हे पण UPSC ASPIRANT होते. पण अधिकारी बनायची संधी सोडून वेगळ्या क्षेत्रात नाव गाजवलं..

दिल्लीतल्या ओल्ड राजेंद्रनगर पासून ते पुण्याच्या सदाशिव पेठ पर्यंत UPSCची सेम टू सेम स्टोरी.

Tvf Aspirants सिरीज अलीकडेच रिलीज झाली आणि जिकडे तिकडे यूपीएससीच्या मृगजळाबद्दल बोलले जातंय. कुठलीच वेबसिरीज एवढी रिलेटेबल कधीच वाटली नाही जेवढी ही वाटते. त्याचं कारणही तसंच आहे ना. तुम्ही, मी, आपले मित्र-मैत्रिणी रूममेट्स कित्येकांनी IAS, IPS, DC बनण्याचे, लाल दिव्याच्या गाडीत फिरण्याचे स्वप्न पाहिले होते. 

यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी ऑफिसर होऊ असं म्हणत म्हणत, मोटिवेशनल व्हिडिओ बघून बघून आयुष्यातले 3/4/5 वर्ष निघून जातात आणि मग लक्षात येतं आपल्याने काय हे होणार नाही,  जॉब मिळत नाही. लग्नाचं वय झालंय, प्लान-बी चा पत्ता नाही… बस्स भिडू इथेच आपला गेम होतो!

हि स्टोरी दिल्लीतल्या ओल्ड राजेंद्रनगर पासून ते पुण्याच्या सदाशिव पेठ पर्यंत सेम टू सेम घडते.

पोरांचे अफेअर्स, पोरांच्या पार्ट्या, चहाटपरीवर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या गप्पा आणि देशाच्या भविष्यावर चर्चा करतांना घातलेले वाद सिरीजमध्ये पाहिल्यानंतर हे तर आपणच आहोत असं काही क्षण वाटून जातं !

राजेंद्र नगरच्याच नाही तर पेठेतल्या सुद्धा कंजेस्टेड रूम चे चित्र इथून तिथून सारखेच असते. रूम मधल्या सगळ्या भिंतीवर जगाचा नकाशा, टाईम टेबल, चार्ट आणि मोटिवेशनल कोट्स चिटकवल्या  शिवाय यांची युपीएससी-एमपीएससी सुरू होतच नाही. 4-5 रंगाच्या पेनाने हायलाईट केलेले पोती भरून पुस्तकं,नोट्स सगळेच या खोलीत असते.

यांच्या दिवसाची सुरुवात ‘लोकसत्ता’,  ‘हिंदू’ वाचून होते तर शेवट परिक्रमा, युनिक बुलेट, योजना वाचून संपतो. रोज तेच तेच पोहे खाऊन, दिवसाला 4/5 चहा पिऊन, मेसचे डबे खाऊन स्वतःचे हिमोग्लोबिन लो करून, दिवसाचे 15-15 तास त्या लायब्ररीमध्ये अभ्यास करणारी ही पोरं- पोरी बघून असं वाटतं की, ही जनता कुठल्यातरी वेगळ्याच ग्रहावर राहते.

UPSC करत करत MPSC/PSI/STI तलाठी पर्यंत यांचा प्रवास असतो. ते म्हणतात नां, ‘भूक लागली कि काहीही पोटात जातं’ तसंच काहीसं इथेही होते. तलाठ्याच्या खूप जागा निघाल्या म्हणून UPSC, MPSC वालाही तलाठी चा फॉर्म भरतो. त्यातही कुणाची PSI मेन्स क्लियर झालीच तर वर्षभर फिजिकल साठीच्या तयारीत,  मेस जेवण करून जिम, ग्राउंड करणाऱ्या मुला -मुलींचा स्ट्रगल वेगळाच!

‘तात्यांचा ठोकळा ते लक्ष्मीकांत’  अशी ‘थर्ड वर्ड स्टोरी’ असलेल्या पोरा-पोरांची लव स्टोरी मग राजेंद्रनगर असो किंवा सदाशिव पेठ असो, तिथेच थांबते..

Tvf मधला अभिलाष आणि त्याचे तीन मित्र जरी आपल्याला भावले तरी त्यातल्या संदीपभय्याने मात्र अख्ख मार्केट खाल्लंय.

UPSC करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक-दोन संदीप भैय्या तर नक्कीच असतात. त्याने दिलेला लाईफ लेसन हा मोलाचाच आहे. कर्ज काढून अभ्यासाला पुणे-दिल्लीला पाठवणाऱ्या माय -बापाच्या डोळ्यात मोठी मोठी स्वप्न दाखवून तर आपण येतो पण इकडे तर आपल्याला ‘प्री’ ही क्रॅक होईना आणि मग पुरता गोंधळ उडतो.

आयुष्यचा ‘प्लॅन बी’ ज्या पद्धतीने त्यात मांडलाय त्याला तोड नाही.

सिरीजचा प्रत्येक एपिसोड, प्रत्येक सीन कुठे ना कुठे तरी आपल्यासोबत घडलेला आहे असंच वाटतं. 

