जोडी बदलली पण तरीही अखिलेश यादव युपी जिंकणार का?

आत्ता येत्या काही काळात देशातील चार-पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ येतायेत. त्यातील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक नेहेमीच चर्चेचा विषय राहिली आहे.  पुढील वर्ष २०२२ च्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्ष चांगलीच कंबर कसताना दिसत आहेत.

विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय रणधुमाळी वाढताना दिसत आहे, सर्वच पक्षांकडून ठिकठिकाणी मोर्चे काढले जातायेत, राजकीय पक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत आमनेसामने आले आहेत. तर मोठ-मोठ्या नेत्यांकडून विविध प्रकारची वक्तव्येही समोर येत आहेत.

नरेंद्र मोदी यांनी गोरखपूरच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी सपाला रेड अलर्ट दिलाय, त्यानंतर प्रत्युत्तरात अखिलेश यादव यांनीही भाजपवर निशाणा साधलाय. 

पण याच रणधुमाळीत एक जोडी गाजतेय ती म्हणजे, अखिलेश यादव आणि त्यांचे नवे पार्टनर जयंत चौधरी. या नव्या जोडीने सद्या पश्चिम उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचारात रंगत आणली आहे. त्यांची मेरठमधली संयुक्त रॅली सद्या युपीच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे.  गेल्या ७ डिसेंबर रोजी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष चौधरी जयंत जयंत मेरठ, यूपी येथे एका सभेत एकत्र दिसले. मेरठच्या दबथुवा येथे दोन्ही नेत्यांच्या संयुक्त रॅलीला ‘परिवर्तन रॅली’ असे नाव देण्यात आले…सद्या त्यांची हि रॅली जोरदार चालत असल्याचे दिसत आहे.  

संयुक्त रॅलीच्या मंचावरून अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांनी मोदी आणि योगी सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न ते महागाईच्या मुद्द्यावरून घेरलं आहे. 

उत्तर प्रदेशच्या २०२२ च्या निवडणुकीच्या तोंडावर मेरठमध्ये अखिलेश यादव आणि जयंत चौधरी एकत्र येण्याकडे तेथील सर्वात मोठी राजकीय जुगलबंदी म्हणून पाहिली जात आहे. किंबहुना जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल हा पक्ष संपूर्णपणे शेतकरी आंदोलनात सक्रिय दिसला आणि आता समाजवादी पक्षाशी हातमिळवणी करतोय त्यामुळे हा भाजपसाठी फार मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.

उत्तर प्रदेशातील राजकारण जवळून पाहणाऱ्या काही ज्येष्ठ पत्रकारांनी असं मत मांडलंय कि, जयंत चौधरी आणि अखीलेश यादव या दोघांच्या रुपात पश्चिम उत्तरप्रदेशातील जाट समुदायाला मोठी अपेक्षा असणार आहे.  त्याचवेळी पश्चिम उत्तर प्रदेशात आणखी एक मोठी व्होट बँक म्हणजे मुस्लीम समाज. याबाबतीत काही संभ्रम निर्माण व्हायचं कामच नाही, कारण मुस्लिम समाजाला नक्की कुठे जायचे आहे तो ते व्यवस्थित जाणतो. 

यातच जेंव्हा उत्तर प्रदेश निवडणुकांच्या अगदी तोंडावर मोदी सरकारने तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेऊन डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न केलाय, त्यामुळे आता या समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल या दोन्हीं पक्षांची युती यशस्वी होणार का हा प्रश जेंव्हा निर्माण होतो, तेंव्हा काही मुद्दे समोर येतात ते म्हणजे, शेतीविषयक कायदे परत घेतल्याने पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपला कोणताही फायदा होणार नाही.कारण शेतकऱ्यांचा लढा आता खूप पुढे गेला आहे. त्यात शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय अजूनही कायम आहे…ते त्यांच्या मागणीवर ठाम असल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर भाजप ने कायदे मागे घेऊन देखील फारसा फरक पडणार नाही हे कुणीही अगदी सहज सांगू शकते.

