असा मुख्यमंत्री जो चहाचे पैसे देखील स्वत:च्या खिश्यातून देत असे..

१९२५ साली काकोरी खटल्यातील काही तरुण, वकिलांच्या शिष्टमंडळास भेटण्यासाठी आले होते. सरकारी खजिना लुटला म्हणून या तरुणांवर खटला भरण्यात आला होता. तरुणांना कोणत्याही परस्थितीत सोडवण्याची जबाबदारी वकिलांवर आली होती.

या वकिलांच्या समूहात असा एक मराठी तरुण होता, जो या क्रांन्तीकारी तरुणांच्या मागे सर्वस्व अर्पण करुन उभा राहिला.

हा तोच तरुण होता जो महाराष्ट्राचा असून देखील उत्तरप्रदेशसारख्या राज्याचा पहिला मुख्यमंत्री झाला.

या तरुण वकिलाचं नाव होतं गोविंद वल्लभ पंत. गोविंद पंत मुळचे महाराष्ट्राचे. कऱ्हाडे ब्राम्हण कुटूंबात जन्मलेल्या गोविंद पंताना लहानपणापासूनच आपल्या आजोबांकडे रहावं लागलं. हूशार असणाऱ्या गोंविद वल्लभ पंतानी वकिलीचं शिक्षण घेतलं आणि स्वतच्या आयुष्यात पहिला नियम आखला तो म्हणजे,

“काही झालं तरी मी खोट्या केसेस लढणार नाही.”

ज्या केसेसमध्ये त्यांना खोटेपणा दिसला त्या केसेस ते अर्ध्यावरतीच सोडू लागले.

आल्मोडा शहरात वकिली करत असताना त्यांची अभ्यासू मांडणी पाहून ब्रिटीश न्यायाधिशानं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर गोविंदपंतांचा रस्ता राजकारणाकडे झुकला. सन १९२१ साली ते लॅजेस्लेटिव असेंबली मध्ये निवडून आले.

नंतरच्या काळात महात्मा गांधी आणि नेहरुंसोबत भारताच्या स्वातंत्रलढ्यात ते सहभागी झाले. पंडित जवाहरलाल नेहरूंना अटक करुन ब्रिटीश शासनानं अहमदनगरच्या तुरुंगात ठेवलं होतं.

नेहरूंसोबत गोविंद वल्लभ पंत देखील याच तुरुंगात होते. याचठिकाणी गोविंद वल्लभ पंताचा प्रामाणिकपणा नेहरूंना भावला. नंतरच्या काळात जेव्हा उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री ठरवण्याची वेळ आली तेव्हा नेहरूंनी डोळे झाकून गोविंद वल्लभ पंताच नाव सुचवलं.

Screen Shot 2018 03 31 at 6.32.36 PM

गोविंद वल्लभ पंत १९४६ ते १९५४ दरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री राहिले. त्यांच्या प्रामाणिकपणाचे काही किस्से.

गोविंद वल्लभ पंत मुख्यमंत्री पदावर असताना शासकिय बैठकित चहा आणि नाष्टा आणला गेला. गोविंद वल्लभ पंतांनी बिल पाहीलं तर ते बील सहा रुपये झालं होतं. त्यावर पतांनी विचारणा केली की नाष्टाची ऑर्डर कोणी दिली होती. त्यावर अधिकारी म्हणाला,

“शासकिय खर्चातून नाष्टा केला तर काय बिघडते.”

या घटनेनंतर सरकारी पैशाचा दूरपयोग करायचां नाही म्हणून गोविंद वल्लभ पंत आपल्या खिश्यातील पैशातून चहाचं बिल भरू लागले.

गोविंद पतांचा दरारा इतका मोठ्ठा होता की त्यांनी लिहलेल्या फॉरेस्ट प्रोब्लेम इन कमाउं या पुस्तकावर सरकारने बंदी आणली. ब्रिटीश काळात ते राहत असलेल्या काशीपुरा भागास देखील ब्रिटीश अधिकाऱ्यांनी गोविंदगड अस टोपणनाव पाडलं होतं.

गोविंद वल्लभ पंताचा जन्म अनंत चतुर्दशीचा. पंत नेहमीच तो अनंत चतुर्दशीच्या दिवशीच साजरा करत. पंत जेव्हा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले तेव्हा देखील योगायोगाने अनंत चतुर्दशी होती.

त्या दिवशी असणारी १० सप्टेंबर ही तारिख पंतानी पुढे वाढदिवसासाठी वापरली.

राज्यभाषा हिंदी असावी यासाठी पंताच्या योगदानाचा उल्लेख केला जातो.

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.