तालिबानच्या मुद्द्यावर आता युपीत राजकारण पेटलय !

भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे. हे तुम्ही अगदी कोणत्याही कॉन्टेक्स्ट मध्ये घेऊ शकता. म्हणजे इथं माणसांचेच आणि माणसांच्या स्वभावाची इतक्या प्रकारची वैशिष्ट्य आहेत कि विचारू नका. जगात काही घडलं तरी त्या गोष्टीला धरून आपल्या घरात भांडणारा माणूस फक्त आणि फक्त भारतातच सापडू शकतो.

आता हीच भांडण आपल्या उत्तरप्रदेशात लागली आहेत. ही भांडण थोडी सिरीयस टाईपची आहेत. म्हणजे कशी ? तर हि भांडण लागलीत राजकारणात, खाली वाचायला लागतंय म्हणजे समजेल, काय विषय आहे तो. 

तर तालिबानने अफगाणिस्तानवर पूर्णपणे कब्जा केला आहे. आणि आता सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे. पण तालिबानबाबत भारतातल्या राजकारणानं पेट घेतलाय. विशेषत: उत्तर प्रदेशच्या राजकारणात तालिबान हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. काही माजी आमदार आणि इतर नेते तालिबानवरून विरोधी नेत्यांना घेराव घालत होते.

पण आता खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तालिबानचा उल्लेख करत विरोधकांना लक्ष्य केले आहे.

तालिबानचे समर्थन करणाऱ्यांचे चेहरे उघड झाले पाहिजेत.

जेव्हा उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलण्यासाठी उभे राहिले. आणि काही वेळानंतर त्यांनी तालिबानचा उल्लेख केला. त्यात ते म्हंटले की अफगाणिस्तानात महिला आणि मुलांवर अत्याचार केला जात आहे.

अध्यक्ष महोदय, भारतातले काही लोक तालिबानला पाठिंबा देत आहेत. तिथल्या महिलांवर काय अत्याचार केले जात आहेत, अफगाणिस्तानात मुलांवर किती अत्याचार होतायत, आणि आपल्या इथले निर्लज्ज लोक त्यांचं समर्थन करतायत. त्यांचे चेहरे आणि नाव एक्स्पोज केली पाहिजेत.

आता योगींनी एवढा मुद्दा तानपटलाय कारण, 

उत्तर प्रदेशच्या संभलमधील समाजवादी पक्षाचे लोकसभा खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी अफगाणिस्तानात सत्ता काबिज केलेल्या तालिबानची तुलना भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांबरोबर केली होती.

भारत इंग्रजांच्या ताब्यात होता, तेव्हा देशानं स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता. आता तालिबानही देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन स्वतः देश चालवू इच्छित आहेत. आधी रशिया आणि नंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. पण त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. हे त्यांचं खासगी प्रकरण आहे. यात कुणी दखल द्यायला नको,

खासदार शफीकुर रहमान बर्क यांच्या वक्तव्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका भाजपच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी बर्क यांच्या या वक्तव्यावर टीका केली होती. तसंच भाजपनं त्यांना माफी मागण्यासही सांगितलं होतं. त्यामुळेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चिडलेत. 

अशाप्रकारे उत्तरप्रदेशचा हा मुद्दा जाम सिरीयस आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत याच भांडवल होणार का हे काय भिडूला माहित नाही. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.