खरं तर पूर्व उत्तर प्रदेशातील शेतकऱ्याला कृषी कायद्यांची फारशी चिंता नव्हतीच, कृषी कायदा मागे घेतल्याने पूर्व उत्तर प्रदेशातही भाजपला फायदा होण्या ऐवजी तोटाच झाला आहे. कारण मागे घेतल्याने एक लोकमत असे झालेय कि, कृषी कायद्यांमध्ये काहीतरी गडबड आहे, त्यामुळेच सरकारला कृषीविषयक कायदे मागे घ्यावे लागलेत. आणखी एक म्हणजे भाजपने जर शेतकऱ्यांच्या हितासाठी हे कायदे केले होते तर मग त्यांनी मागे का घेतलेत? म्हणजेच भाजप निवडणुका जिंकण्यासाठी काहीही करू शकते यावर आता लोकांचा विश्वास बसू लागला आहे.आणि जर भाजपच्या मनात आले तर ते कृषी कायदे मागे घेतील त्यामुळे भाजप नकोच असाही मानस लोकांचा झाला आहे. आणि याला खतपाणी घालण्यासाठी आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अखीलेश आणि जयंत चौधरी हि जोडी सरसावली आहे.

राष्ट्रीय लोकदलाचा पश्चिम उत्तर प्रदेशात मोठा प्रभाव आहे, त्यात या पक्षाने शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केलेय. पश्चिम उत्तर प्रदेशातील १३ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय लोकदलाची चांगली पकड आहे आणि आघाडीच्या मदतीने समाजवादी पक्षाने पश्चिम उत्तर प्रदेशातील मुस्लिम लोकसंख्या असलेल्या जागांवर मतदारांचे विभाजन रोखण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय लोकदलासोबत युती करताना, सपा चा उद्देश कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या विरोधाचा फायदा उठवणे हा आहे, जेणेकरून मतदारांमध्ये तसेच पश्चिम उत्तर प्रदेशातील मुस्लिम आणि जाटांमध्ये फूट पडू नये.

अशा स्थितीत आता समाजवादी पक्ष आणि आरएलडी यांची युती होणार का, या प्रश्नावर अखिलेश यादव यांनी सत्ताविरोधी मतांचा पुरेपूर फायदा घेतील असं एकंदरीत अंदाज लागतोय. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नुकसान होईल. आपला जनाधार वाढवून कमी मतांनी पराभूत झालेल्या पक्षाला विजयी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

असंही बोललं जातंय कि, उत्तर प्रदेशच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत समाजवादी पक्ष स्वतःला योगी सरकारचा पर्याय म्हणून पाहत आहे. आधी शेतकऱ्यांचे आंदोलन आणि आता समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल एकत्र आल्याने पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरण भाजपच्या विरोधात जाताना दिसत असून त्याचा फटका भाजपला निवडणुकीत सहन करावा लागू शकतो.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ध्रुवीकरणचं कार्ड खेळून १०० पैकी ८० जागा जिंकल्या होत्या. जाट मतदार उघडपणे भाजपसोबत आले. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे जाट मतदार आता भाजपवर नाराज झाला आहे..त्यामुळे आता त्यांना पुन्हा सपा आणि लोकदलाच्या युतीकडे आशा लागून राहिलेली आहे.

त्यामुळे राष्ट्रीय लोकदलासोबत समाजवादी पक्षाने केलेल्या युतीचा विचार करता या दोन्ही नेत्यांची जोडी हि कितपत प्रभावी ठरले सांगता येत नाही…

कारण अशीच एक जोडी मागच्या निवडणुकीत देखील गाजली होती ते म्हणजे राहुल गांधी आणि अखीलेश यादव.

तस्वीरों में देखिए राहुल गांधी और अखिलेश यादव की दोस्ती, क्या 'यूपी को ये साथ पसंद है'?

२०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सपा आणि कॉंग्रेस यांच्यातील युतीला ‘गंगा-जमुना’ संगम असल्याचे सांगून, राहुल गांधी आणि अखीलेश यांची युती झाली होती. त्यांच्या युतीसोबतच त्यांची मैत्री देखील बहरली होती..इतकी कि प्रचाराच्या मोहिमेसाठी साठी ते अगदी गळ्यात गळे घालून फोटो काढणे काय अन सारखेच कपडे घालायचे…मात्र आत्ता हि जोडी बदलून त्या जागी आता जयंत चौधरी आणि अखीलेश यादव यांच्या जोडीने सद्या युपीमध्ये हवा चालू केली आहे. 

पण त्याचा काय तो निकाल २०२२ च्या निवडणुकांनंतरच कळेलच !

 

English Summary: Samajwadi Party president Akhilesh Yadav and Rashtriya Lok Dal (RLD) chief Jayant Chaudhury are expected to make a formal announcement of their alliance for the next year’s Uttar Pradesh elections on Tuesday.

 

Web Title: UP Election update : Will Akhilesh Yadav will win by making alliance with Jayant Chaudhary

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.