UPSC टॉपरच्या यशाचा दुसराचं कोणी फायदा घेतोय, अनेक फेक अकाउंट समोर आलेत

काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) रिझल्ट लागला. यात ऐकून ७६१ विद्यार्थ्यांची  वर्णी लागली. या विद्यार्थ्यांमध्ये बिहारच्या शुभम कुमारनं देशात टॉप केलं. ज्यानंतर अर्थातच माध्यमांपासून सोशल मीडियापर्यंत त्याची वाह वाह झाली. देशातल्या प्रत्येक वृत्तपत्रांच्या हेडलाईनमध्ये तो झळकायला लागला. त्याच्या गावात बँड – बाजा वाजवून त्याचं स्वागत केलं. एवढं काय तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतः फोन करून त्याच अभिनंदनही केलं.

आपल्या बुद्धीच्या जोरावर तो प्रचंड फेमस झालाय. पण या फेममध्येचं एका गोष्टीमुळे त्याची डोकेदुखी वाढलीये. टॉपर बनल्यानंतर सोशल मीडियावर शुभम कुमारची अनेक फेक अकाउंट तयार करण्यात आलीत. यात हाईट म्हणजे ही फेक अकाउंट अशा सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर सुद्धा आहेत, जिथं तो स्वतःचं नाहीये.

या प्रकाराबाबत, एका वृत्तसंस्थेशी बोलताना शुभम कुमार सांगितले कि,

माझं फक्त ट्विटरवर अकाउंट आहे. ज्याच्यावर फक्त साडेतीन हजार फॉलोअर्स आहेत.पण माझ्या नावाने सुरु असणाऱ्या फेक अकाउंटवर माझ्यापेक्षा जास्त फेक अकाउंट आहेत. महत्वाचं म्हणजे मी ना फेसबुकवर आहे, ना यूट्यूबवर. पण त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही माझ्या नावाने अकाउंट उघडण्यात आलेत. आणि कोणीतरी स्वतः आपले फॉलोवर्स वाढवयच्या मागे लागलाय.

शुभमचे म्हणणे आहे की,  त्याचे एकच अकाउंट आहे  SHHUBHAMKR_IAS, आणि बाकी सगळे अकाउंट फेक आहेत.

आता शुभम कुमारच्या फेक अकाउंट वर नजर टाकू

शुभमच्या नावाने बरीच फेक अकाउंट्स  आहेत. तुम्ही स्वतः जरी शुभम कुमार आयएएस नावाने सर्च केलं तरी तुम्हाला बरेच अकाउंट्स पाहायला मिळतील.

shubham fake account 290921 063827

त्यातलंच एक म्हणजे @Shubham9_IND या नावाने शुभमच्या नावाने ट्विटरवर फेक अकाउंट चालू होते. जे सध्या तरी डिलीट करण्यात आलेय.  ज्याच्यावर त्याचे ४ हजार फॉलोवर्स आहेत.

32 290921 063733

यासोबतच ItsSubhamKumar नावाने ट्विटरवर आणखी एक फेक अकाउंट आहे, ज्यावर २३०० हून अधिक फॉलोअर्स आहेत. सरकारी अधिकारी, रँक 1 UPSC CSE 2020 #Upscresult2020. असं या ट्विटर हँडलच्या बायोमध्ये लिहिले आहे. या ट्विटर हँडलवरून पहिले ट्विट २६ सप्टेंबर रोजी करण्यात आले.

2344

यासोबतच शुभम कुमारच्या नावे फेक फेसबुक अकाउंट सुद्धा आहेत. पण तो स्वतः फेकबुक युजर नाही. आणि हे अकाउंट लॉक करण्यात आलेय.

Fb33

बिहारच्या कटिहारचा रहिवासी शुभम कुमार याने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी पास करून देशात सर्वोत्तम रँक मिळवला. शुभम हा इंजिनिअर आहे आणि तो २०१८ पासून UPSC ची तयारी करत होता, तो पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला, दुसऱ्या प्रयत्नात २९० वा रँक मिळाला आणि तिसऱ्या प्रयत्नात मात्र त्याने बाजी मारली आणि डायरेक्ट पहिला क्रमांक मिळवला.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.