काहीही झालं तरी आयुष्यात पॉझिटिव्ह अप्रोच महत्वाचा आहे, आणि हाच अप्रोच तुमच्या आयुष्याला कलाटणी द्यायला कारणीभूत ठरतो हे या सिरीजचा संदेश आहे. हे झालं सिरीजचं…

त्यात दाखवलेले अभिलाष, श्वेतकेतू (SK) आणि गुरी सारखेच काही अस्पिरंट्स हे रिअल मध्ये आहेत. ज्यांनी upsc क्लिअर करूनही शासकीय नोकरी न करता इतर मार्ग निवडले. काही गुरी, श्वेतकेतू आणि धैर्या सारखेच काही नामांकित भारतीय व्यक्तीं यूपीएससी परीक्षेच्या तयारी नंतर वेळीच आपला वेगळा मार्गही निवडला. हे कोण आहेत ते जाणून घेऊयात…

१.सुभाषचंद्र बोस

bose1611248119797

सुभाषचंद्र बोस यांनी इंग्लंडमध्ये असताना 1920 मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस ची परीक्षा दिली होती.  त्यानंतर एका वर्षाने त्यांनी त्यांच्या अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता.  त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले की, “आपण आपली राष्ट्रीय उभारणी ही त्यागाशिवाय शक्य नाही, म्हणून मि हा राजीनामा देत आहे.”

२.कपिल सिब्बल

राजकीय नेत्यांमधील नाव घ्यायचं तर कपिल सिब्बल यांचं नाव देशातील सर्वात उच्चशिक्षित नेत्यांमध्ये घेतलं जातं. भारताचे शिक्षण म्हणून त्यांनी मोठी छाप पाडली होती. एकेकाळी त्यांनीही UPSC ची परीक्षा दिली आणि IAS म्हणून सिलेक्ट ही झाले होते. परंतू त्यांचे भारतीय परराष्ट्र सेवेचे लक्ष्य होते आणि त्यासाठी ते हार्वर्ड लॉ स्कूलमध्ये लॉ करण्यासाठी गेले. पुढे दिग्गज वकील बनले आणि सगळ्यात शेवटी राजकारणात आले. 

३.राम नाथ कोविंद

आपल्या देशाचे राष्ट्रपती मा. राम नाथ कोविंद यांनी देखील सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या तयारी केली आणि ते तिसऱ्या अटेंम्ट मध्ये सिलेक्टदेखील झाले. परंतु आयएएस ऐवजी सहयोगी सेवेत निवड झाल्या मुळे त्यांनी जॉइनिंग स्वीकारली नाही आणि त्यामुळे त्यांनी लॉ ची प्रॅक्टिस सुरु केली. पुढे राजकारणात आले आणि देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली.

४. टी.आर. अंध्यारुजीना

टी.आर. अंध्यरुजीना हे ज्येष्ठ वकील असून त्यांनी भारतीय सर्वोच्च न्यायालयात लॉ प्रॅक्टिस केली.  जरी त्यांनी नागरी सेवा परीक्षा क्रॅक केली असली तरीही त्यांनी करिअरसाठी वकिलीला प्राधान्य दिले.

५.साक्षी तंवर

602122 sakshi tanwar

दिल्लीत असणाऱ्या हजारो अस्पायरन्टप्रमाणे साक्षी तंवरने देखील सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी केली होती. आयएएस बनण्यासाठीचा अभ्यास  सुरु असतांनाच तिला तिच्या एका मित्राबरोबर काम करत असलेल्या को-अँकरचे काम करण्याची संधी मिळाली. आणि नंतर तिचे अभिनयाने किती मोठी उंची गाठली हे अपल्याला माहितीच आहे.

६. ऐश्वर्या शेरॉन

77357897

मिस इंडिया फायनलिस्ट ऐश्वर्याने तिच्या एका मुलाखतीत असे सांगितले होते की तिला पहिल्यापासूनच सिव्हिल सर्व्हिस मध्ये काम करायची इच्छा असून त्यासाठी ती तयारी ही करत होती. अनेकदा अशा सौंदर्य स्पर्धांमध्ये जजना इम्प्रेस करण्यासाठी लोक मी यूपीएससी करणार असं सांगत असतात. पण ऐश्वर्याने खरंच ब्युटी पेजन्टच्या स्पर्धेनंतर यूपीएससी क्लियर केली. तिच्या संपूर्ण देशात ९३ वा नम्बर आला.

७.रोमन सैनी

Roman Saini at the junior resident doctor

अनअकॅडमीच्या फॉउंडरने वयाच्या 16व्या वर्षी AIIMS परीक्षा क्रॅक केली.  पुढे 2014 मध्ये वयाच्या बावीसाव्या वर्षी तो UPSC परीक्षा पास झाला, एका वर्षानंतर पदाचा राजीनामा देऊन रोमन सैनी हा व्यवसायाकडे वळला आणि अनअकॅडमीचा प्रवास सुरु झाला.

८. एम.एस.स्वामिनीनाथन

Dr M.S. Swaminathan 11

ज्यांना आपण भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखतो त्यांनी देखील यूपीएससी क्रॅक करून ते (IPS ) भारतीय पोलिस सेवांसाठी पात्र ठरले होते.  परंतु, त्यांनी ही संधी नाकारली आणि नेदरलँड्सच्या वेगेनिंगेन कृषी विद्यापीठात युनेस्को बरोबर फेलोशिप घेण्याचे निवडले.

९. बलराज स्याल

अभिनेता तसेच कॉमेडियन, मुझसे शादी करोगे, आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 10 मधील भूमिकांमुळे तो फेमस झाला. परंतु अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर तो यूपीएससीची तयारी करत असल्याचे त्याने सांगितले होते.

१०.अनुभव सिंह बस्सी

वकिलीचे शिक्षण ते यूपीएससीची तयारी आणि मग शेवटी करिअरची निवड म्हणून स्टॅंड अप कॉमेडीची निवड अशी वाटचाल असलेला अनुभव सिंग.  म्हणून कॉमेडीमध्ये आयएएसवर विनोद जास्त करतात.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.