळकतो

सध्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकांत एक महत्वाचा प्लेअर मिसिंग असल्याचं अनेकांना वाटतंय तो म्हणजे मायावतींचा बहुजन समाज पक्ष. जेव्हा जेव्हा मायावती कुठे आहेत हा प्रश्न विचारला जातोय तेव्हा मात्र एकच नाव टीव्हीवर दिसतंय ते म्हणजे सतीशचंद्र मिश्रा. बऱ्याच दिवसांपासून मिश्रा हे बसपाचे नंबर दोन म्हणून ओळखले जातायत त्यामुळं नक्की बघावं म्हटलं या व्यक्तीचा इतिहास तरी काय आहे.

तर स्वातंत्र्यानंतर  जवळपास तीन दशकांचा काळ लोटून गेला होता पण दलित समाजाच्या त्यांचं सत्तेतला न्याय्य वाटा वाटा मिळवून देईल अशी राजकीय चळवळ भारतात उभी राहत नव्हती.

बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिक पार्टीच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न होत होता पण त्याला म्हणावं तसं यश येत नव्हतं. 

याच वातवरणात एंट्री झाली कांशीराम आणि त्यांनी स्थापन करण्यास पुढाकार घेतलेल्या बामसेफची. बामसेफचाच (मागास व अल्पसंख्याक समुदाय कर्मचारी महासंघ) मग पुढे १९८१ मध्ये DS-4 (दलित सोशीत समाज संघर्ष समिती) या राजकीय गटाच्या कल्पनेत विस्तार करण्यात आला. मग फायनली १९८४मध्ये बहुजन समाज पार्टीची कांशीराम यांनी स्थापना केली.

कांशीराम यांची एनर्जी आणि संघटनात्मक कौशल्य या जोरावर दलित समाजातील शिक्षक, वकील, सरकारी अधिकारी अशा शिक्षित लोकांची यांची फौज बनवली.

बामसेफ आणि बसपा यांचा ताळमेळ साधत शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या नाऱ्याला सत्यात आणण्याचे प्रयत्नही सुरु केले. संघटनेच्या कामाचं फळ लवकरचं मिळालं आणि मायावती यांच्या रूपानं भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्यला पहिली महिला दलित मुख्यमंत्री मिळाली. आता इक्वेशन फिक्स झालं होतं देश पातळीवर कांशीराम आणि राज्यात मायावती.

मात्र पुढे कांशीराम यांच्या जाण्यानं बहुजन समाज पार्टीमध्ये एक पोकळी निर्माण झाली.

त्याचबरोबर फक्त जाटव समाजाच्या वोटबँकेवर उत्तरप्रदेशमध्ये पूर्ण बहुमत मिळवता येत नाहीये हेही  मायावतींनी ओळखलं होतं. आणि याच परिस्तिथीत येते मायावतींची ‘सोशल इंजिनीरिंगची’ संकल्पना. बसपा आणि ब्राह्मण समाज यांची युतीची कोणी कल्पनाही केली नसताना मायावतींनी ‘सोशल इंजिनीरिंगची’चा प्रयोग यशस्वी करून दाखवत २००७मध्ये पहिल्यांदाच बहुजन समाज पार्टीचं बहुमताचं सरकार बनवलं होतं.

आणि याच ‘सोशल इंजिनीरिंग’च्या प्रयोगमागचं डोकं होता सतीशचंद्र मिश्रा यांचं. बहुजन समाज पक्षाचा जो ‘तिलक तराज़ू और तलवार..इंको मारो जूते चार’ ते ‘हाथी नहीं गणेश है…ब्रह्म विष्णु महेश है’ हा प्रवास आहे त्यात  सतीशचंद्र मिश्रा यांचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगण्यात येतं. 

२००७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दलित-ब्राह्मण राजकीय मांडणी करून बसपाला सवर्ण मते मिळवून दिली होती. व्यवसायाने वकील असलेल्या सतीशचंद्र बोस यांचा तसा पक्का जनाधार नाहीये तरी ते आजपर्यंत मायावतींच्या सगळ्यात विश्वासू लोकांच्या यादीत ते टॉपवर आहेत.

त्यांची ११ टक्के ब्राह्मण मते बसपाकडे खेचण्याची त्यांची स्ट्रॅटेजि पुढे ना २०१२,२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत चालली ना २०१४, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत. 

मात्र याचा सतीशचंद्र मिश्रा यांचं पक्षातला स्थान मात्र वाढतच गेलं. आज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव असलेले मिश्राजी मायावती यांच्यानंतर दोन नंबरचे नेते म्ह्णून ओळखले जातात.

२०२२च्या निवडणुकात मायावती कुठे आहेत असा जेव्हा प्रश्न केले जातायत तेव्हा सतीशचंद्र मिश्राचा मीडियापुढे येतायत. त्याचबरोबर बसपाला सोडचिट्टी देताना पक्षाचे नेते जी कारणं देतायत त्यात सतीशचंद्र मिश्रा हे मायावतींचे कान भरत आहेत हा सगळ्यांचा कॉमन आरोप आहे. बामसेफच्या कार्यकर्त्यांनीही सतीशचंद्र मिश्रा यांच्या कार्य पद्धतीवर प्रश्न उपस्तिथ केले आहेत. मात्र एवढा सगळं होऊनही मायावती यांनी आपली सगळी भिस्त सतीशचंद्र मिश्रा यांच्यावरच ठेवली आहे. 

त्यामुळं येणाऱ्या निवडणुकांचा रिझल्ट तरी सतीशचंद्र मिश्रा यांच्या स्थानाला धक्का पोहचवतो का हे येणारा काळच सांगेल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.